Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ई-पोस्टद्वारे पोहोचणार नोटीस; राज्य शासनाने केला 2.80 कोटींचा निधी मंजूर

टपाल विभाग संबंधित लाभार्थ्यांना स्पीड पोस्टद्वारे नोटिसा पाठविणार आहे. त्यामुळे नोटिसा पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन मोजणीच्या प्रकरणांमध्ये होणारा विलंब टळण्यास मदत होणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 04, 2026 | 03:34 PM
ई-पोस्टद्वारे पोहोचणार नोटीस; राज्य शासनाने केला 2.80 कोटींचा निधी मंजूर

ई-पोस्टद्वारे पोहोचणार नोटीस; राज्य शासनाने केला 2.80 कोटींचा निधी मंजूर

Follow Us
Follow Us:

पुणे : जमीन मोजणीसंदर्भातील नोटीस वेळेत मिळाव्यात आणि मोजणीची प्रक्रिया अधिक जलद व्हावी, यासाठी राज्याच्या भूमी अभिलेख विभागाने ई-पोस्ट प्रणाली सुरू केली आहे. यापुढे ‘ई-काउंट २’ प्रणालीतून तयार होणाऱ्या मोजणीच्या नोटिस थेट ऑनलाईन पद्धतीने टपाल विभागाकडे पाठविल्या जाणार असून, त्या स्पीड पोस्टद्वारे संबंधितांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत.

जमिनीची अधिकृत मोजणी (मोजणी) करताना संबंधित सर्व पक्षकारांना नोटीस देणे कायद्याने बंधनकारक आहे. यामध्ये सर्व्हे क्रमांकधारक, मोजणीसाठी अर्ज करणारा, सहधारक, शेजारील जमीनधारक तसेच सातबाऱ्यात नमूद इतर संबंधितांचा समावेश असतो. यापूर्वी या नोटिस उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात छापून प्रत्यक्ष टपाल कार्यालयात जमा कराव्या लागत होत्या. या प्रक्रियेमुळे वेळ आणि मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणात वापर होत होता. नवीन ई-पोस्ट प्रणालीमुळे ‘ई-काउंट २’ या ऑनलाइन प्रणालीत तयार झालेली नोटीस थेट टपाल विभागाकडे पाठविली जाईल.

त्यानंतर टपाल विभाग संबंधित लाभार्थ्यांना स्पीड पोस्टद्वारे नोटिसा पाठविणार आहे. त्यामुळे नोटिसा पोहोचण्याचा कालावधी कमी होऊन मोजणीच्या प्रकरणांमध्ये होणारा विलंब टळण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पासाठी राज्य शासनाने २.८० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, राज्यभरातील भूमी अभिलेख विभागाच्या मोजणी प्रकरणांमध्ये ही सुविधा लागू करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातही या प्रणालीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ ऑगस्ट २०२६ पासून ‘ई-काउंट २’ प्रणालीतून तयार होणाऱ्या मोजणी नोटिसा ई-पोस्टद्वारे पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांच्या मते, या बदलामुळे नोटिसा वेळेत संबंधितांपर्यंत पोहोचतील, मोजणी प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल आणि प्रकरणांच्या निपटाऱ्याला गती मिळेल.

ई-पोस्ट प्रणालीचे होणारे फायदे

– मोजणीच्या नोटिसा थेट ऑनलाइन टपाल विभागाकडे पाठविणार.
– स्पीड पोस्टद्वारे संबंधितांना जलद वितरण.
– कागदपत्रांची छपाई व प्रत्यक्ष हस्तांतरणाची गरज संपणार.
– नोटिसा वेळेत मिळाल्याने मोजणी प्रकरणांतील विलंब कमी होणार.
– भूमी अभिलेख विभागाचे वेळ व मनुष्यबळाची बचत होणार

Sanjay Raut On PM Modi : नरेंद्र मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटत चाललीये…; संजय राऊतांचा घणाघात

Web Title: Notice to be delivered via e post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Government Decision
  • maharashtra

संबंधित बातम्या

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम
1

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर
2

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित
3

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
4

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.