Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी

हवेली क्रमांक ७ दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीच्या तपासणीत २१ दस्तांवर विविध आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. तपासणी पथकाने सादर केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 04, 2026 | 03:50 PM
हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी

हवेली-७ कार्यालयाच्या तपासणीत २१ दस्तांवर आक्षेप; संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहन सुरवसे पाटलांची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : हवेली क्रमांक ७ दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तनोंदणीच्या तपासणीत २१ दस्तांवर विविध आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या तपासणी पथकाने केलेल्या पाहणीत १२ दस्तांमध्ये मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण अधिनियम, १९४७ मधील तरतुदींचे पालन झाले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच चार दस्तांमध्ये एकूण ५ लाख १७ हजार ६०९ रुपयांचे मुद्रांक शुल्क कमी भरल्याचे आणि नोंदणी शुल्कात ४६ हजार ९४० रुपयांची तफावत आढळल्याचे अहवालात नमूद आहे. सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, पुणे शहर यांच्या आदेशानुसार १७ ते २१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हवेली-७ कार्यालयातील दस्तांची तपासणी करण्यात आली. तपासणी पथकाने सादर केलेल्या अहवालात एकूण २१ दस्तांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

 

अहवालातील निष्कर्षतपासणीतील १२ दस्तांमध्ये मुंबई धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण अधिनियम, १९४७ मधील कलम ८ आणि ३१नुसार आवश्यक सक्षम प्राधिकाऱ्याची परवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात आले नसल्याचे अहवालात नमूद आहे. महाराष्ट्र नोंदणी नियम, १९६१ मधील नियम ४४(१)चे पालन झाले नसल्याचेही तपासणी पथकाने म्हटले आहे. काही दस्तांमध्ये रेरा प्रमाणपत्र जोडले नसल्याचेही तपासणीत आढळले. नऊ दस्तांमध्ये गुंठेवारी नियमितीकरण दाखल्याची आवश्यक पडताळणी झाल्याचे दिसून आले नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित दस्तांच्या नोंदणी प्रक्रियेबाबतही आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

तपासणीदरम्यान चार दस्तांमध्ये मुद्रांक शुल्क कमी भरल्याचे आढळले. विकास कराराच्या एका दस्तासाठी ४ लाख ३१ हजार ८०३ रुपये मुद्रांक शुल्क अपेक्षित असताना १ लाख १५ हजार ३०० रुपये भरले गेले. त्यामुळे ३ लाख १६ हजार ५०३ रुपयांची तफावत आहे. वाटणीपत्राच्या  दस्तात ९२ हजार ५०० रुपये मुद्रांक शुल्क अपेक्षित असताना ३४ हजार ५०० रुपये भरले गेले. त्यामुळे ५८ हजार रुपयांची तफावत असून, नोंदणी शुल्कात १८ हजार ३०० रुपये कमी भरले आहेत. खरेदीखताच्या एका दस्तात १ लाख ३३ हजार ४२० रुपये अपेक्षित असताना १ लाख १२ हजार ३०० रुपये भरले गेले. त्यामुळे २१ हजार १२० रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि ४ हजार २४० रुपयांचे नोंदणी शुल्क कमी भरले गेले.अदलाबदलीच्या दस्तात १ लाख २२ हजार ४८६ रुपये मुद्रांक शुल्क अपेक्षित असताना केवळ ५०० रुपये भरले गेले. त्यामुळे १ लाख २१ हजार ९८६ रुपयांची मुद्रांक शुल्काची तफावत असून, नोंदणी शुल्कात २४ हजार ४०० रुपये कमी भरले आहेत. तपासणी पथकाने नोंदविलेल्या आक्षेपांवर हवेली-७ दुय्यम निबंधक कार्यालयाकडून अनुपालन अहवाल सादर करण्यात आला आहे. संबंधित कागदपत्रांसह हा अहवाल सह जिल्हा निबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.

“गेल्या काही महिन्यांपासून अधिकारी मनमानी पद्धतीने दस्तनोंदणी करत होते. ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी  चौकशी समिती नेमण्याच्या  सूचना दिल्या. या समितीच्या अहवालात नियमभंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नोंदणी महानिरीक्षकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.” — रोहन सुरवसे-पाटील, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस.

हे सुद्धा वाचा : कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

Web Title: Objections have been raised during the inspection of document registrations at the haveli no 7 sub registrars office nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Chandrasekhar Bawankule
  • NCP Party
  • pune news

संबंधित बातम्या

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल
1

कचरा गोळा करणारी घंटागाडीच मद्यधुंद चालकाच्या ताब्यात; पुण्यात गुन्हा दाखल

पुण्यातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार? डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार
2

पुण्यातील वाहतुकीची कोंडी लवकरच सुटणार? डिसेंबरपर्यंत 4 ते 5 नवे पूल होणार

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा
3

MPSC Student Protest : पुण्यात MPSC आंदोलनाचा मुद्दा तापला, संग्राम जगताप, गोपीचंद पडळकरांचा पाठिंबा

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान
4

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.