Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त

संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘ओम्या’ बैलाचे आज, दिनांक २७ रोजी दुपारच्या सुमारास दुःखद निधन झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 28, 2026 | 12:30 AM
प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त

प्रथम ‘भारतकेसरी’ ओम्या बैलाचे निधन; मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक अन् चाहत्यांकडून हळहळ व्यक्त

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ/ सतिश गाडे : मावळ तालुक्यातील प्रथम ‘भारतकेसरी’ म्हणून ओळख असलेल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात आपल्या दमदार कामगिरीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ‘ओम्या’ बैलाचे आज, दिनांक २७ रोजी दुपारच्या सुमारास दुःखद निधन झाले. ओम्याच्या निधनाने मावळ तालुक्यातील बैलगाडा मालक, शौकीन तसेच त्याच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

मावळ तालुका म्हटला की बैलगाडा शर्यत, कुस्ती, देवाचे बगाड अशा पारंपरिक खेळांची आणि संस्कृतीची ओळख समोर येते. याच बैलगाडा क्षेत्रात ओम्याने आपल्या वेगाने आणि दमदार कामगिरीने महाराष्ट्रभर लौकिक मिळवला होता. बैलगाडा शर्यत म्हटली की ‘ओम्या’ची बारी अनेकांच्या आठवणीत आहे. घाटात ओम्याची धाव पाहण्यासाठी हजारो बैलगाडा शौकीन गर्दी करत असत. फायनलमध्ये प्रतिस्पर्धी गाड्यांवर मात करत अवघ्या एक-दोन सेकंदांच्या फरकाने आघाडी मिळवत ओम्या आपल्या मालकाची मान अभिमानाने उंचावत असे. त्याचा वेग, धावण्याची शैली आणि रुबाब यामुळे त्याची बारी लागली की घाटावर शौकिनांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण होत असे.

मावळ तालुक्यातील भाजपाचे नेते आणि बैलगाडा मालक रामनाथ वारींगे यांचा ओम्या हा बैल होता. वारंगवाडी येथे त्याचे निधन झाले. शेतकरी आपल्या बैलाचा मुलाप्रमाणे सांभाळ करतो. त्याचप्रमाणे वारींगे यांनीही ओम्याचा जिव्हाळ्याने सांभाळ केला. अनेक शर्यतींमध्ये आपल्या मालकाची मान उंचावणाऱ्या ओम्याच्या निधनाने बैलगाडा शौकीनांवर शोककळा पसरली आहे.

जेसीबीपासून थारपर्यंत बक्षिसांचा मानकरी

ओम्याच्या नावावर बैलगाडा शर्यतीतील अनेक प्रतिष्ठेच्या विजयांची नोंद होती. विविध स्पर्धांमध्ये त्याने जेसीबी, थार, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट मोटारसायकल, सोन्याची बक्षिसे तसेच मोठ्या रकमेची रोख बक्षिसे मिळवत आपला दबदबा निर्माण केला होता. या दमदार कामगिरीमुळे बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रात ओम्याला विविध बिरुदांनी गौरवण्यात आले. ‘मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद’, ‘तुफान गतीचा बेताज बादशहा’, ‘मावळची राजधानी एक्सप्रेस’, ‘महाराष्ट्र केसरी’ आणि ‘बैलगाडा क्षेत्राचा कोहिनूर’ अशा शब्दांत त्याचे वर्णन केले जात होते.

घाटावर ओम्याची बारी म्हणजे शौकिनांसाठी पर्वणी

बैलगाडा घाटावर ओम्याची बारी लागली की शौकिनांसाठी ती एक पर्वणीच ठरत असे. त्याचा वेग पाहण्यासाठी दूरदूरवरून बैलगाडा प्रेमी घाटावर दाखल होत असत. धावताना प्रतिस्पर्ध्यांवर मिळवलेली आघाडी आणि शेवटपर्यंत कायम ठेवलेला वेग यामुळे ओम्याने असंख्य बैलगाडा शौकीनांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले होते. त्यामुळे ओम्याचा उल्लेख केवळ एक बैल म्हणून नव्हे, तर बैलगाडा शर्यतीच्या विश्वातील मानकरी आणि स्टार बैल म्हणून केला जात असे.

हे सुद्धा वाचा : रोहन सुरवसे-पाटलांच्या पाठपुराव्याला यश; चंदननगर दुय्यम निबंधक कार्यालयातील कथित गैरप्रकारांची होणार चौकशी

सोशल मीडियावर भावनिक श्रद्धांजली

ओम्याच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भावनिक श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली आहे. ओम्याचे शर्यतीतील जुने व्हिडिओ, फोटो आणि त्याच्या विजयांच्या आठवणी मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जात आहेत. ‘ओम्या तू परत ये’, ‘घाटाचा ढाण्या वाघ हरपला’, ‘बैलगाडा शर्यतीचा बादशहा काळाच्या पडद्याआड’ अशा भावनिक प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत. ओम्याच्या निधनाने बैलगाडा शर्यतीच्या क्षेत्रातील एक गाजलेले नाव हरपले असून, त्याने निर्माण केलेली ओळख आणि त्याच्या धावण्याच्या आठवणी बैलगाडा शौकीनांच्या मनात कायम राहतील, अशी भावना व्यक्त होत आहे.

Web Title: Omya a bull from maval taluka has passed away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Death
  • Farmers
  • maval news
  • Vadgaon Maval

संबंधित बातम्या

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
1

लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन
2

Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वाला मोठा धक्का; महेश तिनैकर यांचं वयाच्या ६३व्या वर्षी निधन

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही
3

‘छत्रपती’चा गळीत हंगाम सुरू, ११ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट; सभासदांसह गेटकेन ऊसालाही समान दर देण्याची ग्वाही

Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
4

Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.