Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ranjani Onion Farmers: कांदा उत्पादक शेतकरी संकटात; दर कोसळले, खर्चही न निघाल्याने आंबेगावात चिंता

प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात कांद्याचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप लेट खरिपात साधारण 5 हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीत साधारणतः ७ ते ८ हजार हेक्टरकांद्याचे क्षेत्र असते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 10, 2026 | 04:28 PM
Onion farmers crisis, onion price crash,

Onion farmers crisis, onion price crash,

Follow Us
Close
Follow Us:
  • अतिवृष्टीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान
  • गावरान कांद्याला सरासरी ९०० रुपये तर लाल कांद्याला १००० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर
  • दराची पडझड मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू
Ranjani Onion Farmers News: मागील वर्षीच्या शेवटच्या काही महिन्यांत अतिवृष्टीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गावरान कांद्यासह खरीप कांद्याला मोठा फटका बसला, त्यामध्ये निर्यात बंदी, कीड रोग, खते, बियाणे आणि मशागत खर्चात झालेली वाढीमुळे अगोदरच गोत्यात आलेला शेतकरी कांद्याच्या कमी दरामुळे नाडला जात आहे. बाजारातील दरात सातत्याने पडझड होत असल्याने आंबेगाव तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.

सध्या बाजारात गावरान कांद्याला सरासरी ९०० रुपये तर लाल कांद्याला १००० रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळत आहे, असे सांगितले जात आहे. परंतु, बहुतांश ठिकाणी कांद्याचा दर ६०० रुपयांच्या आतच आहे. कांदा दराला निर्यात बंदीचा फटका बसत असून सध्याच्या दरातून मिळणाऱ्या रकमेत खर्चही निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल आहेत.

Sanjay Raut Slam K. Annamalai: ‘बॉम्बे हे महाराष्ट्राचे शहर नाही…’; भाजप नेत्याच्या विधानावर संजय राऊतांची आगपाखड

प्रामुख्याने पुणे जिल्ह्यात कांद्याचे अधिक प्रमाणात उत्पादन घेतले जाते. खरीप लेट खरिपात साधारण 5 हजार हेक्टर क्षेत्रात रब्बीत साधारणतः ७ ते ८ हजार हेक्टरकांद्याचे क्षेत्र असते. दरवर्षी कांदा क्षेत्रात बदल होतो. दराची पडझड मात्र गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. एखाद्या लिलावाला दर वाढले की लगेच पुढच्या लिलावाला दर कमी होत आहेत. मागील आठवड्यात गावरान कांद्याचे दर 3 हजार रुपयांपर्यंत तर लाल कांद्याचे दर ३ हजार ६०० रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा दर खाली आले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक मात्र कमालीचे हतबल झाले आहेत.

कांद्याचे पीक खर्चिक झाले आहे. महेश कुंडलिक जाधव या शेतकऱ्याने सांगितले की कांद्यासाठी शेत तयार करणे रोटाव्हेटर, रोपे तयार करणे, वाफे पाडणे खत तसेच फवारणी, लागवड, पाणी, कांद्याची काढणी ते घरापासून बाजारापर्यंत येण्याची वाहतूक असा एकरी 70 हजार रुपयाहून अधिक खर्च येतो. मजुरी खताचे, बियाणांचे आणि फवारणीचे दर दरवर्षी 25 टक्क्यांनी वाढत आहेत बाजारात कांदा निघाल्यावर कांदा विक्रीतून मिळालेली रक्कम आणि तेवढाच खर्च होत असेल तर काय म्हणावे अशीच परिस्थिती राहिली तर सर्वाधिक वाईट अवस्था कांदा उत्पादकांची होणार आहे.

Leopard News: रात्री अन् दिवसा बिबट्याचा खेळ; ‘या’ जिल्ह्यातील 105 गावांमध्ये दहशत

सात वर्षापासून कांद्याला दर नाही

गेल्या सहा ते सात वर्षांपासून कांद्याचे दर वाढलेल नाहीत, सध्या कांद्याला मिळणारा दर म्हणजे एवा रुपया खर्च आणि उत्पन्न 12 आणे अशी स्थिती आहे त्यामुळे कांदा उत्पादन घेणे म्हणजे कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याच्या मार्गाने अशीच आहे. कांद्याला किमान 3 हजार रुपयांपेक्षा अधिक दर देऊन निर्यात बंदी उठवली तरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगल दिवस येतील असे वळती (ता. आंबेगाव) येथील कांदा उत्पादक शेतकरी धोंडीभाऊ रामभाऊ भोर यांनी सांगितले, कांदा उत्पादनाला प्रति एकरी 40 ते 50 हजार रुपयाहून अधिक खर्च येत आहे. त्यातून दहा पंधरा टणांपर्यंत उत्पादन निघते काही दिवसांपासून मिळणारा दर पाहता पाच महिने मेहनतीने पिकवलेल्या कांद्याला कांद्याचा खर्चही निघत नाही. सरकारचे धोरणा अत्यंत चुकीचे आहे त्यामुळे शेतकरी कोलमडून पडला असल्याचे जाधववाडी (ता. अम्बेगाव) येथील शेतकर आणि उपसरपंच संपतराव जाधव यांनी म्हटले आहे.

 

Web Title: Onion farmers in distress as prices crash ambegaon growers struggle to recover costs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2026 | 04:28 PM

Topics:  

  • Agriculrture News
  • Crisis on farmers
  • onion farmers

संबंधित बातम्या

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद
1

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

किती ते दुर्दैव! व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याच्या कष्टाची चेष्टा; 1 किलो कांद्याला मिळतोय फक्त 1 रुपयांचा भाव
2

किती ते दुर्दैव! व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याच्या कष्टाची चेष्टा; 1 किलो कांद्याला मिळतोय फक्त 1 रुपयांचा भाव

Kolhapur News : पडीक जमिनीवर उगवलं हिरवंगार सोनं; नापीक 30 गुंठेक्षेत्रात सेंद्रिय खतावर केली शेतीची वाढ
3

Kolhapur News : पडीक जमिनीवर उगवलं हिरवंगार सोनं; नापीक 30 गुंठेक्षेत्रात सेंद्रिय खतावर केली शेतीची वाढ

Afghan Raisins Scam: अफगाण बेदाण्यामुळे तासगावचा द्राक्ष उद्योग संकटात; दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची तयारी
4

Afghan Raisins Scam: अफगाण बेदाण्यामुळे तासगावचा द्राक्ष उद्योग संकटात; दोषी व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.