रत्नागिरीत बिबट्याची दहशत (फोटो- सोशल मीडिया)
रत्नागिरी जिल्ह्यातील १०५ गावांमध्ये बिबट्याची दहशत
संगमेश्वर तालुक्यात वाढली प्रचंड दहशत
श्वानांवर, जनावरांवर माणसांवरही हल्ले सुरूच
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील विविध भागांत बिबट्याचा वावर वाढत असल्याचे समोर आले आहे, स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या तक्रारींची वन विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. वन विभागाने प्रत्यक्ष जागेवर जाऊन खात्री केल्यानंतर, ज्या गावांमध्ये बिबट्या दृष्टीस पडला आहे किंवा त्याचा वावर आहे, अशा गावांची अधिकृत यादी रत्नागिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये १०५ गावांचा समावेश असून रत्नागिरी तालुक्यात सर्वांत जास्त गावांचा समावेश आहे.
रात्रीच्या वेळी एकटे – बाहेर पडणे टाळावे…
राजापूर तालुक्यात पेंडखळे, सागवे, केरवण, भू भानवली, नाटे, तुळरावडे, शिवणे, वहदहसोक, कोडडे, ओणी, वाटूक, आडिवरे, ताम्हाण, रत्नागिरी तालुक्यात जाकादेवी परिसर, जयगड, साडेलवण, कोतवडे, करबुडे, हातखंबा, फणसवळे, निवली, पानवल, चाफेरी, कचरे, गणपतीपुळे, निपैडी, भगवंतीनगर, नेवरे, जाकादेवी, ओरी, वेतोशी, काळबादेवी, चाफे, ठंडी, वरवते, मालगुड, भंडारपुळे जावरुण, भोके, रत्नागिरी परिसरात खानू, पाली, नाणीज, उंबरे, पावस, हरवेरी, टिके, टैभ्ये नावणे, जुचे, करला, फणसोप, कोळंबे, गोळए, गावखडी, मेवीं, पूर्णगड, गावडेआबरें, दाभिल, आंजारी, मावळंगे, हातिस, विवखरी, सोमेश्वर, बाळके, केळवणे, चरबेली, डोळस, कुवारबाव, मिरजोळे या गावांचा समावेश आहे.
Leopard News: धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडले खरे पण…; देवरुखमध्ये घडले काय?
श्वानांवर, जनावरांवर माणसांवरही हल्ले सुरूच
त्यामुळे बिबटे आता पक्षाच्या शोधात बेट मानवी वस्तीमध्ये शिरत आहे आणि त्याचे हे प्रमाण वाढत आहे. वारंवार कुत्र्यावर, जणावरावर आणि कधी कधी माणसांवरही हल्ले झाल्याच्या घटना सुरूच आहेत. त्यामुळे बिबट्धाची या भागांमध्ये प्रचंड दहशत निर्माणा झाली आहे, रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकाऱ्यांनी बिबट्याचा बदर असलेल्या गादांची नाचे जाहीर केली आहेत.
Kolhapur News: आम्ही जगायचं की मरायचं? पन्हाळा तालुक्यात वन्य प्राण्यांची दहशत, शेतकऱ्यांचा आक्रोश
संगमेश्वर तालुक्यात वाढली प्रचंड दहशत
नागरिकांनी सतर्क राहावे आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी परिक्षेत्रामध्ये रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या तालुकांच्या समावेश आहे. या तालुक्यांमध्ये सध्या विवट्यांची प्रचंड दहशत आहे. परिक्षेत्रात साधारण १०० ते सव्वाशे बिबटे असण्याची शक्यता वन विभागाने वर्तविली आहे. एवढेच नव्हे तर त्यांचा जंगलातील अधिवास सुमारे आठ ते दहा किमीचा असतो. * परंतु बिबट्यांची संख्या वाढल्याने त्यांचा अधिवास घटला असून तो आता ५ किमीच्या दरम्यान आला आहे, असे वन विभागाचे म्हणणे आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






