Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुन्नर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात; दर कोसळल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

पुणे जिल्ह्यातील ‘कांद्याचे आगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 22, 2026 | 12:30 AM
कांद्याला प्रतिक्विंटल २,००० रुपये अनुदान देण्याची उत्पादकांची मागणी

कांद्याला प्रतिक्विंटल २,००० रुपये अनुदान देण्याची उत्पादकांची मागणी

Follow Us
Follow Us:

ओतूर/ मनोहर हिंगणे : पुणे जिल्ह्यातील ‘कांद्याचे आगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नर तालुक्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी भीषण आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. एकेकाळी समृद्धीचे प्रतीक असलेला उन्हाळी कांदा आज शेतकऱ्यांसाठी तोट्याचा व्यवहार ठरत आहे. ओतूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या कांद्याला प्रतिकिलो अवघे ९ ते १२ रुपये इतकाच दर मिळत आहे. या दरामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

 

यंदा अनुकूल हवामानामुळे कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, बाजारात आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. जुन्नर तालुक्यातील ओतूर, रोहोकडी, आंबेगव्हाण, पाचघर, आहिनवेवाडी, उदापूर, डिंगोरे, उंब्रज, खामुंडी, डुंबरवाडी, धोलवड आणि नेतवड ही गावे कांदा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील कांद्याला देशांतर्गत तसेच बेंगळुरु, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि आखाती देशांत मोठी मागणी असते.

तथापि, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरात या राज्यांतही यंदा कांद्याचे उत्पादन वाढल्याने स्पर्धा तीव्र झाली आहे. त्यातच केंद्र सरकारच्या अस्थिर निर्यात धोरणामुळे निर्यात जवळपास ठप्प झाली आहे. वारंवार बदलणारे नियम आणि निर्बंध यामुळे निर्यातदारांनी सावध भूमिका घेतली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षांमुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली असून, गॅस तुटवड्याचाही परिणाम दिसून येत आहे. परिणामी, भारतीय कांदा जागतिक बाजारात महाग ठरत असून, स्थानिक बाजारात साठा वाढत आहे. दरम्यान, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरी यांचे दर दुपटीने वाढले आहेत. एका एकरासाठी सुमारे ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत खर्च येत आहे. सध्याच्या बाजारभावात हा खर्च वसूल करणेही अशक्य झाले आहे. “किमान वाहतूक खर्च तरी निघेल का?” असा सवाल करत शेतकरी आपली व्यथा मांडत आहेत. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

“गेल्या दोन वर्षांपासून आम्ही कांद्याला भाव मिळेल या आशेवर आहोत. ९ रुपये किलो भावात आमचे बी-बियाणे आणि खतांचे पैसेही निघत नाहीत. घराचं रेशन, मुलांचे शिक्षण आणि बँकांचे कर्ज कसं फेडायचं? सरकारने तात्काळ किमान २० रुपये हमीभाव दिला पाहिजे, अन्यथा जुन्नरचा शेतकरी रस्त्यावर उतरेल.” — सीताराम डुंबरे, शेतकरी (ओतूर)

“आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी कमी”

“आम्ही कांदा खरेदी करायला तयार आहोत, पण पुढे पाठवण्यासाठी मार्केट नाही. युद्धामुळे शिपिंग कंटेनर्सचे भाडे वाढले आहे आणि गॅस तुटवड्यामुळे युरोप-आखाती देशांतील बाजारपेठ मंदावली आहे. स्थानिक बाजारात आवक प्रचंड आहे, त्यामानाने उठाव नसल्याने दरांवर दबाव आहे.” अशी प्रतिक्रीया कांदा व्यापारी शकील तांबोळी यांनी दिली.

“जेव्हा शेतकऱ्याच्या चाळीत कांदा असतो, तेव्हा सरकार निर्यातीवर बंदी घालते किंवा जास्तीचे शुल्क लावते. जेव्हा माल संपतो, तेव्हा भाव वाढतात. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी कायमस्वरूपी निर्यात धोरण हवे. ओतूर पट्ट्यातील शेतकरी आज कर्जबाजारी झाला असून, त्याला सरकारकडून आधार मिळणे गरजेचे आहे.” — ,धनंजय घोलप युवा कांदा उत्पादक (रोहोकडी)

“जुन्नरचा कांदा टिकायला उत्तम असतो, त्यामुळे कर्नाटक आणि गुजरात व दिल्ली बाजारपेठेत याला मागणी असते. मात्र, सध्या ट्रान्सपोर्टेशनचे दर वाढल्याने परराज्यातील व्यापारी कमी दरात माल मागत आहेत. जोपर्यंत निर्यात सुलभ होत नाही, तोपर्यंत दरात मोठी सुधारणा होणे कठीण दिसत आहे.” अशी प्रतिक्रीया दिपक पाडवे (आडते व व्यापारी, ओतूर) यांनी दिली आहे.

कांदा उत्पादकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे

जुन्नर तालुक्यातील शेतकरी आज दुहेरी कात्रीत सापडला आहे. एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे कोसळलेले बाजारभाव. सरकारने केवळ आश्वासने न देता, कांदा उत्पादकांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे आणि निर्यातीबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. जर वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत, तर ही आर्थिक टंचाई ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीच्या खाईत लोटू शकते.

Web Title: Onion farmers in junnar taluka are in financial distress due to falling onion prices

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Onion Market

संबंधित बातम्या

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला
1

बीड हादरलं! शिंदे गटाचे बडे नेते शिवाजीराव शिंदे यांची आत्महत्या; 4 महिन्यांपूर्वी झाला होता प्राणघातक हल्ला

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
2

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
3

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट
4

आधी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर तोडगा काढा, मगच…; पवना जलवाहिनीवर सुनील शेळकेंची भूमिका स्पष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.