Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुथडी भरलेली इंद्रायणी क्षणभर थांबली! वारकरी विठूनामात दंग; संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरीकडे प्रस्थान

प्रस्थानानंतर माऊलींची पालखी आजोळघरी दर्शन मंडप इमारत येथे गांधीवाड्यात विसावली. पहिला मुक्काम आळंदी येथेच असून, गुरुवारी (दि. ९ जुलै) सकाळी ६ वाजता पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 08, 2026 | 08:31 PM
दुथडी भरलेली इंद्रायणी क्षणभर थांबली! वारकरी विठूनामात दंग; संत ज्ञानेश्वर माऊलींचे पंढरीकडे प्रस्थान
Follow Us
Follow Us:
  • आळंदीत  ‘ज्ञानोबा माऊली’चा जयघोष
  • मर्यादित उपस्थितीत प्रस्थान सोहळा
  • पारंपारिक पद्धतीने पूजा व नगरप्रदक्षिणा
आळंदी/ बद्रीनारायण घुगे: वरुणराजाच्या सरी झेलत ‘माऊली… माऊली… ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा अखंड जयघोष करत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने बुधवारी सायंकाळी (दि. ८ जुलै) देऊळवाड्यातून पंढरीच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

पहाटे मंदिर प्रदक्षिणा

सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पालखी वीणा मंडपातून निघून मंदिर प्रदक्षिणा करत भरावरस्ता, भैरवनाथ महाराज चौक, हजेरी मारुती, चावडी चौक आणि महाद्वार चौक मार्गे दर्शन मंडप इमारतीत गांधीवाडा येथे मुक्कामासाठी विसावली. त्यानंतर श्रींची समाज आरती झाली. वारकऱ्यांचा भजनाचा उत्साह परमोच्च होता. वरुणराजाच्या सरी झेलत भजनी मंडळी नाचत-गात, विविध वारकरी खेळ खेळत माऊलींच्या जयघोषात तल्लीन झाली होती.

याप्रसंगी प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे, पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार, पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर, व्यवस्थापक ज्ञानेश्वर विर, खासदार श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायकुमार चौबे आदी मानकरी, खांदेकरी व आळंदीकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा’! अलंकापुरीतून माउलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

मर्यादित वारकऱ्यांमध्ये प्रस्थान सोहळा

पूरस्थितीमुळे यंदाचा पालखी प्रस्थान सोहळा मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. माऊली मंदिर आणि प्रशासनाने सर्व वारकरी व भाविकांना पालखी प्रस्थानासाठी आळंदीत येऊ नये, असे आवाहन केले होते. संस्थानच्या निर्णयानुसार रथापुढील २७, रथामागील २० आणि पोटभागातील दिंडी अशा एकूण ५६ दिंड्यांमधून मर्यादित वारकऱ्यांना प्रवेश देण्यात आला. याशिवाय दिंडीप्रमुख, मानकरी, सेवेकरी, कर्मचारी, पोलीस, आरोग्य व स्वच्छता यंत्रणा यांच्यासह सुमारे २ हजार व्यक्तींच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.

मंदिरात प्रवेश करताच वारकऱ्यांचा उत्साह शिगेला

दिंडी क्रमांक असलेली पाटी, झेंडेकरी, विणेकरी, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, पखवाज वादक, टाळकरी अशा वारकऱ्यांच्या दिंड्या क्रमाने मंदिरात प्रवेश करताच उत्साह शिगेला पोहोचत होता. ‘हो… हो…’ असा जयघोष करत, ‘ज्ञानोबा तुकाराम’ गजरात पाऊली खेळत वारकरी मंदिर प्रदक्षिणा करत होते.

Ashadhi Wari 2026: वारकऱ्यांनो आळंदीत येऊ नका! इंद्रायणीला महापूर, देवस्थानचे आवाहन

पहिला मुक्काम गांधीवाड्यात

प्रस्थानानंतर माऊलींची पालखी आजोळघरी दर्शन मंडप इमारत येथे गांधीवाड्यात विसावली. पहिला मुक्काम आळंदी येथेच असून, गुरुवारी (दि. ९ जुलै) सकाळी ६ वाजता पालखी पुणे मुक्कामाकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, पुरामुळे पालखी मार्गावरील पुलाचे नुकसान झाले असून त्याची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू आहे. पूल दुरुस्त न झाल्यास मरकळ रस्त्याने चऱ्होली मार्गे पालखी पुणे रस्त्यावर येऊन पुढे मार्गस्थ होणार आहे.

Web Title: Palkhi of sant dnyaneshwar maharaj departs from alandi amidst heavy rain and jubilant cheers of warkaris

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • alandi
  • Ashadhi Wari
  • Dnyaneshwar Maharaj Palkhi
  • Saint Dnyaneshwar Mauli

संबंधित बातम्या

स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारीसाठी प्रशासनाची तयारी! चंद्रभागा नदीपात्रात ५० स्वच्छता कर्मचारी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी नियोजन
1

स्वच्छ पंढरपूर, स्वच्छ वारीसाठी प्रशासनाची तयारी! चंद्रभागा नदीपात्रात ५० स्वच्छता कर्मचारी, ३० ते ३२ लाख भाविकांसाठी नियोजन

Alandi : आळंदीत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी; मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज…
2

Alandi : आळंदीत पालखी प्रस्थानाची जय्यत तयारी; मंदिर समिती आणि प्रशासन सज्ज…

Gajanan Maharaj Palkhi: शेगावहून संत गजानन महाराजांची पालखी सर्वांत आधी निघण्यामागे काय आहे कारण, जाणून घ्या
3

Gajanan Maharaj Palkhi: शेगावहून संत गजानन महाराजांची पालखी सर्वांत आधी निघण्यामागे काय आहे कारण, जाणून घ्या

Ashadhi Ekadashi 2026: ग्लोबल दिंडी’ पंढरपूरच्या वाटेवर! युरोप ते पंढरी… २५ जुलैला दाखल होणार परदेशी वारी
4

Ashadhi Ekadashi 2026: ग्लोबल दिंडी’ पंढरपूरच्या वाटेवर! युरोप ते पंढरी… २५ जुलैला दाखल होणार परदेशी वारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.