Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टंचाईत सासवडला गराडे अन् घोरवडी धरणातून पाणी देऊ नका; आढावा बैठकीत पंचायत समिती सदस्यांची मागणी

सासवडला गराडे आणि घोरवडी धरणातील दिले जाणारे पाणी तातडीने बंद करावे, अशी मागणी माणिकराव निंबाळकर यांच्यासह इतर सदस्यांनी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 07, 2026 | 02:54 PM
टंचाईत सासवडला गराडे अन् घोरवडी धरणातून पाणी देऊ नका; आढावा बैठकीत पंचायत समिती सदस्यांची मागणी

टंचाईत सासवडला गराडे अन् घोरवडी धरणातून पाणी देऊ नका; आढावा बैठकीत पंचायत समिती सदस्यांची मागणी

Follow Us
Close
Follow Us:

सासवड : सासवडला वीर, गराडे, घोरवडी या धरणातून पाणी पुरवठा सुरु आहे. सध्या पुरंदर तालुक्यात यात्रांचा हंगाम सुरु आहे. टंचाई परिस्थितीत अनेक गावच्या पाणीयोजना बंद होण्याच्या अवस्थेत आहेत. सासवडला घोरवडी आणि गराडे धरणातून पाणी दिल्यास टंचाईला तोंड द्यावे लागेल. वीर धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने वीर धरणावरून सासवडला पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करावा. सासवडला गराडे आणि घोरवडी धरणातील दिले जाणारे पाणी तातडीने बंद करावे, अशी मागणी माणिकराव निंबाळकर यांच्यासह इतर सदस्यांनी केली.

 

सासवड येथील पंचायत समिती सभागृहात तहसीलदार विक्रम राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीचे आयोजन केले होते. पंचायत समितीचे सभापती अमित झेंडे, उपसभापती प्रवीण जगताप, माणिक निंबाळकर, माऊली यादव, सायली शिंदे, स्मिता निगडे, अर्चना कटके, मोनिका कांबळे, हरिभाऊ लोळे, रुपाली झेंडे, प्राजक्ता दुर्गाडे, प्रणोती श्रीश्रीमाळ, रितेश मुंढे आदी उपस्थित होते.

१३ गावे आणि ३५ वाड्यांवरील विविध ठिकाणावरून गाळ काढण्याची कामे आहेत. ११ गावांमधील विहिरीं अधिगृहित करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. ५२ विंधन विहिरी दुरुस्त करण्याचे प्रस्ताव आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीपूर्वी प्रशासक असल्याने ग्रामसेवकांनी विकासकामे गांभीर्याने केली नसल्याचे बहुसंख्य सदस्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच पाणी पुरवठा उपअभियंता रितेश मुंढे यांच्या माहितीचा आधार घेत हरिभाऊ लोळे यांनी ग्रामसेवकांना चांगलेच फैलावर घेतले आहे. १५ व्या वित्त आयोगातून पाणी योजनेची कामे शक्य होती. योजनेचे वीजबिल त्यातून भरणे शक्य होते. त्यामुळे ग्रामसेवकाना काम करायचे नसेल आणि लोकांना त्रास देणार असाल तर गाव सोडून खुशाल निघून जावे, असा इशाराच हरिभाऊ लोळे यांनी दिला आहे.

पुरंदरच्या पूर्व भागात टंचाईचे प्रमाण खूप

पुरंदरच्या पूर्व भागात टंचाईचे प्रमाण खूप आहे. विहिरी, ओढे, नाले कोरडे झाले आहेत. काही दिवसांत टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पुरंदर उपसा योजनेच्या पाण्याने सर्व बंधारे भरून घेतल्यास विहिरीतील पाणीसाठा वाढेल. पुढील काही दिवस टिकून राहिल्यास टंचाई फारशी जाणवणार नाही. असे पंचायत समिती सदस्य माऊली यादव यांनी सांगितले.

दौंडज, कर्नलवाडी, गुळूंचे, हरगुडे, मांढर, सिंगापूर, राजेवाडी, जेऊर, घेरा पुरंदर, पिसुर्टी या गावांतील टंचाई कामांचे प्रस्ताव आहेत. दरम्यान ३१ मार्चपर्यंत जिल्हा परिषदेतून मंजुरी देण्याची मुदत होती. मात्र, ३१ मार्चची मुदत संपल्याने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावे लागतील. -रितेश मुंढे, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग

हे सुद्धा वाचा : नव्या पिढीची संस्कृतीकडे ओढ; तरुणांच्या सहभागातून परंपरेला नवा श्वास; अनुभवाधारित उपक्रमांना प्रतिसाद

Web Title: Panchayat samiti members have demanded that water not be provided to saswad from garade and ghorawadi dams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 02:54 PM

Topics:  

  • Saswad
  • Saswad News
  • Water Issue

संबंधित बातम्या

गुंजवणीच्या पाण्यासाठी मी किडनी घालवली, पण…; विजय शिवतारेंनी रुग्णालयातून व्यक्त केल्या भावना
1

गुंजवणीच्या पाण्यासाठी मी किडनी घालवली, पण…; विजय शिवतारेंनी रुग्णालयातून व्यक्त केल्या भावना

बगाड फिरवून सासवड ग्रामदेवतेच्या यात्रेस सुरुवात, उत्सव मूर्तींना अभिषेक घालून महापूजा; भाविकांची मोठी गर्दी
2

बगाड फिरवून सासवड ग्रामदेवतेच्या यात्रेस सुरुवात, उत्सव मूर्तींना अभिषेक घालून महापूजा; भाविकांची मोठी गर्दी

विजय शिवतारे यांना कन्या ममता शिवतारे यांच्याकडून किडनी दान; पतीसह कुटुंबियांनी दिला आधार
3

विजय शिवतारे यांना कन्या ममता शिवतारे यांच्याकडून किडनी दान; पतीसह कुटुंबियांनी दिला आधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.