पर्वती विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: राज्यात विधनसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. दरम्यान अनेक उमेदवारांसामोर आपापल्या मतदारसंघात एक नवीनच अडचण उभी राहताना दिसून येत आहे. एकाच नावचे अनेक उमेदवार एकाच मतदारसंघात पाहायला मिळत आहेत. तासगाव कवठेमहाकाळ मतदारसंघात देखील एकूण ४ रोहित पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे पुण्याच्या पर्वतीविधानसभेत देखील अशीच स्थिती पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या पर्वती मतदारसंघातील उमेदवार अश्विनी कदम यांच्याच नावाच्या आणखी दाेन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. अश्विनी कदम नावाच्या तीन उमेदवार झाल्याने पक्षाचे चिन्ह जास्त पाेहचविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकरिता २९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत उमेदवारांचे २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. १९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. बुधवारी अर्जाची छाननी पार पडली. ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत असून यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर केली जाणार आहे. या मतदारसंघातील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवार अश्विनी कदम यांची डाेकेदुखी वेगळ्या कारणाने वाढली आहे. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये अश्विनी कदम यांच्या नावाचे साधर्म्य असलेल्या आणखी दाेन उमेदवार आहे. यामध्ये अश्विनी नितीन कदम आणि दुसऱ्या अश्विनी अनिल कदम अशी इतर दाेन उमेदवारांची नावे आहेत.
अश्विनी नितीन कदम नावाच्या २ उमेदवार आणि अश्विनी अनिल कदम नावाचे १ उमेदवार अाहेत. एकाच नावाचे तीन उमेदवार निवडणूकीला सामोरे जात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या उमेदवार अश्िवनी कदम यांनी मागील विधानसभा निवडणुक लढविली अाहे, त्यामुळे त्यांची साधारण अाेळख मतदारांना अाहे. परंतु, नावातील साधर्म्यामुळे मतदारांचा गाेंधळ हाेण्याची शक्यता अाहे. यामुळे कदम यांना पक्षाचे ‘तुतारी’ हे चिन्ह अािण छायाचित्र मतदारांपर्यंत पाेचविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार अाहेत. नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ‘ तुतारी ‘ चिन्हाचा ‘ पिपाणी ‘ या चिन्हाने अनेकांचा खेळ बिघडवला होता. तिन्ही उमेदवारांचे नाव आणि आडनावही एकच असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होऊ शकतो. पर्वती विधानसभा मतदारसंघांत एक सारख्या वाटणाऱ्या नावांचा घोळ नेमका योगायोग की जाणून – बूजून आखलेला राजकीय डाव ? हे लवकरच सिद्ध होईल.
जुन्नरमध्ये ही एकाच नावाचे तीन उमेदवार
जुन्नर विधानसभा मतदारसंघात शरद सोनवणे या नावाचे तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले असून यामध्ये माजी आमदार शरद भीमाजी सोनवणे यांच्यासह शरद शिवाजी सोनवणे व शरद बाबासाहेब सोनवणे या दोन अपक्षांचे उमेदवारी अर्ज आज छाननी प्रक्रियेमध्ये वैध ठरले आहेत. या मतदारसंघात महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अतुल बेनके, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर, बहुजन समाज पार्टीचे जुबेर अस्लम शेख तसेच देवराम लांडे हे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवडणूक लढवत असून या चार राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे अधिकृत उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यात आले.