Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MSRTC E-Shivneri: चार्जिंगअभावी ‘शिवनेरी’ प्रवास अर्धवट; प्रवाशांची होतेय प्रचंड गैरसोय

पुण्यातील वाहतूक मार्गांवर सध्या सुमारे ३० ई-शिवनेरी बस कार्यरत आहेत. ही सेवा सुरुवातीला पर्यावरणपूरक व आधुनिक अशी ओळख निर्माण करत असली तरी, सध्या बस चार्जिंगची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2025 | 09:00 PM
MSRTC E-Shivneri: चार्जिंगअभावी 'शिवनेरी' प्रवास अर्धवट; प्रवाशांची होतेय प्रचंड गैरसोय

MSRTC E-Shivneri: चार्जिंगअभावी 'शिवनेरी' प्रवास अर्धवट; प्रवाशांची होतेय प्रचंड गैरसोय

Follow Us
Follow Us:

पुणे: राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) ताफ्यात असलेल्या ‘शिवनेरी’ इलेक्ट्रिक बस सेवेमध्ये तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चार्जिंग अपुरी असल्याने अनेक वेळा प्रवास अर्धवट थांबवावा लागतो, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

पुण्यातील वाहतूक मार्गांवर सध्या सुमारे ३० ई-शिवनेरी बस कार्यरत आहेत. ही सेवा सुरुवातीला पर्यावरणपूरक व आधुनिक अशी ओळख निर्माण करत असली तरी, सध्या बस चार्जिंगची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. प्रवास सुरू असताना चार्जिंग संपल्यास चालकांना बस थांबवावी लागते. परिणामी, प्रवाशांचा वेळ व पैसा वाया जातो, तसेच त्यांच्या प्रवासाच्या योजनाही बिघडतात. यावर एमएसआरटीसीकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही, मात्र सूत्रांच्या माहितीनुसार बस चार्जिंगसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा अभाव व देखभालीतील हलगर्जीपणा यामुळे ही स्थिती उद्भवते आहे.

याबाबत बोलतांना एसटीचे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे म्हणाले, पुणे विभागातील इ बस पूर्ण क्षमतेने चार्ज झाल्याशिवाय आम्ही डेपोच्या बाहेर काढत नाही. कोणती समस्या आहे, याचा तपास केला जाईल. त्यानंतरच अधिक बोलणे योग्य ठरेल.

प्रमुख मुद्दे:

–       पुण्यात सध्या ३० ई-शिवनेरी बस कार्यरत

–       अनेक वेळा प्रवास अर्धवट थांबतो

–       चार्जिंग सुविधा अपुऱ्या

–       प्रशासनाकडून ठोस उपायांची प्रतीक्षा

मी ठाण्याहून पुण्याला येत असताना शिवनेरी बस पकडली.  पण वाटेत बस बंद पडल्याने आम्हाला इतर वाहनांचा वापर करून पुढील प्रवास पूर्ण करावा लागला. ही फार मोठी गैरसोय आहे.

आशिष पवार , प्रवासी.

लालपरीच्या अडचणीत वाढ! परिवहन विभागाची श्वेतपत्रिका जाहीर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बिघडत्या आर्थिक स्थिती लक्षात घेत राज्य सरकार आता त्यात पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोमवारी (२३ जून) एक सविस्तर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करणार आहेत, ज्यामध्ये महामंडळाची सध्याची आर्थिक स्थिती, तोटा, महसूल, खर्च, थकीत कर्जे आणि प्रलंबित देयके यांची संपूर्ण माहिती देण्यात आली. या श्वेतपत्रिकातून केवळ परिस्थिती सार्वजनिक होणार नाही तर महामंडळाला संकटातून बाहेर काढण्यासाठी संभाव्य उपाय देखील सुचवले जाणार आहेत.

MSRTC White Paper: लालपरीच्या अडचणीत वाढ! परिवहन विभागाची श्वेतपत्रिका जाहीर, किती कोटींचा तोटा? जाणून घ्या सविस्तर बातमी

एसटी महामंडळाला सध्या दररोज १ ते २ कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. आतापर्यंत तर एकूण तोटा १०,००० कोटींपेक्षा जास्त झाला आहे. मार्च २०२४ मध्ये भाड्यात सुमारे १५ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी, परिस्थितीत फारशी सुधारणा झालेली नाही. गेल्या ९ वर्षांत एसटी महामंडळाने ऑगस्ट २०२३ वगळता कोणत्याही महिन्यात नफा कमावलेला नाही. त्या एका महिन्यात ₹ १६.०८ कोटींचा नफा नोंदवला गेला. महामंडळावर सध्या कर्मचाऱ्यांचे ₹३,५०० कोटी आणि पायाभूत सुविधा आणि पुरवठा देणी म्हणून ₹७,००० कोटी देणे आहे.

Web Title: Passengers facing difficulties to technical glitch in electric shivneri msrtc bus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2025 | 09:00 PM

Topics:  

  • msrtc
  • Pune
  • st bus
  • st bus news

संबंधित बातम्या

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी
1

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद
2

Burger King FDA Action : पुढचा कुणाचा नंबर? FDA कडून Burger King ला मोठा दणका, 1992 पासून सुरु असलेलं आउटलेट बंद

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार
3

Pune Crime: ‘…माझ्याकडे ये,’ अल्पवयीन मुलीला मांडीवर बसवून…; पुण्यात अंधश्रद्धेच्या नावाखाली संतापजनक प्रकार, भोंदूबाबा फरार

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट
4

Maharashtra Weather Forecast Today: कोकण आणि घाटमाथ्यावर मुसळधार!; विदर्भाला विजांच्या कडकडाटासह यलो अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.