Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड शहराचा होणार कायापालट; रस्ते रुंदीकरण, मेट्रो मार्गाचे सुशोभीकरण अन्…

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांच्या उपसूचनांचा पाऊस पाडला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या पायाभूत सुविधा आणि नामकरणाच्या अनेक उपसूचनांना मंजुरी देण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 21, 2026 | 01:09 PM
पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

पिंपरी-चिंचवडमध्ये अतिक्रमण कारवाई जोरात; अडीच महिन्यांत 820 ठिकाणं अतिक्रमणमुक्त

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी विविध विकासकामांच्या उपसूचनांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये चिंचवड येथील नियोजित ‘सिटी सेंटर’च्या जागेवर आता ‘अजितदादा पवार आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ’ उभारण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावासह शहराच्या पायाभूत सुविधा आणि नामकरणाच्या अनेक उपसूचनांना मंजुरी देण्यात आली आहे.

 

सिटी सेंटरऐवजी आता क्रीडा विद्यापीठ

सायन्स पार्कसमोरील महापालिकेच्या खाणीच्या जागेत दरवर्षी आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सिटी सेंटर’ उभारण्याचा मनोदय अंदाजपत्रकात व्यक्त केला जात असे. मात्र, आता या जागेचा वापर क्रीडा क्षेत्रासाठी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अनुराधा गोरखे सूचक आणि कुशाग्र कदम अनुमोदक असलेल्या या उपसूचनेनुसार, येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ साकारले जाणार आहे.

सांगवीतील वाहतूक कोंडी फुटणार; पुलाचेही नामकरण

सांगवी-बोपोडी दरम्यान मुळा नदीवर ६० कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात आला असला, तरी सांगवीतील अरुंद रस्त्यांमुळे त्याचा पूर्ण क्षमतेने वापर होत नव्हता. ही अडचण दूर करण्यासाठी शिवसृष्टी उद्यान परिसरातील रस्ता १८ मीटरपर्यंत रुंद करण्याच्या उपसूचनेला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, या पुलाला ‘सरकार शितोळे सेतू’ असे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

महत्त्वाचे इतर निर्णय

आरक्षण बदल : पवनानगर, काळेवाडी येथील उद्यानाचे आरक्षण (सर्व्हे नं. ८८ ते ९६) रद्द करून हे क्षेत्र आता निवासी क्षेत्रात समाविष्ट करण्यात आले आहे.

स्मारकासाठी निधी : निगडी प्राधिकरण येथील यशवंतराव चव्हाण स्मारकासाठी समितीला १ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

प्रशासकीय सुधारणा : स्थापत्य विभागातील कनिष्ठ अभियंता पदाच्या अर्हता व अनुभवात सुसूत्रता आणून ही पदे पदोन्नतीने भरण्याचा निर्णय झाला आहे.

सुशोभीकरण : दापोडी ते पिंपरी मेट्रो मार्गावरील खांबांचे सुशोभीकरण आणि सांगवी फाटा येथील महात्मा फुले उड्डाणपुलावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जाणार आहे.

थेट प्रक्षेपण : महापालिका सभेचे कामकाज पारदर्शक होण्यासाठी सभागृहातील दोन स्क्रीन सुरू करून सभेचे थेट चित्रीकरण केले जाईल.

नवे नामकरण सोहळे

सभेत विविध चौकांचे व शाळांचे नामकरण करण्याचा निर्णय झाला आहे. यामध्ये १. गोविंद गार्डन चौक (पिंपळे सौदागर) : गोविंद यशदा चौक. २. प्राथमिक शाळा (रहाटणी) : नारायण नढे प्राथमिक शाळा. ३. पिंपळे गुरव रस्ते विकास : रस्ते विकासासाठी जागा देणाऱ्या मालकांना योग्य नुकसान भरपाई देण्याच्या प्रस्तावावरही शिक्कामोर्तब करण्यात आले.

हे सुद्धा वाचा : ‘म्हणून जास्त उडायचं नसतं!…; रोहिणी खडसेंनी चाकणकरांच्या जखमेवर मीठ चोळलं

Web Title: Pimpri chinchwad city is set to be transformed as many development projects get approval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2026 | 01:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
1

Breaking News: मोठी बातमी! अखेर राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
2

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
3

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
4

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.