
पुणे महानगरपालिकेवर पुन्हा एकदा भाजपची सत्ता
अजित पवारांना पुणेकरांनी नाकारले
पुण्यात मुरलीधर मोहोळ यांची जादू कायम
Pune Municipal Election/Ajit Pawar: पुणे महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भाजपचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळत आहे. भाजपने पुणे महानगरपालिकेवर कमळ फुलवले आहे. पुण्यात भाजपने बहुमत गाठले आहे. अजित पवारांनी पुण्याची निवडणूक अत्यंत रंगतदार केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध अजित पवार यांच्यात हा सामना पाहायला मिळाला. अजित पवार यांनी दिलेली आश्वासने पुणेकरांनी नाकारली असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरम्यान अजित पवार यांचा पुण्यात सुपडासाफ होताना दिसून येत आहे.
पुणेकरांना मोफत मेट्रो प्रवास देण्याचे वचन अजित पवारआणि आपल्या जाहीरनाम्यात दिले होते. त्यानंतर देखील पुणेकरांनी भाजपच्या बाजूने कौल दिल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी अजित पवारांना धोबीपछाड दिल्याचे म्हटले जात आहेत. दरम्यान अजित पवारांचा पुण्यात पराभव कशामुळे झाला असे याबाबत काही कारणे समोर येत आहेत.
पुण्यात भाजपचा ठरला मोठा पक्ष
पुणे महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना व अजित पवार व शरद पवार यांच्या पक्षाची युती झाली होती. गेल्या काही वर्षांनी महापालिका निवडणूक होत असल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. महापालिका जिंकण्यासाठी अजित पवार पुण्यातच ठाण मांडून बसले होते. मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर त्यांचा सपशेल पराभव होताना दिसून येत आहे.
गोष्टी मोफत देण्याच्या घोषणा ठरली कारणीभूत
पुणे महानगरपालिकेत भाजपने 125 जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. दरम्यान भाजपने यंदाचा प्रचार विकास, वाहतूक कोंडी सोडवणे, नदी संवर्धन आणि अन्य गोष्टींवर केला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात 2 तए प्रचारसभा घेतल्या. त्यांनी आपल्या भाषणात केवळ विकासावर बोलल्याचे दिसून आले. दरम्यान अजित पवारांनी सत्तेत येण्यासाठी मेट्रोचा प्रवास मोफत देण्याची घोषणा पुणेकरांसाठी केली होती. पीएमपी प्रवास आणि अन्य गोष्टीची घोषणा करण्यात आली होती. मात्र पुणेकरांनी त्यांची जाहीरनामा सपशेल नाकारला असल्याचे दिसत आहे.
भाजप नेत्यांवरील टीका पडली महागात
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला होता. पुणे हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे भाजप नेत्यांवर टीका केल्याने देखील जनतेने त्यांना नाकारले असल्याचे कारण समोर येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी मारला मास्टरस्ट्रोक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात प्रचारसभ्य घेत पूर्णपणे विकासाचे व्हीजन मांडले. मात्र विरोधकांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. तसेच शेवटच्या टप्प्यात त्यांच्या अनेक अभिनेत्यांनी घेतलेल्या मुलाखती देखील पुण्यात प्रभावी ठरल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सहजरीत्या पुण्याचा विजय खेचून आणल्याचे म्हटले जात आहे.
पुण्यात भाजपच्या मदतीला संघ
29 महानगरपालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंवसेवक संघ देखील मैदानात उतरला असल्याचे म्हटले जाते. पुणे महानगरपालिका निवडणुकीत घरोघरी पोचण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक मैदानात उतरले होते अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच सूक्ष्म नियोजन आणि योग्य प्रचार यामुळे पुण्यात भाजपल फायदा झाल्याचे म्हटले जाते. तर याचा फटका अजित पवारांना बसल्याचे दिसून येत आहे.