Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMRDA कडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर; ३० महत्त्वाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध

पुणे ग्रामीण हद्दीतील १४ सुविधा भूखंड (Amenity Space) तसेच भांबुर्डा (शिवाजीनगर) येथील एक वाणिज्य भूखंडदेखील या ई-लिलावाचा भाग आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 15, 2025 | 02:35 AM
PMRDA कडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर; ३० महत्त्वाचे भूखंड ८० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर उपलब्ध
Follow Us
Follow Us:
  • ”पीएमआरडीए”कडून भूखंडांचा ई-लिलाव जाहीर 
  • महानगराच्या विकासाला ऐतिहासिक गती देण्यासाठी मोठा निर्णय 
  • ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे करण्यात आले आवाहन
पुणे: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) महानगराच्या विकासाला ऐतिहासिक गती देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पीएमआरडीएच्या मालकीचे असलेले पिंपरी-चिंचवड महानगरपालिका तसेच पुणे ग्रामीण हद्दीतील विविध उपयोगांचे एकूण ३० भूखंड प्रथमच ८० वर्षांच्या दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्यावर ऑनलाइन ई-लिलाव पद्धतीने वाटपासाठी उपलब्ध करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC) हद्दीतील भूखंडांमध्ये तीन शैक्षणिक वापराचे भूखंड, नऊ वाणिज्य व सार्वजनिक सुविधा भूखंड, एक वैद्यकीय वापराचा भूखंड, एक सार्वजनिक सुविधा (लायब्ररी/संगीत शाळा) भूखंड आणि एक फॅसिलिटी सेंटर भूखंड यांचा समावेश आहे. याशिवाय, पुणे ग्रामीण हद्दीतील १४ सुविधा भूखंड (Amenity Space) तसेच भांबुर्डा (शिवाजीनगर) येथील एक वाणिज्य भूखंडदेखील या ई-लिलावाचा भाग आहेत.

या भूखंडांचे वाटप पात्र आणि इच्छुक व्यक्ती अथवा संस्थांना ई-लिलावाद्वारे केले जाणार आहे. या ई-लिलाव प्रक्रियेच्या अटी व शर्तींची सविस्तर माहिती https://eauction.gov.in आणि पीएमआरडीएचे अधिकृत संकेतस्थळ www.pmrda.gov.in वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे महानगराच्या विकासाला हातभार लावण्यासाठी जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती आणि संस्थांनी या ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Devendra Fadnavis: पुणे महानगर क्षेत्रात 220 प्रकल्पांची कामे; 32 हजार 523 कोटींचा निधी मंजूर

प्रमुख तारखा आणि प्रक्रिया
1.नोंदणी व कागदपत्रे डाऊनलोड करण्याची मुदत: दि. १५ डिसेंबर २०२५, सकाळी १०.०० वाजेपासून ते दि. १३ जानेवारी २०२६, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत इच्छुक व्यक्ती आणि संस्थांना https://eauction.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
2.तांत्रिक बोलीदारांची घोषणा: तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरलेल्या बोलीदारांची घोषणा दि. २२ जानेवारी २०२६ रोजी केली जाईल.
3.लाईव्ह ई-लिलाव (Live Auction): अंतिम ई-लिलाव प्रक्रिया दि. २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून सुरू होईल.

CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील नागरी विकास केंद्रात मलनिसा:रण योजनांच्या 27 गावांमधील 1209.8 कोटींच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या कामांमुळे संबंधित गावातील 39 लाख 42 हजार लोकसंख्येला लाभ होणार आहे.

“PMRDA मधील 1209.08 कोटींच्या कामांना…”; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली मान्यता

प्राधिकरणाने अग्निशमन सेवा शुल्कापोटी जमा झालेल्या निधीच्या विनियोगासाठी पुणे शहराचा ‘अग्नी प्रतिबंधक उपाययोजना आराखडा ‘ तयार करावा, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विधानभवनातील मंत्री परिषद सभागृहात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची 13 वी सभा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.

Web Title: Pmrda announces e auction of plots pune and pcmc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • PCMC News
  • PMRDA
  • pune news

संबंधित बातम्या

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय
1

11th Admission: अकरावी प्रवेशाची विशेष गुणवत्ता यादी जाहीर! कॉलेज मिळालंय की नाही? त्वरित तपासा ‘हा’ पर्याय

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरून पिंपरी पालिकेत गोंधळ; विरोध डावलून 430 कोटींच्या ऐनवेळच्या विषयाला मंजुरी
2

इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पावरून पिंपरी पालिकेत गोंधळ; विरोध डावलून 430 कोटींच्या ऐनवेळच्या विषयाला मंजुरी

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांची करडी नजर; तीन दिवसांत तब्बल 2202 वाहनांवर कारवाई
3

काळ्या काचा, फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांची करडी नजर; तीन दिवसांत तब्बल 2202 वाहनांवर कारवाई

पुणेकरांनो, HSRP नंबर प्लेट अजूनही बसवली नाही तर आता कारवाई अटळ; पुन्हा मुदतवाढ नाहीच
4

पुणेकरांनो, HSRP नंबर प्लेट अजूनही बसवली नाही तर आता कारवाई अटळ; पुन्हा मुदतवाढ नाहीच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.