Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिंजवडी ‘IT पार्क’ घेणार मोकळा श्वास! वाढते अपघात रोखण्यासाठी PMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हिंजवडी परिसरात १० सप्टेंबर रोजी एका काँक्रीट मिक्सरखाली दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संबंधित वाहनचालकावर गुन्हा नोंदवण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 14, 2025 | 06:13 PM
हिंजवडी ‘IT पार्क’ घेणार मोकळा श्वास! वाढते अपघात रोखण्यासाठी PMRDA ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:

हिंजवडी आयटी पार्क परिसरात अवजड वाहनांमुळे वाढले अपघात
नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई
पीएमआरडीएचा इशारा 

पिंपरी: हिंजवडी आयटी पार्क परिसरात अवजड वाहनांमुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) निर्णायक पावले उचलली आहेत. परिसरात अवजड वाहनांच्या प्रवेशावर आता वेळेचे निर्बंध, चालकांची नशेची तपासणी आणि वाहतूक नियमांचे पालन या अटी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची कामे तात्पुरती थांबवण्यात येणार आहेत, असा इशारा पीएमआरडीएकडून देण्यात आला आहे.

अपघातांच्या मालिकेनंतर प्रशासन सजग

अवजड वाहनांमुळे हिंजवडी व आसपासच्या भागात गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले असून, काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आयटी कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी करत मोर्चा काढला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची व बांधकाम व्यावसायिकांची बैठक झाली. या बैठकीत हिंजवडी, माण, म्हाळुंगे परिसरात पोलिसांनी निश्चित केलेल्या वेळेतच अवजड वाहनांना प्रवेश द्यावा, असा निर्णय घेण्यात आला. तसेच वाहनचालक नशेत नसल्याची खात्री, वैध परवाना आणि संबंधित वाहनांची संपूर्ण माहिती प्रकल्पाच्या संकेतस्थळावर अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Ajit Pawar: “कोणीही काय मी आडवा आलो तरी ३५३…”; अजित पवारांकडून भल्या पहाटे अधिकाऱ्यांची शाळा

वाहतूक कोंडी आणि सुरक्षेचे प्रश्न गंभीर

हिंजवडी–माण हा भाग शहरातील प्रमुख आयटी पट्टा असून, सकाळी आणि सायंकाळी हजारो आयटी कर्मचारी प्रवास करतात. या गर्दीच्या वेळेत अवजड वाहने धावत असल्याने वाहतूक कोंडी, अपघात आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या परिसरात अनेक गृहप्रकल्प व व्यापारी प्रकल्पांची कामे सुरू आहेत. बांधकाम साहित्य – सिमेंट, लोखंड, गिट्टी इत्यादींच्या वाहतुकीसाठी अवजड वाहनांचा वापर आवश्यक असला, तरी त्यांची वेळ व मार्ग नियोजनाशिवाय हालचाल होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

काम थांबविण्याचा इशारा

हिंजवडी परिसरात १० सप्टेंबर रोजी एका काँक्रीट मिक्सरखाली दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर संबंधित वाहनचालकावर गुन्हा नोंदवण्यात आला. याआधारे सदर वाहन ज्या बांधकामासाठी कार्यरत होते, त्या प्रकल्पाची परवानगी स्थगित करण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर भाले यांनी दिली.

प्रशासनाचा इशारा : “सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा”

पीएमआरडीएने सर्व बांधकाम व्यावसायिकांना सूचना दिल्या आहेत की, पोलिसांनी आखून दिलेल्या वेळापत्रकानुसारच अवजड वाहने परिसरात आणावीत, चालक नशेत नसल्याची खात्री करून वाहतूक नियमांचे पालन करावे. संबंधित वाहनांची नोंद व परवाने अद्ययावत ठेवावेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बांधकाम प्रकल्पांवर थेट कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Pmrda decides to restrict heavy vehicles to prevent accidents in hinjewadi it park

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • Accident
  • Traffic Issue

संबंधित बातम्या

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक
1

Nagpur News : कोराडी उड्डाणपुलाला ‘ब्लॉक ‘चा ब्रेक

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
3

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
4

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.