Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune GBS Update: पुण्याच्या ‘या’ भागात उभा राहणार जलशुद्धीकरण प्रकल्प; ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर निर्णय

महापालिकेने खडकवासला येथील जलसंपदाच्या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठीचे पूर्वगणनपत्रक (एस्टिमेट) तयार करण्याचे काम सुरू आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2025 | 10:45 PM
Pune GBS Update: पुण्याच्या ‘या’ भागात उभा राहणार जलशुद्धीकरण प्रकल्प; ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

पुणे: सिंहगड रस्ता (नरवीर तानाजी मालुसरे रस्ता) वाढलेल्या गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या खडकवासला परिसरात महापालिकेकडून १०० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी २५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून प्रकल्पाच्या जागेसाठी महापालिकेकडून जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या नांदेड, नांदोशी, किरकटवाडी आदी भागांना नांदेड तसेच धायरीतील बारांगणी मळा येथील विहिरींमधून पाणीपुरवठा केला जातो. खडकवासला धरणातून बंदिस्त जलवाहिनीतून येणारे प्रक्रिया न केलेले पाणी (रॉ वॉटर) या विहिरीत सोडले जाते. त्यानंतर या विहिरींमध्ये केवळ ब्लिचिंग पावडर टाकून हे पाणी संबंधित गावांना वितरित केले जात होते. सिंहगड रस्ता परिसरात मागील दीड महिन्यापासून दुषीत पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जीबीएस आजाराचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेने येथील विहिरींवर ‘क्लोरिनेशन’ची यंत्रणा बसवली.

या पार्श्वभूमीवर या गावांसाठी स्वतंत्र जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याची मागणी केली जात होती. पूर्वी या गावांसाठी महापालिकेच्या वडगाव बुद्रुक येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसल्याने उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या गावांच्या परिसरातच जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचे आदेश दिले होते. या प्रकल्पासाठी जागा देण्याचे जलसंपदा विभागाने या बैठकीत मान्य केले होते. त्यासाठी पाचशे कोटी रुपये निधी देण्याचेही जाहीर केले होते.

पुण्यात हाहाःकार! धोका वाढला; GBS च्या रुग्णात वाढ, 73 जणांना बाधा तर 14 जण वेंटिलेटरवर

त्यानुसार महापालिकेने खडकवासला येथील जलसंपदाच्या जागेवर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यासाठीचे पूर्वगणनपत्रक (एस्टिमेट) तयार करण्याचे काम सुरू आहे. पूर्वगणन समितीच्या पुढील बैठकीत हे पूर्वगणनपत्रक मान्यतेसाठी सादर केले जाईल. त्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल, ’असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

महापालिकेत समाविष्ट झालेल्या नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, डीएसके विश्व, नऱ्हेचा काही भाग आणि लगतच्या परिसराला प्रक्रिया न केलेले पाणी (रॉ वॉटर) दिले जाते. मात्र, जीबीएसच्या पार्श्वभूमीवर या गावांसाठीही खडकवासला येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याचे काम लवकरच सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

– डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका.

Web Title: Pune corporation build 100 mld water project sinhgad road gbs update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • GBS virus
  • Pune
  • pune news
  • Pune Water News

संबंधित बातम्या

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…
1

ताम्हिणी घाटात ‘दुर्मिळ पाहुणा’; महाराष्ट्रात प्रथमच ‘युरेशियन ब्लॅक कॅप’ मादीचे दर्शन…

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा
2

Pune News : पुणेकरांनो थंडीत शेकोटी पेटवू नका! अन्यथा दंडात्मक कारवाई; महापालिकेचा अजब इशारा

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?
3

पुणे की शिमला? नागरिक गारठले; शहरात पुढील दोन दिवसांमध्ये…, कसे असणार तापमान?

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
4

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.