पुण्यात टॅंकरच्या फेऱ्या वाढल्या (फोटो- सोशल मिडिया)
पुणे: पुण्याच्या उशाला असलेल्या साखळी धरणामुळे पुणेकरांना पाणी टंचाईचा समाना करावा लागत नाही, असे म्हटले जाते. मात्र, हे खरं नाही. कराण 2024-25 या आर्थिक वर्षात तब्बल 4 लाख 88 हजार 236 टँकरच्या फैऱ्या झाल्या असून, यामध्ये टँकर माफिया सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. कारण ठेकेदार याद्वारे ३ लाख 99 हजार 80 टँकर तर पाणी भरना केंद्रावरुन चलन भरुन 55 हजार 73 टँकरच्या फैऱ्या झाल्या आहेत. तर पुणे मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने केवळ 34 हजार 80 टँकरच्या फैऱ्या झाल्या आहेत. त्यामुळे पुण्यात पाणी टंचाई नाही, असे सांगणाऱ्या पाणी पुरवठा विभागाचा दावा फोल ठरला आहे.
उन्हाच्या वाढच्या चटक्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पाण्याची मागणी वाढत आहे. शहरासाठी खडकवासला धरणसाखळी आणि भामा आसखेड प्रकल्पातून पाणी आणून ते महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते नळाद्वारे नागरिकांना वितरित केले जाते. जेथे पाणीपुरवठा होत नाही किंवा काही कारणाने पाणी पोहोचू शकलेले नाही, अशा ठिकाणी महापालिकेतर्फे मोफत टँकर दिले जातात. महापालिकेकडे टँकरची संख्या कमी असल्याने ठेकेदारांच्याही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. किमान आठ टँकर असलेल्या ठेकेदारांमार्फत अन्य ठिकाणी पाणी पोहोचवले जाते
मार्चमध्ये वाढले टँकर
मागील म्हणजेच 2023-25 या आर्थिक वर्षांत एकूण ४ लाख ३88 टँकर फेऱ्यांद्वारे पाणी पुरविले गेले होते. यात कंत्राटदारांच्या ३ लाख 45 हजार 846 टँकरचा समावेश आहे. या वर्षाच्या तुलनेत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण जवळपास ४ हजारांनी वाढले आहे. यंदा उन्हाचा चटका जानेवारीपासूनच जाणवू लागला आहे. आता त्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाण्याचीही मागणी वाढत आहे. महापालिकेने जानेवारीमध्ये ३९ हजार ६९२ टँकरफेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला आहे. तर फेब्रुवारीमध्ये ३८ हजार ५३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे. तर मार्चमध्ये सुमारे 48 हजार टँकरच्या फैऱ्या झाल्या आहेत. हे प्रमाण एप्रिलमध्ये वाढणार हे निश्चित आहे.
Pune Water News: पुण्यातील ‘या’ भागात पाण्याचा प्रश्न गंभीर; अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत
उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेसोबत पाण्याच्या टँकरची मागणीही वाढत आहे. शहरासह उपनगरामध्ये पाण्याची मागणी वाढली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
– प्रसन्नराघव जोशी, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका
‘या’ भागात पाण्याचा प्रश्न गंभीर
वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर विधानसभाध्यक्षांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वडगाव शेरीतील पाण्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अहवाल सादर करण्यात आला आहे,