Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Leopard Attack: दबक्या पावलांनी आला अन्…! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, वनविभागाने लावला पिंजरा

Pune Leopard Attack: जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील मेटांगळे शिवारात शेतातील कामासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याने अचानक झडप घातली. हल्ल्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटून विद्या आणि दत्तात्रय शिंदे रस्त्यावर पडले. मात्र विद्या शिंदे यांच्या पाठीवर असलेल्या फवारणी पंपामुळे बिबट्याला थेट हल्ला करता आला नाही....

  • By श्वेता झगडे
Updated On: Sep 10, 2026 | 03:23 PM
दबक्या पावलांनी आला अन्...! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, जुन्नरमध्ये थरार, वनविभागाने लावला पिंजरा (फोटो सौजन्य-ChatGPT)

दबक्या पावलांनी आला अन्...! दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप, जुन्नरमध्ये थरार, वनविभागाने लावला पिंजरा (फोटो सौजन्य-ChatGPT)

Follow Us
Follow Us:
  • दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याची झडप!
  • पाठीवरील फवारणी पंपामुळे महिलेचा जीव वाचला
  • दुचाकीवरून दाम्पत्य कोसळले
Pune Leopard Attack: शेतातील कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या दाम्पत्यावर रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील बोरी बुद्रुक येथील मेटांगळे शिवारात घडली. या हल्ल्यात दुचाकीवरील ताबा सुटल्याने पती-पत्नी रस्त्यावर कोसळले. सुदैवाने महिलेच्या पाठीवर असलेला फवारणी पंप बिबट्याच्या हल्ल्यात ढालीसारखा ठरल्याने मोठा अनर्थ टळला.

दुचाकीवर अचानक बिबट्याची झडप

विद्या दत्तात्रय शिंदे आणि त्यांचे पती दत्तात्रय बाळाजी शिंदे हे शेतातील कामासाठी दुचाकीवरून जात होते. मेटांगळे शिवारातून जात असताना रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर अचानक झडप घेतली. अनपेक्षित हल्ल्यामुळे दत्तात्रय शिंदे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दोघेही खाली पडले.

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

फवारणी पंपामुळे मोठा अनर्थ टळला

घटनेच्या वेळी विद्या शिंदे यांच्या पाठीवर शेतातील कामासाठी वापरण्यात येणारा फवारणी पंप अडकवलेला होता. त्यामुळे बिबट्याला त्यांच्या शरीरावर थेट हल्ला करता आला नाही. फवारणी पंपामुळे बिबट्याची झडप निष्फळ ठरली आणि त्यांचा जीव वाचला. मात्र दुचाकीवरून खाली पडल्यामुळे विद्या शिंदे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.

वनविभागाकडून परिसरात पिंजरा

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनपाल गणेश बागडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बिबट्याच्या वावरामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने वनविभागाने परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.

यावेळी रेस्क्यू टीमचे संतोष कुतळ, रोहित बोडके आणि जयेश भोर उपस्थित होते. बिबट्याच्या अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान जुन्नर परिसरात मानव-बिबट संघर्ष गंभीर बनला असून, 2021 पासून बिबट्यांच्या हल्ल्यांत 22 नागरिकांचा मृत्यू आणि 42 जण जखमी झाल्याची नोंद आहे. 2026 मध्ये आतापर्यंत जुन्नर वन विभागात एका मृत्यूची नोंद झाली आहे. बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाकडून संवेदनशील भागांत पिंजरे, एआय आधारित अलर्ट यंत्रणा आणि बचाव पथकांच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यापासून आता AI बेल्ट वाचवणार जीव! डॉ. पल्लवी नल्ले अन् टीमचा भारतीय पेटंट मंजूर

Web Title: Pune leopard attacks couple on bike at bori budruk junnar sprayer pump saves woman

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • Leopard Attack
  • maharashtra
  • Pune

संबंधित बातम्या

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?
1

Bhandara News: भंडारा जिल्ह्यात २६९ परवानाधारक सावकार! एकही तक्रार नाही; अवैध सावकारी नाही की तक्रारीच पोहोचत नाही?

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह
2

Dharashiv News: भूमिपूजनाला 12 वर्षे उलटली, समाजमंदिराचा पत्ताच नाही! आता त्याच जागेवर RO प्लांट; धाराशिव पालिकेवर प्रश्नचिन्ह

Electricity Workers: वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड! खासगीकरणाला नकार; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव
3

Electricity Workers: वीज कर्मचाऱ्यांच्या आशांना उजेड! खासगीकरणाला नकार; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘हरियाणा पॅटर्न’चा प्रस्ताव

Public Health Star Rating: आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत पुणे नवव्या स्थानी, सोलापूर राज्यात दुसरे; सातारा २२ व्या क्रमांकावर!
4

Public Health Star Rating: आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेत पुणे नवव्या स्थानी, सोलापूर राज्यात दुसरे; सातारा २२ व्या क्रमांकावर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.