Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Seized Pune: बंद गोडाऊन आणि शेतातील शेडमध्ये लपलं होतं कोट्यवधींचं कांड? महिनाभराच्या पाळतीनंतर पहाटे सव्वादोनला छापा अन्…

Seized Pune: पुण्याच्या कदमवाकवस्तीत बंद गोडाऊनमध्ये सुरू होतं मोठं कांड! महिनाभराच्या पाळतीनंतर पहाटे सव्वादोनला FDA आणि गुन्हे शाखेचा छापा; ११ लाखांच्या अवैध सुगंधित तंबाखू कारखान्याचा पर्दाफाश करत गोदाम सील!

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Nov 23, 2026 | 01:53 PM
Seized Pune: बंद गोडाऊन आणि शेतातील शेडमध्ये लपलं होतं कोट्यवधींचं कांड? महिनाभराच्या पाळतीनंतर पहाटे सव्वादोनला छापा अन्...

Seized Pune: बंद गोडाऊन आणि शेतातील शेडमध्ये लपलं होतं कोट्यवधींचं कांड? महिनाभराच्या पाळतीनंतर पहाटे सव्वादोनला छापा अन्...

Follow Us
Follow Us:
  • अवैध सुगंधित तंबाखू कारखान्यावर FDA व गुन्हे शाखेची धाड
  • तंबाखू, मसाला, मशीन व वाहनासह ११.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त
  • रोहित गुप्ताला ताब्यात घेऊन गोदाम सील केले व गुन्हा दाखल
Seized Pune: पुण्यातील लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती परिसरात एका बंद गोडाऊनमध्ये भलतंच कांड सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे तब्बल महिनाभर या ठिकाणावर पाळत ठेवली आणि अखेर रविवारी पहाटे छापा टाकला. या कारवाईत छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तयार करण्याच्या अवैध कारखान्याचा पर्दाफाश झाला आहे. अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या या संयुक्त कारवाईत ११ लाख १५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

हेही वाचा: Accident News: चालकाला चक्कर आली अन् बस थेट पुलाला धडकून पलटी! समृद्धी महामार्गावर रात्री ३ अपघातांचा थरार

महिनाभर पाळत अन् पहाटे सव्वादोनला छापा

कदमवाकवस्ती येथील शेतातील शेड आणि बंद पडलेल्या गोडाऊनमध्ये बेकायदा सुगंधित तंबाखूचे उत्पादन सुरू असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणावर महिनाभर बारीक पाळत ठेवली होती. खात्री झाल्यानंतर रविवारी पहाटे सव्वादोनच्या सुमारास एफडीए आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या या अवैध कारखान्याचा मोठा पर्दाफाश झाला.

पॅकिंग मशीन, मसाला आणि चारचाकी वाहन जप्त

रविवारी पहाटे पथकाने या गोडाऊनवर छापेमारी केली असता, तिथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि मसाला आढळून आला. पोलिसांनी गोडाऊनची अधिक सखोल तपासणी केली असता तंबाखू पॅकिंग करण्यासाठी वापरण्यात येणारी मशीन, पिशव्या, पॅकिंग बॉक्स तसेच एक चारचाकी वाहनही आढळून आले. या ठिकाणी अवैधरित्या तंबाखू तयार करून त्याचे पॅकिंग केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा: Fake Police Robbery: ६० लाखांची रोकड कोठून आली अन् रचलं कोणी षडयंत्र? बनावट पोलीस लूट प्रकरणात मुंबई पोलिसांचा सखोल तपास सुरू!

कारखाना आणि गोदाम सील; संशयित ताब्यात

या धडाकेबाज कारवाईत एकूण ११ लाख १५ हजार ७०० रुपयांची प्रतिबंधित तंबाखू आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी रोहित गुप्ता (वय २६) याला ताब्यात घेतले आहे. प्रशासनाने हे बेकायदा उत्पादन केंद्र आणि गोदाम सील केले असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यातील कोणत्या परिसरात अवैध तंबाखू कारखान्यावर छापा टाकण्यात आला?

    Ans: पुण्यातील लोणी काळभोर येथील कदमवाकवस्ती परिसरातील शेतातील शेड आणि बंद गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या अवैध सुगंधित तंबाखू कारखान्यावर छापा टाकण्यात आला.

  • Que: या कारवाईत किती किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे?

    Ans: एफडीए आणि पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित तंबाखू, मसाला, पॅकिंग मशीन आणि चारचाकी वाहनासह ११ लाख १५ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • Que: पोलिसांनी याप्रकरणी कोणाला ताब्यात घेतले आहे आणि पुढील कारवाई काय केली?

    Ans: पोलिसांनी या प्रकरणी रोहित गुप्ता (वय २६) या संशयिताला ताब्यात घेतले असून, हे अवैध उत्पादन केंद्र व गोदाम सील करून गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Pune loni kalbhor illegal scented tobacco factory raid fda crime branch seized sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • FDA Raid
  • illegal
  • Loni Kalbhor Police
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त
1

Pune FDA News : हेल्थ सप्लिमेंट्सवर आता FDA ची करडी नजर; पुणे विभागातील पाच आस्थापनांवर छापे, ३०.५७ लाखांचा साठा जप्त

पुण्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांना FDAचा दणका! सात महिन्यांत २६.३३ कोटींचे अन्नपदार्थ जप्त; ४०५ जणांना अटक
2

पुण्यात खाद्यपदार्थ विक्रेत्यांना FDAचा दणका! सात महिन्यांत २६.३३ कोटींचे अन्नपदार्थ जप्त; ४०५ जणांना अटक

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा
3

Satara News : पानटपऱ्यांमधून नशेचा धंदा खपवून घेतला जाणार नाही; पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा चालकांना थेट इशारा

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
4

पत्नीच्या चारित्र्यावर संशय, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून हत्या; पतीला न्यायालयाने सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.