Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महापौर मंजुषा नागपुरे यांची प्रशासनासोबत तातडीची बैठक; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनासोबत तातडीची आढावा बैठक महापौर कार्यालयात आयोजित केली. यावेळी पावसाळी आपत्तीवर तातडीच्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 26, 2026 | 12:25 PM
महापौर मंजुषा नागपुरे यांची प्रशासनासोबत तातडीची बैठक; अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

महापौर मंजुषा नागपुरे यांची प्रशासनासोबत तातडीची बैठक; अधिकाऱ्यांना दिले 'हे' महत्वाचे निर्देश

Follow Us
Follow Us:

पुणे : पुणे शहरात अलीकडील पावसामुळे विविध भागांत पाणी साचणे, रस्त्यांवर पाणी तुंबणे, नागरिकांच्या घरात पाणी शिरणे, झाडे कोसळणे, वाहतुकीवर परिणाम होणे, अशा घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी प्रशासनासोबत तातडीची आढावा बैठक महापौर कार्यालयात आयोजित केली. या बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त पवनीत कौर (जनरल) व अतिरिक्त महापालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर तसेच सर्व उपआयुक्त, विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

 

बैठकीदरम्यान टेकड्यांवरून वाहणारे पावसाचे पाणी थेट रस्त्यांमार्गे नागरिकांच्या घरात शिरत असल्याच्या तक्रारींची दखल घेत महापौरांनी नाराजी व्यक्त केली. मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाले सफाई आणि पावसाळी कामांबाबत प्रशासनाने तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश दिले. नाले सफाईसाठी दिलेल्या कंत्राटांची काटेकोर अंमलबजावणी करावी. संबंधित कंत्राटदारांकडे आवश्यक यंत्रसामग्री आहे का याची तपासणी करावी. कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारी निश्चित करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

पाण्याची नियमित तपासणी करावी

बैठकीदरम्यान महापौरांनी शहरातील तलावांमध्ये दूषित पाण्यामुळे मासे मृत्यू होत असून, पाण्याची नियमित तपासणी करावी, तलावातील पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, जलपर्णी निर्मूलनासाठी कार्यक्षम यंत्रणा वापरावी, तसेच त्याचे जैविक खतामध्ये रूपांतर करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधावा, पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पर्यावरणपूरक उपायांचा अभ्यास करून अंमलबजावणी करावी, अशा विविध सूचना त्यांनी केल्या.

पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक उपाययोजना पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास कमी करणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. कामात हलगर्जीपणा आढळल्यास संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. – मंजुषा नागपुरे, महापौर

हे सुद्धा वाचा : मुख्य लेखाधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करा, महापौरांचे प्रशासनाला आदेश; नेमकं प्रकरण काय?

पुण्यात पुढील तीन दिवस हलक्या पावसाची शक्यता

पुणे शहरात पुढील तीन दिवस दुपारी कडक उन्हाचा तडाखा आणि सायंकाळी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमानात हळूहळू घट होणार असून वातावरणातील हा विरोधाभास कायम राहणार आहे. शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून दुपारी तीव्र उष्णता आणि सायंकाळी ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची नोंद होत आहे. आगामी तीन दिवसांतही हेच चित्र कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Pune mayor manjusha nagpure has held an urgent meeting with the administration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2026 | 12:25 PM

Topics:  

  • Pune mahapalika
  • pune news
  • Rain News

संबंधित बातम्या

सासवडमध्ये पुणे ग्रामीण एटीएस पथकाची मोठी कारवाई; गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
1

सासवडमध्ये पुणे ग्रामीण एटीएस पथकाची मोठी कारवाई; गंभीर गुन्हयातील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू
2

पुणे जिल्ह्यातील अपघातांचे सत्र रोखण्यासाठी मोहीम; आरटीओकडून 151 ‘ब्लॅक स्पॉट’ची संयुक्त पाहणी सुरू

राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका, 173 लहान-मोठ्या जलाशयांपैकी 81 पूर्णपणे कोरडेच
3

राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका, 173 लहान-मोठ्या जलाशयांपैकी 81 पूर्णपणे कोरडेच

Pune News: कमाल! पहिल्याच प्रयत्नात ‘एमएमसीसी’चे  १२ विद्यार्थी झाले Chartered Accountant
4

Pune News: कमाल! पहिल्याच प्रयत्नात ‘एमएमसीसी’चे १२ विद्यार्थी झाले Chartered Accountant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.