Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ

Mhada Pune: ऑनलाईन पडताळणीत होणाऱ्या विलंबाबाबत अर्जदारांकडून मुदतवाढ मिळण्यासाठी सातत्याने विनंती केली जात होती. अर्जदारांची ही अडचण आणि मागणी विचारात घेऊन प्रशासनाने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2026 | 07:38 PM
पुणे ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज करण्यास १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

पुणे ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज करण्यास १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

Follow Us
Follow Us:
  • पुणे ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज करण्यास १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
  • ऑनलाईन कागदपत्र पडताळणीतील अडचणींमुळे निर्णय
  • प्रचंड प्रतिसाद आणि तांत्रिक अडचणी
पुणे/Mhada: पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्गत (म्हाडा) १५% सामाजिक व २०% सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास १५ (pune) ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) मा. ना. शिवाजी आढळराव पाटील यांनी दिली आहे.

प्रचंड प्रतिसाद आणि तांत्रिक अडचणी

या गृहनिर्माण योजनेसाठी २४ ऑगस्ट २०२६ रोजी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरातीनुसार २४ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:०० वाजेपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांकडून या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

मात्र, अर्जदारांनी ऑनलाईन अपलोड केलेले अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल) आणि उत्पन्नाचा दाखला यांची ‘MahaIT’ कडून, तसेच आयकराच्या विवरणपत्राची (Income Tax Return) ‘Income Tax’ विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने पडताळणी केली जाते. या पडताळणी प्रक्रियेला वेळ लागत असल्यामुळे अर्जदारांना फॉर्म भरताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत होता.

Mhada Pune: स्वप्नातले घर आता सत्यात येणार! म्हाडाच्या लॉटरीचा बिगुल वाजला; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

अर्जदारांच्या मागणीची दखल

ऑनलाईन पडताळणीत होणाऱ्या विलंबाबाबत अर्जदारांकडून मुदतवाढ मिळण्यासाठी सातत्याने विनंती केली जात होती. अर्जदारांची ही अडचण आणि मागणी विचारात घेऊन प्रशासनाने ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

MHADA Nashik: नाशिककरांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार! म्हाडाच्या ४१२ सदनिकांची संगणकीय सोडत उत्साहात

नवीन वेळापत्रक

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची वाढीव मुदत: १५ ऑक्टोबर २०२६ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत)
इच्छुक अर्जदारांनी या मुदतवाढीची नोंद घेऊन मुदतीत आपले ऑनलाईन अर्ज पूर्ण करावेत, असे आवाहन पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Pune mhada shivaji adhalrao patil extend date to 15 october 2026 for fill form housing lottery

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • MHADA Houses
  • MHADA Lottery 2026
  • pune news

संबंधित बातम्या

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास
1

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी
2

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

Katraj Dairy Milk Price Hike: ११ सप्टेंबरपासून दुधाला नवा खरेदी दर; कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ
3

Katraj Dairy Milk Price Hike: ११ सप्टेंबरपासून दुधाला नवा खरेदी दर; कात्रज डेअरीकडून दूध खरेदी दरात १ रुपयांची वाढ

BARTI Pune Contract Scam News: बार्टीच्या कंत्राटात गंभीर अनियमिततेचा आरोप; एकाच कंपनीला ९ वेळा मुदतवाढ
4

BARTI Pune Contract Scam News: बार्टीच्या कंत्राटात गंभीर अनियमिततेचा आरोप; एकाच कंपनीला ९ वेळा मुदतवाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.