Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप आणि शिवसेनेच्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 05, 2026 | 08:51 PM
PM Modi with Eknath Shinde

PM Modi with Eknath Shinde

Follow Us
Follow Us:
  • एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे तासभर चर्चा.
  • पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजपसोबतच शिवसेनेनेही दावा केला आहे.
  • मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा दिल्ली दौरा चर्चेत
 

Eknath Shinde Delhi Visit : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. मोदी आणि शिंदे यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप अधिकृतपणे समोर आलेलं नाही.

मात्र, आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंचा हा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारासोबतच राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबतही या बैठकीत चर्चा झाली असावी, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप-शिवसेनेचा दावा

आगामी विधान परिषद निवडणुकीत पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर मतदारसंघ महत्त्वाचे ठरणार आहेत. या दोन्ही मतदारसंघांवर भाजपने आधीपासूनच दावा केला होता.

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दोन्ही जागा भाजपच्याच असल्याचं म्हटलं होतं. तर मंत्री जयकुमार गोरे यांनीही महायुती म्हणून निवडणूक लढवण्याचं सांगताना, गरज पडल्यास भाजप म्हणूनही निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं म्हटलं होतं. यानंतर अपेक्षेप्रमाणे या दोन्ही जागा महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आल्याचं चित्र आहे.

मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार?

मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघावरून आता महायुतीमध्येच नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिवसेनेचे मंगेश चिवटे हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

समोर आलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनीच मंगेश चिवटे यांना पुणे विधान परिषद मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याचं बोललं जात आहे.

त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनीही चिवटे यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवला. पुणे शिक्षक मतदारसंघावर आमचा दावा आहे आणि येथून मंगेश चिवटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, अशी भूमिका सामंत यांनी मांडली होती.

मोदी-शिंदे भेटीत नेमकी काय चर्चा?

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. विधान परिषद निवडणुकीतील जागावाटप, पुणे शिक्षक मतदारसंघावरील महायुतीतील दावे आणि संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार या मुद्द्यांवर चर्चा झाली का, याबाबत सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

त्यामुळे मोदी-शिंदे भेटीनंतर पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत कोणता निर्णय होतो, याकडे महायुतीतील घटक पक्षांसह राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मंगेश चिवटे यांची उमेदवारी कायम राहणार का आणि भाजप-शिवसेनेतील हा पेच कसा सुटणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Shiv Sena Candidates: जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! शिवसेनेने उतरवले उमेदवार; सहकारातील राजकीय समीकरणांना नवे वळण

Web Title: Eknath shinde delhi visit pm modi meeting pune teachers constituency election vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 08:51 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MLC Election
  • PM Narendra Modi
  • pune news
  • shivsena

संबंधित बातम्या

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?
1

Modi Cabinet : मंत्रिमंडळात मोठ्या फेरबदलाचे संकेत, दोन केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, श्रीकांत शिंदेंना केंद्रात लॉटरी लागणार?

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी
2

बाणगंगा तलावातील जलजीवन धोक्यात? मृत माशांचा खच, Mangal Prabhat Lodha यांनी केली पाहणी

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’
3

MPSC Protest : आंदोलनात संजय राऊतांची एन्ट्री; ‘जंतर-मंतर जिल्ह्या-जिल्ह्यात उभं राहिलं तर मंत्रालयाबाहेर पडता येणार नाही’

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन
4

जेजुरीत भाजप युवा मोर्चाचे शक्तिप्रदर्शन; ‘युवाशक्तीला संघटनेत व्यासपीठ द्या’, गोपीचंद पडळकरांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.