Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mutha River Revitalization Project: पुणेकरांची पुराची समस्या संपणार! काय आहे पुणे महापालिकेचा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प?

दरवर्षी पावसाळ्यात खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. या पाण्यामुळे अनेकदा या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Sep 12, 2025 | 12:13 PM
What is the Pune Municipal Corporation's Mutha River Revitalization Project?

What is the Pune Municipal Corporation's Mutha River Revitalization Project?

Follow Us
Close
Follow Us:
  • मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
  • पुरसमस्या सोडवण्यासाठी पुणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प
  • नदी सुधारणा प्रकल्पात मुळा, मुठा आणि मुळा-मुठा नद्यांचा ४४ किमी लांबीचा भाग

Mutha River Revitalization Project: पुणे महानगरपालिकेने पुणेकरांसाठी एक मोठी बातमी दिली आहे. मुठा नदीकाठी पुराच्या समस्येला तोंड देणाऱ्या एकता नगर, विठ्ठलनगर आणि निंबाजनगर येथील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुणे महापालिकेने एक महत्त्वाकांक्षी नदी पुनरुज्जीवन प्रकल्प तयार केला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३६९ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

पूर्व-गणना समितीच्या बैठकीत या नदी पुनरूज्जीवन प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. दरवर्षी पावसाळ्यात खडकवासला धरणातून मुठा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जाते. या पाण्यामुळे अनेकदा या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. विशेषतः सिंहगड रोड परिसरातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. पण या नदी पुनरुज्जीव प्रकल्पामुळे या परिसरातील नागरिकांना पुराच्या समस्येतून दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. महानगरपालिकेच्या नदी सुधारणा प्रकल्पात मुळा, मुठा आणि मुळा-मुठा नद्यांचा ४४ किमी लांबीचा भाग समाविष्ट आहे, हा प्रकल्प ११ टप्प्यात विभागण्यात आला आहे. संगमवाडी ते बंडगार्डनपर्यंतचे काम अंतिम टप्प्यात आहे.

राज्यातील काही भागांत पावसाचा अंदाज; ‘या’ जिल्ह्यात पावसाचा अलर्ट जारी, पुढील चार दिवस…

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांतर्गत स्ट्रेच-६ (वडगाव खुर्द ते राजाराम पूल) वर खालील कामे केली जातील. दोन्ही बाजूंनी बंधारे बांधून पूर सहन करण्याची क्षमता वाढवणे, नागरिकांसाठी मार्ग आणि घाट विकसित करणे आणि नदीकाठचे सुशोभीकरण करणे हा यामागील उद्देश आहे. महापालिकेचे म्हणणे आहे की ही कामे नदीकाठच्या वस्त्यांना पुरापासून कायमस्वरूपी संरक्षण देतील.

आपत्ती निवारणाची तयारी

या प्रकल्पाचा प्रारंभिक खर्च ३०० कोटी रुपये असण्याचा अंदाज होता. परंतु सविस्तर पूर्व-गणना पत्रक तयार केल्यानंतर, त्याची किंमत ३६९ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे. महापालिकेच्या मते, पुणे शहराचे दीर्घकालीन पुरासारख्या आपत्तींपासून संरक्षण करण्यासाठी आणि नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी ही गुंतवणूक महत्त्वाची ठरेल.

Bandu Andekar News: पुणे पोलिसांची बंडू आंदेकरच्या घरावर धाड; सापडलं मोठं घबाड

पावसाचे पाणी वस्त्यांमध्ये  

बंडगार्डन ते मुंढवा हे काम वेगाने सुरू आहे. आता महानगरपालिकेने सिंहगड रस्त्यावरील वडगाव खुर्द ते राजाराम पूल असा ४.१ किमी लांबीचा मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ आणि २५ जुलै २०२४ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे साखळी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे पुणे शहर, विशेषतः सिंहगड रोड परिसरातील सखल भाग, एकतानगर, विठ्ठलनगर आणि निंबाजनगर पाण्याखाली गेले.

अनेक इमारती आणि वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे भेट दिली आणि पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. पण त्यानंतरही  २०२५ मध्येही काही सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरले, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली. या सर्व घटनांनंतर महापालिकेने या प्रकल्पासाठी आपत्ती व्यवस्थापन निधीतून सरकारकडे ३०० कोटी रुपयांची मागणी केली आहे.

Web Title: Pune municipal corporations mutha river revitalization project to address the water scarcity problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 11:26 AM

Topics:  

  • Khadakwasla Dam
  • Pune Municipal Corporation
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: चितेची राख पाण्यात न सोडता शेतातल्या झाडांना! लोहोट परिवार राखतोय पर्यावरणाचा समतोल
1

Pune News: चितेची राख पाण्यात न सोडता शेतातल्या झाडांना! लोहोट परिवार राखतोय पर्यावरणाचा समतोल

राहुल गांधींना ‘तो’ Video यूट्यूबवरून डिलीट न करण्याचा आदेश द्यावा; सावरकरांची कोर्टात धाव
2

राहुल गांधींना ‘तो’ Video यूट्यूबवरून डिलीट न करण्याचा आदेश द्यावा; सावरकरांची कोर्टात धाव

World Suicide Prevention Day 2025: आत्महत्या प्रतिबंधासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज
3

World Suicide Prevention Day 2025: आत्महत्या प्रतिबंधासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

Pune Gramin News : पुणे ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले; वाचा धक्कादायक आकडेवारी
4

Pune Gramin News : पुणे ग्रामीण भागात अपघाताचे प्रमाण वाढले; वाचा धक्कादायक आकडेवारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.