
पुण्यात उन्हाचा चटका वाढला; चार महिन्यांत ७३६ मिमी पाऊस
पुणे : मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरू होताच पुण्यात ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत शहराचे कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले असून, हवेत असलेल्या आर्द्रतेमुळे उकाडा अधिक जाणवत आहे. यंदा ऑक्टोबरमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन अंशांनी अधिक राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केली आहे.
पुणेकरांना सध्या उन्हाचा कडाका सहन करावा लागत आहे. पुढील काळातही पुणेकरांना वाढत्या उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. यंदाच्या मोसमी पावसाचे वितरण मात्र अत्यंत असमान राहिले. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत शिवाजीनगर येथे एकूण ७३६.२ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. शहरात पावसाचे वितरण असमान असतानाच पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरात मात्र जुलैमध्ये मुसळधार पाऊस झाला. ताम्हिणी, भिरा, लोणावळा आणि मुळशी परिसरात मोसमातील सर्वाधिक पाऊस जुलैमध्येच नोंदवला गेला. लोणावळा येथे ७,३९२ आणि मुळशी येथे ५,७९६ मिलिमीटर पाऊस झाला.
दरम्यान, पुणे, शहर आणि परिसरातील कमाल तसेच किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच ऑक्टोबर हीटची चाहूल लागली आहे. दिवसाबरोबरच रात्रीच्या आहेत. सकाळी नऊ-दहा वाजल्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागल्याने पावसाळा नुकताच संपत असतानाच ऊन वाढल्याचे चित्र आहे.
हवेत आर्द्रता असल्याने वाढतो उकाडा
दुपारपर्यंत आकाश प्रामुख्याने निरभ्र राहत असल्याने सूर्यप्रकाश थेट जमिनीवर पडतो. त्यामुळे तापमान वाढते. हवेत आर्द्रता असल्याने उकाडा अधिक जाणवतो. मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू असल्याने वातावरणात बदल होत आहेत.
– डॉ. एस. डी. सानप, वैज्ञानिक, भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणे
अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ
पावसाळ्याचे दिवस असूनही पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यासह पातूर तालुक्यात सध्या तीव्र उन्हाच्या चटक्यासह असह्य उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. आकाशात अधूनमधून ढग दाटून येत असले, तरी पाऊस पडण्याऐवजी उन्हाचा कडाका वाढत असल्याने सप्टेंबर महिन्यातच नागरिकांना ‘ऑक्टोबर हीट’ चा दाहक अनुभव येत आहे. यावर्षी ऑगस्ट महिन्यात पावसाने प्रदीचं दडी मारली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे तीन आठवडे उलटून गेले तरी अद्याप पातूर तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. पावसाअभावी हवेतील दमटपणा आणि उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे.
Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट