Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PUNE NEWS: ऑटोरिक्षा चालकांना RTO चा दणका! तपासणीत1877 ऑटोरिक्षा दोषी; 105 परवाने निलंबिल

पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत. नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी आरटीओकडू कारवाई करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 19, 2026 | 02:16 PM
PUNE NEWS: RTO takes strict action against auto-rickshaw drivers! 1877 auto-rickshaws found guilty during inspection; 105 licenses suspended.

PUNE NEWS: RTO takes strict action against auto-rickshaw drivers! 1877 auto-rickshaws found guilty during inspection; 105 licenses suspended.

Follow Us
Close
Follow Us:

चंद्रकांत कांबळे/पुणे : पुणे शहरातील ऑटो रिक्षाचालक मीटरनुसार भाडे न आकारता प्रवाशांकडून थेट मनमानी दराने पैसे वसूल करत आहेत.तसेच जादा प्रवाशी,भाडे नाकारणे उध्दट वर्तन, मीटर फास्ट अशा नियमांचे अल्लंघन केल्या प्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालय पुणे (आरटीओ) कडून ऑटो रिक्षाचालकांना दणका देण्यात आला आहे. एप्रिल ते डिसेंबर २०२५ या नऊ महिन्यात ४,८९६ ऑटोरिक्षांची तपासणी करण्यात आली.यात १,८७७ दोषी आढळले आहेत.यावर कडक कारवाई करत आरटीओ प्रशासनाकडून १०५ परवाने निलंबिल करण्यात आले असून उर्वरित जणांवर दंडात्मक करवाई करून ८ लाख ६७ हजार रूपये दंड वसूल करण्यात आले आहे.

हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : डॅरिल मिशेलचा ODI मध्ये करिश्मा! भारताविरुद्ध भारतीय भूमीत ‘हा’ पराक्रम करणारा तो जगातील पहिला फलंदाज

रिक्षा चालकांच्या मनमानी करभारावर नियंञण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.गेल्या नऊ महिन्यात आरटीओच्या तपासणीत १,८७७ रिक्षा दोषी आढळले आहेत.यामध्ये जादा भाडे आकारलेले ८७, मिटर फास्ट ४६,जादा प्रवाशी २९,भाडे नाकारणे ११९,उध्दट वर्तन ८६, व इतर अशा एकून १,८७७ ऑटोरिक्षावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.अनेक प्रवाशाना तक्रार कशी करावी आणि कुठे करावी यांची माहितीच नसते.त्यामुळे अनेक प्रवाशांची फसवणूक होत असते.अशा वेळी प्रवाशांनी काय केले पाहिजे यांची नेमकी कल्पनाच त्यांना नसते.यामुळे आर्थिक नुकसान आणि मानसिक ञासाला त्यांना सामोरे जावे लागते.

तक्रारीची नोंद कशी करावी?

८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर

  • –तक्रारदाराचे नाव
  • –तक्रारदाराचे मोबाईल क्रमांक
  • –प्रवासाचा मार्ग
  • –वाहन क्रमाक
  • –दिनांक व वेळ
  • तक्रारीचे स्वरुप (थोडक्यात)

आटीओकडून कारवाई अधिक तीव्र करण्याची मागणी

प्रवाशांमध्ये रिक्षाचालकांच्या या मनमानीविरोधात तीव्र नाराजी असून,आरटीओच्या या कारवाईनंतर अशा प्रकारांचे प्रमाण कमी होईल अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आली आहे. आरटीओ प्रशासनाने सातत्याने कारवाई वाढवून प्रवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

०१ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यत करण्यात आलेली कारवाई

महिना    तपासलेले रिक्षा    दोषी रिक्षा      परवाना निलंबन        दंड

एप्रिल        २८६                    ९५                 ०७                        ४५ हजार

में              ७४४                  २७४                 १७                        ४४ हजार

जुन           २९४                      ९८                 २२                       २३ हजार

जुलै            ३४२                     १०७                ०४                       १ लाख २७ हजार

ऑगस्ट       ३३७                    १४९                 १७                        ३ लाख ६० हजार

सप्टेंबर        ५२९                   २०८                  ०                         ९७ हजार

ऑक्टोबर    ८२६                   २८६               १४                        ८१ हजार

नोव्हेंबर       ८६६                   ४२०                १४                       १ लाख ३१ हजार

डिसेंबर         ६७२                 २६७              १२                       १ लाख ८५ हजार

एकूण           ४,८९६             १,८७७           १०५                     ८,६७,२३१

हेही वाचा : IND vs NZ, 3rd ODI : डॅरिल मिशेल एक्सप्रेस सुसाट! एबी डिव्हिलियर्सनंतर भारतात ‘हा’ कारनामा करणारा जगातील तो दुसराच फलंदाज

कोणत्याही ऑटो रिक्षाचालकांनी नियमांचे पालन न केल्यास दंडात्मक व परवाना निलंबनाची कारवाई करण्यात येईल.प्रवाशाकडून जादा भाडेदर आकारणे, भाडे नाकारणे,मिटर फास्ट असणे,उध्दट वर्तन करणे अशा तक्रारी असल्यास आपले नाव, मोबाईल क्रमांक फोटोसह ८२७५३३०१०१ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावे. प्राप्त तक्रारीवर तत्काळ कारवाई केली जाईल.  – अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे   प्रवाशांची आर्थिक फसवणूक होऊ नये म्हणून राज्य सरकारने नियमावली बनवली आहे.प्रवाशांना तक्रार कुठे करावी यांची माहितीच नसते.त्यामुळे या संदर्भात जनजागृती करण्याची गरज आहे. नेमके रिक्षा चालक याचा फायदा घेताना दिसून येतात.यासाठी ऑटोरिक्षातच ड्रायव्हर बसतो त्यांच्या मागच्या बाजूस प्रवाशांना तक्रार करण्यासाठी चालकाचा फोटो,परमिट धारकांचे नाव,रिक्षा नंबर आणि आरटीओच्या तक्रार क्रमांकांची पाटी लावणे सर्व रिक्षाचालकांना आरटीओकडून बंधनकारक करावे,यामुळे प्रवाशांची जर फसवणूक होत असेल तर तत्काळ तक्रार करता येईल. डॉ.बाबा शिंदे, चालक मालक वाहतूक संघटना अध्यक्ष

Web Title: Pune news the pune rto has suspended the licenses of 105 auto rickshaw drivers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 02:16 PM

Topics:  

  • Auto Driver
  • auto rickshaw
  • pune news
  • Pune RTO
  • RTO

संबंधित बातम्या

धक्कादायक ! लष्करप्रमुखांच्याच नावाने डीपफेक व्हिडिओ; खळबळजनक विधानंही केली
1

धक्कादायक ! लष्करप्रमुखांच्याच नावाने डीपफेक व्हिडिओ; खळबळजनक विधानंही केली

पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता
2

पुण्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर; उन्हाचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता

Iran Israel युद्धामुळे विद्यार्थी, नोकरदार उपाशी राहणार? गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, मेस अन्….; नुकसान किती?
3

Iran Israel युद्धामुळे विद्यार्थी, नोकरदार उपाशी राहणार? गॅस तुटवड्यामुळे हॉटेल, मेस अन्….; नुकसान किती?

Maharashtra Transport E-Challan: RTO कडून ‘अभय योजना’ प्रस्तावित; वेळेत दंड भरल्यास सवलतीची शक्यता
4

Maharashtra Transport E-Challan: RTO कडून ‘अभय योजना’ प्रस्तावित; वेळेत दंड भरल्यास सवलतीची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.