Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ढोल-ताशांचा नाद अन् ‘गोविंदा रे गोपाळा; पुण्यनगरीत Dahi Handi चा जल्लोष, डीजेमुक्त दहीहंडीला…

Dahi Handi 2026: माती गणपती मंडळासह काही मंडळांनी संयुक्तपणे डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन केले. या ठिकाणी ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने उत्सव साजरा करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 09:45 PM
पुण्यात दहीहंडीचा जल्लोष

पुण्यात दहीहंडीचा जल्लोष

Follow Us
Follow Us:

पुणे शहरात पाहायला मिळाला दहीहंडीचा जल्लोष
शुक्रवारी कृष्णाअष्टमीच्या रात्री श्रीकृष्ण जन्मसाेहळा पडला पार
स्पीकरच्या भिंती कायम , पण आवाजववर नियंत्रण

सुनयना सोनवणे /Pune Dahi Handi 2026:  ‘गोविंदा रे गोपाळा’चा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि डीजेच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईने शनिवारी (दि. ५) शहरातील दहीहंडी उत्सवाला रंगत आणली. सायंकाळनंतर विविध भागांत गोविंदा पथकांची गर्दी वाढत गेली. पारंपरिक ढोल-ताशांसह आधुनिक संगीताची जोड, आकर्षक सादरीकरणे आणि एलईडी (Pune) स्क्रीनमुळे उत्सवाचे वातावरण अधिकच जल्लोषमय झाले. यंदा ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा असल्याने अनेक ठिकाणी ढोल-ताशांचा नाद अधिक ठळकपणे ऐकू आला.

सायंकाळपर्यंत शहरात तुलनेने शांत वातावरण होते. मात्र, त्यानंतर गोविंदा पथके गाड्या आणि टेम्पोंमधून विविध मंडळांच्या दहीहंडीच्या ठिकाणी दाखल होऊ लागली. ‘गोविंदा रे गोपाळा’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. सुवर्ण तरुण युग मंडळ, मानाची पहिली हुतात्मा बाबू गेनू मंडळाची दहीहंडी, विश्रामबाग वाडा दहीहंडी, अकरा मारुती चौक, खजिना विहीर, माती गणपती मंडळाची संयुक्त डीजेमुक्त दहीहंडी, बाल विकास मंडळ, श्रीकृष्ण मंडळ, धक्या मारुती मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ आणि गुरुजी तालीम मंडळासह विविध ठिकाणी उत्साहात दहीहंडी साजरी करण्यात आली.

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन

पारंपरिक ढोल-ताशांसह आधुनिक गाण्यांची रंगत

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ढोल-ताशा पथकांची संख्या अधिक असल्याचे चित्र दिसले. काही ठिकाणी ढोल-ताशांच्या तालावर गोविंदा पथके आणि तरुणाईने ठेका धरला, तर काही मंडळांनी डीजेची व्यवस्था केली होती. ‘पाखरा आझाद केलं तुला’, ‘काळू बाईच वार’, ‘ब्रिंग इट ऑन’, ‘तिरची टोपीवाले’, ‘पाटलांचा बैलगाडा’, ‘नटीनं मारली मिठी’, ‘आम्ही गड्या छत्रपती शिवबापाचे’ अशा विविध गाण्यांवर तरुणाई जल्लोष करताना दिसली.

चिमुकल्यांचाही उत्साह

दहीहंडी पाहण्यासाठी आलेल्या चिमुकल्यांमध्येही मोठा उत्साह होता. काही ठिकाणी लहान मुलांना खांद्यावर बसवून पालक उत्सवाचा आनंद घेताना दिसले. मोबाईलवर दहीहंडी, गोविंदा पथकांचे नृत्य आणि ढोल-ताशांचे क्षण टिपण्याची नागरिकांमध्ये मोठी ओढ होती. अनेकांनी फोटो आणि चित्रफिती तातडीने समाजमाध्यमांवरील ‘स्टोरी’वर शेअर केल्या.

डीजेमुक्त दहीहंडीला प्रतिसाद

माती गणपती मंडळासह काही मंडळांनी संयुक्तपणे डीजेमुक्त दहीहंडीचे आयोजन केले. या ठिकाणी ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांच्या साथीने उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे एका बाजूला डीजेच्या तालावर तरुणाईचा जल्लोष, तर दुसऱ्या बाजूला पारंपरिक वाद्यांच्या निनादात साजरा होणारा उत्सव, असे दोन्ही रंग पुण्यात पाहायला मिळाले. महाकाल नृत्य, विविध सांस्कृतिक सादरीकरणे आणि मोठ्या एलईडी स्क्रीनवरील चित्रफितींनीही उत्सवात रंग भरला. दहीहंडीच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत असताना मोबाईलच्या कॅमेऱ्यांचीही लगबग सुरू होती.

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

साउंडचा आवाज कमी; ढोल-ताशांचा नाद घुमला!

यंदा ध्वनिक्षेपकांच्या आवाजावर मर्यादा असल्याने दहीहंडी उत्सवात पारंपरिक ढोल-ताशांचा नाद अधिक ठळकपणे जाणवला. हुतात्मा बाबू गेनू मंडळ, नारायण पेठ माती गणपती मंडळ, अखिल बुधवार पेठ दहीहंडी, बाल विकास मंडळ, धक्या मारुती मंडळ, महाराष्ट्र तरुण मंडळ आणि गुरुजी तालीम मंडळ आदी परिसरांत ढोल-ताशांच्या गजरात उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.

Web Title: Pune peoples celebrate dahi handi 2026 traditional and dj free festival seasons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • Dahi Handi 2026
  • Hindu Festival
  • pune news

संबंधित बातम्या

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन
1

Dahi Handi : दहीहंडीच्या उत्सवाला नशामुक्त महाराष्ट्राची जोड; फडणवीसांचे गोविंदा पथकांना आवाहन

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव
2

Mumbai Dahi Handi 2026: उत्सवाला गालबोट! दहीहंडी फोडताना डोक्याला गंभीर दुखापत, अवघ्या 7 वर्षांच्या गोविंदाने गमावला जीव

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू
3

Mumbai Dahi Handi 2026: दहीहंडीच्या जल्लोषात अपघातांची नोंद; मुंबईत 22 गोविंदा जखमी, एकावर उपचार सुरू

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
4

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.