Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Railway Revenue : पुणे रेल्वे विभागाची मोठी झेप; महसूल, प्रवासी सेवा आणि माल वाहतुकीत उल्लेखनीय यश!

Pune Railway News : पुणे मध्य रेल्वे विभागाने २०२५-२६ मध्ये २,२३८ कोटींचा महसूल मिळवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३.७% वाढ झाली आहे. प्रवासी महसूलातही १३% झाली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 04, 2026 | 03:31 PM
Pune Railway Revenue

Pune Railway Revenue

Follow Us
Follow Us:

Pune Railway news : मध्य रेल्वे पुणे विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील रेल्वे विभागाने केलेल्या कामगिरीवर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी प्रकाश टाकला.यात वाणिज्य,परिचालन,पायाभूत सुविधा,सुरक्षा,सिग्नल आणि दूरसंचार तसेच बंदोबस्त इत्यादी विविध क्षेञांतील विभागाचा समावेश होता. मध्य रेल्वे पुणे विभागाला २०२५-२६ मध्ये एकूण २,२३८ कोटींचा महसूल मिळवला असून, मागील वर्षाच्या तुलनेत यात ३.७ टक्के ची वाढ नोंदवली गेली आहे. प्रवासी महसूल १,६५७ कोटी इतका राहिला, ज्यात १३ टक्के वाढ दिसून आली; तर तिकीट तपासणीतून मिळणारा महसूल ३० कोटींवर पोहोचला, जो ५७.५ टक्के वाढ दर्शवतो.अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी दिली

Railway News : पुणे-दौंड रेल्वे मार्गावर नियमांचा भंग! आरक्षित डब्यांमध्ये घुसखोरीमुळे प्रवासी त्रस्त, प्रशासनाचे दुर्लक्ष?

वाणिज्यिक विभागातएनएफआर मधून १५.६७ कोटी जे१०.४% वाढ दर्शवते. ‘पे अँड पार्क’ मधून ४.१५ कोटी ३८% वाढ आणि खानपान सेवेतून ३.९६ कोटी २६% वाढ इतका महसूल प्राप्त झाला. प्रवाशांच्या संख्येतही मागील वर्षाच्या तुलनेत ६.३% वाढ नोंदवली गेली.प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी, पुणे विभागाने या वर्षात मोठ्या संख्येने विशेष गाड्या चालवल्या. दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त एकूण १,१०९ विशेष गाड्या चालवण्यात आल्या, जी मागील वर्षाच्या तुलनेत १९७.३% ची वाढ दर्शवते. याव्यतिरिक्त, नाताळ आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने ४० विशेष गाड्या (५६६.६७% वाढ) आणि होळीच्या निमित्ताने २५१ विशेष गाड्या (१४१.३५% वाढ) चालवण्यात आल्या.

पायाभूत सुविधांचा विकास :

  • हडपसर स्थानकावरील महत्त्वाची कामे
‘पुणे गर्दी-निवारण योजने’अंतर्गत अनेक महत्त्वपूर्ण कामे हाती घेण्यात आली. यामध्ये १५३ कोटी रुपये खर्चून हडपसर कोचिंग टर्मिनलचा विकास करणे, यार्डची क्षमता ५ वरून ७ मार्गिकांपर्यंत वाढवणे, फलाटांची लांबी वाढवणे आणि सर्व फलाटांना जोडणारा दुसरा प्रवेशद्वार विकसित करणे या कामांचा समावेश आहे. ४ था फलाट आणि पादचारी पुलाच्या विकासासाठी अतिरिक्त २६ कोटी रुपयांची मंजुरी प्राप्त झाली आहे.
  • खडकी स्थानकात आधुनिकीकरणावर भर
खडकी कोचिंग टर्मिनलचेही आधुनिकीकरण करण्यात आले; यामध्ये सुमारे ५० कोटी रुपये खर्चून यार्डचा विस्तार ५ वरून ८ मार्गिकांपर्यंत आणि फलाटांची संख्या ३ वरून ४ पर्यंत वाढवण्यात आली. स्थानक इमारत, पादचारी पूल आणि इतर प्रवासी सुविधांच्या विकासासाठी ७० कोटी रुपयांच्या अतिरिक्त कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
  • पुणे स्थानकात पायाभूत सुविधेवर विशेष लक्ष
पुणे स्थानकावर, ३९८ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये यार्डचे पुनर्रचना, ६ नवीन फलाटांची भर, विद्यमान फलाटांचा विस्तार आणि अतिरिक्त प्रवेश/निर्गमन मार्ग विकसित करणे या कामांचा समावेश आहे. तसेच, लिफ्ट, सरकते जिने आणि गाडी-निर्देशन प्रणाली यांसारख्या आधुनिक प्रवासी सुविधाही येथे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. स्थानकाच्या पुनर्विकासाची ही ‘महा-योजना’ सध्या अंतिम टप्प्यात आहे.
  • ‘कवच’ ची अंमलबजावणी
कवच हे रेल्वे सुरक्षा संदर्भातील महत्त्वाचे यंञ आहे.जो रेल्वेचे अपघात होण्यासापासून रोखण्याचे काम करते.’कवच’ या सुरक्षा उपक्रमांतर्गत, नियोजित १२१ प्रतिष्ठापनांपैकी १६ पूर्ण करण्यात आल्या; ३ प्रतिष्ठापनांच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, ५ प्रतिष्ठापनांचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. नियोजित १२३ टॉवर्सपैकी ६२ टॉवर्स उभारण्यात आले असून, उर्वरित ठिकाणी काम सुरू आहे.
  • प्रवासी सुविधा आणि आधुनिकीकरण
‘अमृत भारत स्थानक योजने’ अंतर्गत २० स्थानकांची निवड करण्यात आली होती. यापैकी केडगाव आणि लोणंद या स्थानकांचे उद्घाटन झाले आहे; तर वाठार, बारामती आणि कराड येथील काम पूर्ण झाले असून, उर्वरित स्थानकांवर काम प्रगतीपथावर आहे.प्रवासी सुविधांच्या बाबतीत, उद्दिष्टांनुसार विविध कामे साध्य करण्यात आली आहेत. यामध्ये लिफ्ट्स (पुणे स्थानकावर ४), एस्केलेटर्स (चिंचवड येथे १), आणि बी ऊर्जा कार्यक्षमता प्रमाणपत्रे (पाळशी आणि शिंदावणे येथे ‘शून्य’ व ‘शून्य प्लस’ मानांकन) यांचा समावेश आहे.
  • सीसीटीव्ही व्यसस्था
पुणे विभागाने पुणे स्थानकावर १६० उच्च-रिझोल्यूशन सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर स्थानकांवर ३८२ कॅमेरे बसवून आपली पाळत व्यवस्था अधिक बळकट केली आहे.
  • आरपीएफची उल्लेखनीय कामगिरी
आरपीएफच्या विविध मोहिमांअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली गेली आहे:, ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ (४१२ मुलांची सुटका), ‘ऑपरेशन अमानत’ (२६० हरवलेल्या वस्तू परत केल्या), ‘जीवन रक्षा’ (१२ प्रवाशांचे प्राण वाचवले), आणि ‘तंबाखू व कचरामुक्ती मोहीम’ (२०० प्रकरणे, ₹४०,२०० दंड).

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Pune railway department earns revenue of rs 2238 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Marathi News
  • Pune
  • Railway News

संबंधित बातम्या

World News :युक्रेनच्या हल्ल्यांनी रशियाच्या तेल उद्योगाला मोठा धक्का; ५१% शुद्धीकरण क्षमता ठप्प
1

World News :युक्रेनच्या हल्ल्यांनी रशियाच्या तेल उद्योगाला मोठा धक्का; ५१% शुद्धीकरण क्षमता ठप्प

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन
2

Big Breaking:फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांचा उद्रेक; शाळा बंद, रस्त्यावर आंदोलन

Ishqa Ishqa Trailer:  प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज
3

Ishqa Ishqa Trailer: प्रेम की झपाटलेपण की काळोखी दुनिया! ‘इश्का इश्का’चा थरारक ट्रेलर रिलीज

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत
4

Breaking News:जगभरात वाढतायत धोकादायक विषाणूंवरील संशोधन प्रयोगशाळा; सर्वाधिक प्रयोगशाळा अमेरिकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.