Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकेत फडकला मराठी झेंडा! ‘NAFA’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बटरस्कॉच’चा डंका; ४ पुरस्कारांवर कोरलं नाव

पुण्यातील तरुण संकलक अथश्री ठुबे यांनी या लघुपटाचे संकलन केले असून, त्यांना सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे यांच्या हस्ते 'सर्वोत्कृष्ट संकलक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 17, 2026 | 08:10 PM
अमेरिकेत फडकला मराठी झेंडा! ‘NAFA’ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बटरस्कॉच’चा डंका; ४ पुरस्कारांवर कोरलं नाव
Follow Us
Follow Us:

अथश्री ठुबे यांचा १० ते १२ वर्षांचा यशस्वी प्रवास
‘बटरस्कॉच’ या चित्रपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार
अथश्री ठुबे यांनी केले आहे या लघुपटाचे संकलन

पुणे: नॉर्थ अमेरिकन असोसिएशनच्या वतीने अमेरिकेत ८ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या ३ऱ्या ‘नाफा’ (NAFA) चित्रपट महोत्सवात ‘बटरस्कॉच’ या लघुपटाने विविध श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकत बाजी मारली आहे. ‘देऊळ’ चित्रपटाचे निर्माते अभिजित घोलप यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या महोत्सवात यंदा शॉर्ट फिल्म कॅटेगरीमध्ये अथर्व खारकर फिल्म्स निर्मित आणि प्रफुल्ल खारकर दिग्दर्शित ‘बटरस्कॉच’ या चित्रपटाला बेस्ट शॉर्ट फिल्म (अमेरिका), बेस्ट डायरेक्टर, बेस्ट सिनेमॅटोग्राफर आणि बेस्ट एडिटर असे महत्त्वाचे पुरस्कार मिळाले.

पुण्यातील तरुण संकलक अथश्री ठुबे यांनी या लघुपटाचे संकलन केले असून, त्यांना सुप्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते नागराज मंजुळे यांच्या हस्ते ‘सर्वोत्कृष्ट संकलक’  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अथश्री ठुबे यांचा १० ते १२ वर्षांचा यशस्वी प्रवास

गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असणाऱ्या अथश्री ठुबे यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांवर काम केले आहे. ‘ऑल इज वेल’ या मराठी चित्रपटासह नेटफ्लिक्सच्या ‘ब्लू कोबाल्ट’ या ओरिजिनल चित्रपटासाठी ऑनलाईन एडिटर म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ‘अभिमानास्पद महाराष्ट्र’ आणि ‘मीट द वर्ल्ड विथ एसकेएफ’ यांसारख्या उल्लेखनीय माहितीपटांचे संकलन त्यांनी केले आहे. आयसीआयसीआय बँक, लाईफ रिपब्लिक, इंदिरा युनिव्हर्सिटी आणि चितळे डेअरी यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या जाहिरातींचे संकलन त्यांनी केले आहे. ‘तेंडल्या’ या गाजलेल्या मराठी चित्रपटाचे व्हिज्युअल प्रमोशन त्यांनी हाताळले असून, त्यांनी संकलित केलेल्या ‘सुतक’ आणि ‘लास्ट विश’ या लघुपटांनीही विविध महोत्सवांत ठसा उमटवला आहे.

चित्रपट क्षेत्रात ‘जेन झी’ (Gen Z) पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अथश्री ठुबे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या पुरस्कारामुळे पुढील कामासाठी नवी दिशा आणि हुरूप मिळाल्याची भावना व्यक्त केली. आगामी काळात मराठी चित्रपटसृष्टीत मोठे आणि दर्जेदार काम करण्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

Web Title: Pune shines at north american film festival 4 awards compiled by athashri thube north american associations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Entertainement News
  • pune news
  • short film

संबंधित बातम्या

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार
1

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
2

Mhada Pune ने दिला दिलासा! अर्जाची मुदत वाढली, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई
3

बावधनमध्ये महापालिकेचा बुलडोझर! पाच अनधिकृत आरएमसी प्लांटवर मोठी कारवाई

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित
4

Sumo Didi Trailer Released: रूढींच्या आखाड्यात जिद्दीची कुस्ती! ‘सुमो दीदी’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.