
सेट पेपर फुटीप्रकरणी सखोल चौकशीची मागणी
लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करून पेपर फोडण्यात आल्याची कबुली
विद्यापीठाच्या सेट विभागाच्या विश्वासार्हतेवर निर्माण झाले मोठे प्रश्नचिन्ह
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Pune University) राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) पेपर फुटी प्रकरणानी आरोपींकडून झालेल्या थेट कबुलीजबाबानंतर विद्यापीठाच्या सेट विभागाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल करून पेपर फोडण्यात आल्याची कबुली समोर आल्यानंतर या घोटाळ्याची व्याप्ती अधिक गंभीर बनली असून संपूर्ण प्रशासनालाच जबाबदार धरण्यात येत आहे. यावेळी सेट पेपर (SET Exam)फुटीप्रकरणी केवळ बदली नव्हे, सखोल चौकशीची गरज असे राहुल ससाणे यांनी संगीतले आहे.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीने या संपूर्ण प्रकरणावर सुरुवातीपासूनच लक्ष ठेवले असल्याचे स्पष्ट करत, यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांची सखोल, नि:पक्ष चौकशी करावी, अशी ठाम मागणी पुन्हा एकदा केली आहे. आरोपींच्या कबुलीनंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा गोंधळ व अस्वस्थता निर्माण झाली आहे. पात्रतेसाठी प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर या प्रकरणामुळे संशयाची छाया पडली आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर होत असून संपूर्ण शैक्षणिक प्रक्रियेची विश्वासार्हताच धोक्यात आली आहे, असा आरोप समितीने केला आहे.
पुणे विद्यापीठात शिक्षक पदासाठी जागा खाली! इच्छुकांनो… संधीचे सोने करा
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनाने सेट विभागातील तत्कालीन समन्वयकांना पदावरून हटवून त्यांच्या जागी डॉ. अविनाश कुंभार यांची नियुक्ती केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, फक्त एका व्यक्तीला काढून नवीन नियुक्ती करणे म्हणजे भ्रष्टाचारावर पडदा टाकण्यासारखे आहे, त्याचबरोबर त्या संदर्भात नियुक्तीचे परिपत्रक ही जाहीर केले नाही, असे स्पष्ट शब्दांत कृती समितीचे पदाधिकारी म्हणतात.
केवळ सेट समन्वयकाची हकालपट्टी पुरेशी नाही. पेपरफुटीत सहभागी सर्व दोषी कर्मचारी-अधिकाऱ्यांचे निलंबन व विद्यार्थ्यांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई झाली पाहिजे. पुढे सेट परीक्षा पुणे विद्यापीठाकडे न देता रोटेशन पद्धतीने इतर विद्यापीठांना आयोजन द्यावे, अशी राज्यपालांकडे मागणी करणार आहोत.
-राहुल ससाणे अध्यक्ष विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र राज्य
पुणे विद्यापीठात शिक्षक पदासाठी जागा खाली
पुणे विद्यापीठामध्ये काम करू पाहणाऱ्या इच्छुकांसाठी ही महत्वाची भरती आहे. शिक्षक पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. पुण्याच्या सावित्राईबाई फुले महाविद्यापीठासंबंधित असणाऱ्या या भरतीसाठी राज्यभरातून उमेदवार इच्छुक आहेत तसेच मोठ्या प्रमाणावर अर्जही मागवण्यात येत आहे. जर तुम्ही अद्याप अर्ज केला नाही तर टेन्शन नॉट! अद्याप अर्ज करण्याची संधी गेली नाही.