Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PMC Elections 2026 : लोकशाहीचा कणा कमकुवत; मतदानाच्या दिवशीच EVM बंद पडल्याने संशय

PMC Elections 2026 : पुण्यातील प्रभाग क्रमांक 26 मध्ये अनेक मतदार केंद्रावर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे मोठा गोंधळ झाला असून प्रशासनावर टीका केली जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 15, 2026 | 11:55 AM
Pune ward 26 EVM machines not working at various polling stations during the PMC elections 2026

Pune ward 26 EVM machines not working at various polling stations during the PMC elections 2026

Follow Us
Close
Follow Us:
  • पुण्यात मतदानाच्या दिवशी यंत्रणांचा ठप्प
  • प्रभाग २६ मध्ये EVM बंद
  • यंत्रणा पडल्याने प्रशासनावर टीकेची झोड
PMC Elections 2026 : पुणे : आकाश ढुमेपाटील : शहरातील महापालिका निवडणुकीच्या (Maharashtra Local Body Elections) मतदानादरम्यान प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. (PMC Election 2026) प्रभाग क्रमांक २६ मधील किमान सहा मतदान केंद्रांवर ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) अचानक बंद पडल्याने मतदारांचा खोळंबा झाला. अधिक वेळ प्रयत्न करून काही ठिकाणी यंत्रे सुरू करण्यात आली, तर काही केंद्रांवर पर्यायी यंत्रे आणावी लागली. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेचा वेग मंदावला आणि प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी उघड झाल्या. (municipal elections)

प्रभाग २६ अंतर्गत स्वारगेट पोलिस लाईन, सेंट हिल्डाज स्कूलमधील दोन मतदान केंद्रे, सावित्रीबाई फुले स्मारक, घोरपडे पेठ उद्यान वसंतदादा अभ्यासिका आणि महात्मा गांधी उर्दू शाळा या ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या. सकाळच्या वेळेत मतदानासाठी मोठ्या संख्येने मतदार रांगेत उभे असताना यंत्रे अचानक ठप्प झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. काही मतदारांनी अर्ध्या तासाहून अधिक वेळ प्रतीक्षा केल्याचे सांगितले, तर काहींनी नाराजी व्यक्त करत मतदान केंद्र सोडल्याचीही चर्चा आहे.

हे देखील वाचा : प्रचार थांबला, पण राजकारण पेटलं! पुण्यनगरीत छुप्या प्रचाराचा ‘काळा खेळ’ उघड

प्रशासनाने तातडीने तांत्रिक पथके पाठवून दोष दूर करण्याचा प्रयत्न केला. केंद्रांवर तांत्रिक . मात्र, या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे मतदानाच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. “यंत्रे बंद पडणे ही तांत्रिक बाब आहे,” असे स्पष्टीकरण देत अधिकाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात मतदारांचा संताप लपून राहिला नाही.
या घटनेचे पडसाद राजकीय पातळीवरही उमटले. विरोधी पक्षांनी प्रशासनाच्या तयारीवर गंभीर आरोप करत, “संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या माहिती असतानाही पुरेशी बॅकअप यंत्रणा का नव्हती?” असा सवाल उपस्थित केला. काही नेत्यांनी याला ‘प्रशासनाचा गलथान कारभार’ ठरवत निवडणूक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले. सोशल मीडियावरही यंत्र बंद पडल्याचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले, ज्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार मिळाली.

हे देखील वाचा : लाडक्या बहिणींच्या हातात हप्ता अन् मनात प्रश्न! महिला मतदार कुणाच्या पारड्यात?

विशेष म्हणजे, शहरातील इतर भागांतही अशाच स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्याची माहिती आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ एका प्रभागापुरता मर्यादित नसून, एकूणच निवडणूक व्यवस्थापनातील तांत्रिक तयारीवर प्रश्न निर्माण झाला आहे. मतदान हा लोकशाहीचा कणा असताना, अशा अडचणींमुळे मतदारांचा उत्साह मावळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निवडणूक प्रशासनाने सर्व यंत्रांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले असून, उर्वरित वेळेत मतदान सुरळीत पार पडेल, असा दावा केला आहे. मात्र, मतदानाच्या दिवशीच अशा त्रुटी समोर येणे हे प्रशासनासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. निवडणुकीनंतर या प्रकारांची सखोल चौकशी होणार का, आणि जबाबदारी निश्चित होणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Web Title: Pune ward 26 evm machines not working at various polling stations during the pmc elections 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 15, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • BMC Election 2026
  • Municipal Election Result 2026
  • Municipal Elections
  • PMC Election 2026

संबंधित बातम्या

मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; संस्कृतीपासून ते उर्मिला कोठारेपर्यंत ‘या’ कलाकारांनी केले मतदान
1

मराठी सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क; संस्कृतीपासून ते उर्मिला कोठारेपर्यंत ‘या’ कलाकारांनी केले मतदान

BMC Election 2026: मतदान की थट्टा? मतदार याद्यांचा घोळ आणि पुसली जाणारी शाई; राजनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
2

BMC Election 2026: मतदान की थट्टा? मतदार याद्यांचा घोळ आणि पुसली जाणारी शाई; राजनंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

PCMC Election 2026 : पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ; निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडी समोर बसून आंदोलन
3

PCMC Election 2026 : पिंपरी गुरवमध्ये मतदान केंद्राबाहेर गोंधळ; निवडणूक अधिकाऱ्यांच्या गाडी समोर बसून आंदोलन

BMC Election 2026: मतदारांच्या बोटावरील शाईने राजकारण तापले! विरोधकांचे आरोप तर सत्ताधाऱ्यांकडून टोलेबाजी सुरु
4

BMC Election 2026: मतदारांच्या बोटावरील शाईने राजकारण तापले! विरोधकांचे आरोप तर सत्ताधाऱ्यांकडून टोलेबाजी सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.