Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंडच्या हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा पेटणार; सुप्रिया सुळेंची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत हे काम त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 30, 2026 | 04:45 PM
दौंडच्या हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा पेटणार; सुप्रिया सुळेंची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

दौंडच्या हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा पेटणार; सुप्रिया सुळेंची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Follow Us
Follow Us:
  • हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरच्या खोदकामाला ग्रामस्थांचा विरोध
  • खासदार सुप्रिया सुळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार
  • खोदकाम तातडीने थांबवण्याची मागणी
पाटस : दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. येथील गट नं. ३७९ मधील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या ‘महादेव मळा पाझर तलावा’लगत खाजगी कंपनीच्या स्टोन क्रशरसाठी सुरू असलेल्या खोदकामाबाबत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करत हे काम त्वरित थांबवण्याची मागणी केली आहे.

 

मागील दीड वर्षांपासून दौंड तालुक्यातील हिंगणीगाडा, वासुंदे आणि पाटस परिसरातील अनधिकृत खडी स्टोन क्रशर बाबत ग्रामस्थ आणि क्रशर चालक यांच्यात वाद सुरू आहेत. हिंगणीगाडा ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीचा ना-हरकत दाखला आणि ठराव हा ग्रामसभेत विषय न घेता परस्पर दिल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. याच मुद्यावरून ग्रामसभा वादग्रस्त झाली होती. खडी स्टोन क्रशर पूर्णपणे बंद करण्याचे ठराव करत ते हद्दपार करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

मागील दीड वर्षांपासून ग्रामस्थ यासंदर्भात संबंधित प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाशी पत्रव्यवहार करीत आहेत. मात्र संबंधित स्टोन क्रशर चालक आणि मालक हे आर्थिक बळाच्या जोरावर आणि राजकीय पाठबळाचा वापर करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अनधिकृत स्टोन क्रशर चालवत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि शेतकरी करीत आहेत. तक्रार करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जाते, तर उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या जवळचे असल्याचे सांगत शेतकऱ्यांना दमदाटी केली जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

हिंगणीगाडा येथील गट क्र. ३७९ मध्ये महादेव मळा पाझर तलाव आहे. हा तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून सुमारे १४४.४३ दलघमी पाणीसाठा क्षमता असलेला आहे. या तलावाच्या पाण्याचा लाभ परिसरातील सुमारे ३० हेक्टर बागायती शेतीला होतो. शेतीसोबतच हा तलाव वन्यजीव व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. मात्र, याच तलावाच्या अगदी जवळ खाजगी कंपनीच्या स्टोन क्रशरसाठी खोदकाम सुरू असल्याची बाब समोर आली आहे. हे खोदकाम पाझर तलावाच्या पूर रेषेपासून केवळ २७५ मीटर अंतरावर आणि भरावापासून ४५० मीटर अंतरावर करण्यात आले आहे. या धोकादायक खोदकामासंदर्भात जिल्हा परिषद (ल.पा.) उपविभाग, बारामती यांनी स्वतः तहसीलदार दौंड यांना पत्र देऊन याबाबत कळवले आहे.

स्टोन क्रशर व भविष्यातील संभाव्य ब्लास्टिंगमुळे तलावाच्या भरावाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो आणि पाणी दूषित होण्याची गंभीर शक्यता आहे. तलावाच्या खालील बाजूस थेट बागायती शेती क्षेत्र असल्याने तलावाला धोका निर्माण झाल्यास मोठे नुकसान होण्याची भीती स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा : प्रवाशांच्या सुविधांमध्ये पुणे विमानतळ देशात अव्वल; 5 पैकी 4.98 गुणांसह पटकावला पहिला क्रमांक

या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या लेखी मागणीत म्हटले आहे की, “माझी शासनाला विनंती आहे की, पर्यावरण, शेती आणि वन्यजीवांचे नुकसान करून कोणत्याही अनधिकृत किंवा नियमबाह्य कामांना परवानगी दिली जाऊ नये. जिल्हा प्रशासन व महसूल विभागाने या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन पाहणी करावी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी हे काम त्वरित थांबवावे.” खासदारांनी या प्रकरणात लक्ष घातल्याने आता महसूल व जिल्हा प्रशासन या स्टोन क्रशरवर काय कारवाई करते, याकडे संपूर्ण दौंड तालुक्याचे लक्ष लागले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा वाद नेमका काय आहे?

    Ans: गट क्रमांक ३७९ मधील जिल्हा परिषदेच्या महादेव मळा पाझर तलावाजवळ खासगी कंपनीच्या स्टोन क्रशरसाठी खोदकाम सुरू असल्याने ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

  • Que: खासदार सुप्रिया सुळे यांनी काय मागणी केली आहे?

    Ans: सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करून पर्यावरण आणि शेतीला संभाव्य धोका लक्षात घेता खोदकाम तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे.

  • Que: स्टोन क्रशरमुळे पाझर तलावाला कोणता धोका आहे?

    Ans: स्टोन क्रशरमधील संभाव्य ब्लास्टिंगमुळे तलावाच्या भरावाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच पाणी दूषित होण्याची आणि परिसरातील बागायती शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Villagers are opposed to the excavation work for the stone crusher at hingnigada nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Daund
  • MP Supriya Sule

संबंधित बातम्या

23 ऑक्टोबरला आईशी शेवटचे बोलणे, 28 ऑक्टोबरला मृतदेह आढळला; मुग्धा देशमुख प्रकरणाने खळबळ
1

23 ऑक्टोबरला आईशी शेवटचे बोलणे, 28 ऑक्टोबरला मृतदेह आढळला; मुग्धा देशमुख प्रकरणाने खळबळ

राणा सूर्यवंशींना वाय प्लस सुरक्षा का? रोहित पवारांचा सवाल; सखोल चौकशीची मागणी
2

राणा सूर्यवंशींना वाय प्लस सुरक्षा का? रोहित पवारांचा सवाल; सखोल चौकशीची मागणी

Pradeep Purnekar Case : ‘१३ CCTV फुटेज दिले, तरी अटक नाही’, राम पूर्णेकर संतापले, आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार!
3

Pradeep Purnekar Case : ‘१३ CCTV फुटेज दिले, तरी अटक नाही’, राम पूर्णेकर संतापले, आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार!

Tiger Shroff Attack Row : मुंबईतील कलाकारांच्या सुरक्षेवरून राजकारण तापलं, हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारला घेरलं
4

Tiger Shroff Attack Row : मुंबईतील कलाकारांच्या सुरक्षेवरून राजकारण तापलं, हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस सरकारला घेरलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.