Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

विद्यार्थ्यांना पौष्टिक व सुरक्षित आहार मिळावा, या उद्देशाने शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेच्या गुणवत्तेवर जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 22, 2026 | 12:30 AM
शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह; जुन्नर तालुक्यात पुरवठा अन् गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : विद्यार्थ्यांना पौष्टिक व सुरक्षित आहार मिळावा, या उद्देशाने शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून राबविण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहार योजनेच्या गुणवत्तेवर जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पिंपळवंडी-चाळकवाडी येथील शिवांजली विद्यालयात भेसळयुक्त शालेय पोषण आहार आढळून आल्याच्या प्रकारामुळे एका शाळेतील व्यवस्थेबरोबरच संपूर्ण तालुक्यातील पोषण आहाराच्या पुरवठा आणि गुणवत्ता तपासणी यंत्रणेची कार्यपद्धती चर्चेत आली आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दररोज ताजा, पौष्टिक आणि सुरक्षित आहार मिळावा, यासाठी शासनाकडून तांदूळ, डाळी, कडधान्ये, खाद्यतेल, मसाले आदी साहित्याचा पुरवठा केला जातो. मात्र, हे साहित्य विद्यार्थ्यांच्या ताटात जाण्यापूर्वी त्याची गुणवत्ता कितपत तपासली जाते, हा प्रश्न चाळकवाडीतील घटनेनंतर ऐरणीवर आला आहे. या प्रकारानंतर तालुक्यातील सर्व शाळांमधील पोषण आहाराच्या साहित्याची गुणवत्ता, पुरवठा पद्धत, साठवणूक व्यवस्था आणि प्रत्यक्ष वाटप यांची काटेकोर तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. एका शाळेत असा प्रकार आढळल्याने इतर शाळांमध्ये पोहोचणाऱ्या धान्य व खाद्यसाहित्याची नियमित तपासणी होते का, असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.

‘कागदावरचा दर्जा’ नको, ताटातील गुणवत्ता तपासा!

पोषण आहाराच्या नोंदवहीत सर्व काही व्यवस्थित असले तरी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या ताटात कोणता आहार जात आहे, हे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे भरारी पथकांनी केवळ कागदपत्रे आणि नोंदवह्यांची तपासणी न करता प्रत्यक्ष धान्यसाठा, डाळी व इतर साहित्याची गुणवत्ता, स्वच्छता आणि साठवणूक व्यवस्था तपासणे आवश्यक आहे. तयार झालेल्या आहाराचा दर्जाही पाहण्याची गरज आहे.

शाळेतील प्रत्यक्ष साठा आणि नोंदवहीतील नोंदी यामध्ये तफावत आहे का, साहित्याचा वापर नियमानुसार होतो का, विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत आवश्यक प्रमाणात आहार तयार केला जातो का, याचीही पडताळणी होणे गरजेचे आहे. पोषण आहाराची गुणवत्ता तपासणी शाळेपुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण पुरवठा साखळीची झाली पाहिजे. धान्य व खाद्यसाहित्य साठविणाऱ्या गोदामांपासून शाळेतील स्वयंपाकघर आणि विद्यार्थ्यांच्या ताटापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अचानक तपासणी करण्याची मागणी होत आहे. संशयास्पद साहित्याचे नमुने घेऊन दोष आढळल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करावी, अशी पालकांची अपेक्षा आहे.

हे सुद्धा वाचा : बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

सर्व शाळांच्या पोषण आहाराचे ‘ऑडिट’ करा

तालुक्यातील शाळांना पुरवठा होणारे धान्य, डाळी व इतर खाद्यसाहित्य, साठवणूक, स्वयंपाकाचा खर्च, आचारी व मदतनिसांचे मानधन तसेच योजनेसाठी प्राप्त निधी यांचे सर्वंकष ऑडिट करण्याची मागणी होत आहे. हे ऑडिट केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष शाळांमध्ये जाऊन केल्यास योजनेतील त्रुटी व अनियमितता समोर येण्यास मदत होईल.

शालेय पोषण आहार हा हजारो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित विषय आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी शाळेत मिळणाऱ्या या आहारावर अवलंबून असतात. त्यामुळे आहाराच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी चाळकवाडीतील प्रकाराच्या पार्श्वभूमीवर जुन्नर तालुक्यातील संपूर्ण पोषण आहार व्यवस्थेचा ‘क्वालिटी चेक’ करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Web Title: Questions have been raised about the quality of the school nutrition scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • School news
  • Students

संबंधित बातम्या

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप
1

सासवडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे, कार आडवी लावून वकिलासह पत्नीला बेदम मारहाण; शहरात संताप

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना
2

बाप्पा गणराया, संकटातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची सरकारला सुबुद्धी दे…; हर्षवर्धन सपकाळ यांची प्रार्थना

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
3

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
4

Rahul Gandhi : ‘अंधभक्त हवेत, विद्यार्थी नकोत’; राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.