Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निगडी-चाकण मेट्रोचा सुधारित ‘डीपीआर’ तयार, भोसरीचाही समावेश; खर्च होणार तब्बल…

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निगडी (भक्ती-शक्ती चौक) ते चाकण या ४०.९२६ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचा सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तयार केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2026 | 05:43 PM
निगडी-चाकण मेट्रोचा सुधारित 'डीपीआर' तयार, भोसरीचाही समावेश; खर्च होणार तब्बल...

निगडी-चाकण मेट्रोचा सुधारित 'डीपीआर' तयार, भोसरीचाही समावेश; खर्च होणार तब्बल...

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (महामेट्रो) निगडी (भक्ती-शक्ती चौक) ते चाकण या ४०.९२६ किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो मार्गाचा सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडा (DPR) तयार केला आहे. या सुधारित आराखड्यात लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार भोसरी परिसराचा नव्याने समावेश करण्यात आला असून, त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च १० हजार ३८३ कोटी ८९ लाख रुपयांवर पोहोचला आहे. आता या प्रकल्पाची सूत्रे महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या हातात असून, त्यांनी हिरवा कंदील दिल्यास चाकण मेट्रोचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

असा असेल मेट्रोचा प्रवास

शहरात सध्या पिंपरी ते स्वारगेट दरम्यान मेट्रो सेवा सुरू असून, निगडीपर्यंतच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात निगडी ते चाकण हा उन्नत (एलिव्हेटेड) मार्ग प्रस्तावित आहे. या मार्गावर एकूण ३१ मेट्रो स्टेशन असतील. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सर्वाधिक २५, तर चाकण नगरपरिषद हद्दीत ६ स्टेशनचा समावेश आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन या मार्गावर ३ ऐवजी ६ डब्यांची मेट्रो चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

भोसरीचा मार्ग प्रशस्त

सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या बैठकीत नाशिक फाटा येथून मेट्रो मार्ग थेट भोसरीला नेण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार सुधारित आराखड्यात भोसरी आणि एमआयडीसी भागाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे स्थानकांच्या संख्येत वाढ झाली असून, औद्योगिक पट्ट्यातील कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

निधीचे नियोजन

या भव्य प्रकल्पासाठी लागणाऱ्या १०,३८३ कोटींच्या निधीपैकी, केंद्र सरकार १० टक्के हिस्सा, राज्य सरकार १० टक्के हिस्सा, महापालिका १५ ते २० टक्के हिस्सा, कर्ज – ६० टक्के निधी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून उभारला जाणार आहे.

प्रमुख स्थानके आणि मार्ग

भक्ती-शक्ती चौक, ट्रान्सपोर्टनगर, मुकाई चौक (रावेत), पुनावळे, ताथवडे, भूमकर चौक, भुजबळ चौक (वाकड), कोकणे चौक, पिंपळे सौदागर, नाशिक फाटा, भोसरी एमआयडीसी, मोशी (भारतमाता चौक), चिंबळी फाटा, आळंदी फाटा आणि चाकण.

“तत्कालीन पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचनांनुसार सुधारित आराखडा तयार आहे. हा आराखडा महापौर आणि सर्व नगरसेवकांसमोर सादरीकरणासाठी ठेवला जाईल. महापालिकेच्या मान्यतेनंतरच पुढील कार्यवाही तातडीने सुरू केली जाईल.” — श्रवण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

प्रकल्प रखडणार की मार्गी लागणार?

सुधारित आराखड्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढला आहे. जर महापालिकेच्या नव्या कारभाऱ्यांनी याला तातडीने मंजुरी दिली, तर प्रकल्प विनाअडथळा सुरू होईल. मात्र, तांत्रिक त्रुटी काढून पुन्हा सुधारणा सुचविल्यास हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा कागदावरच रखडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : पाटस ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे बंदच; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

Web Title: Maharashtra metro rail corporation has prepared a revised dpr of nigdi chakan metro

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 05:43 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • metro news
  • Nigdi

संबंधित बातम्या

चाकण परिसराची कचराकोंडी फुटली; 36.5 एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प
1

चाकण परिसराची कचराकोंडी फुटली; 36.5 एकरांवर होणार ‘पीएमआरडीए’चा घनकचरा प्रकल्प

चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवा, अन्यथा…; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा
2

चाकणमधील खड्डे 31 ऑगस्टपर्यंत बुजवा, अन्यथा…; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचा इशारा

चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार; ‘पीएमआरडीए’कडून 17 किमी रस्त्यांच्या कामाला वेग
3

चाकण औद्योगिक क्षेत्राचा श्वास मोकळा होणार; ‘पीएमआरडीए’कडून 17 किमी रस्त्यांच्या कामाला वेग

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…
4

आनंदाची बातमी! नांदेड जिल्ह्यातील 13 हजार शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 106 कोटी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.