Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway सुरक्षेसाठी ‘कवच’ ठरले महत्वाचे; पुणे विभागाने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल, अपघात अन्…

कवच टप्पा-२ अंतर्गत, पुणे विभागातील तीन स्थानकांवर – पाढेगाव, बेलापूर आणि राहुरी – कवच प्रणालीची स्थापना पूर्ण झाली आहे. याव्यतिरिक्त, दौंड-येवला विभागात कवच स्थापनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 11, 2026 | 02:35 AM
Railway सुरक्षेसाठी 'कवच' ठरले महत्वाचे

Railway सुरक्षेसाठी 'कवच' ठरले महत्वाचे

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वे सुरक्षेसाठी कवच ठरले योगदान
250 किमी मार्गावर घेण्यात आली नॉन-सिग्नलिंग कवच चाचणी
कवच प्रणालीच्या अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल

पुणे /चंद्रकांत कांबळे:  विभागाच्या एकूण ७०० किमी रेल्वे (Railway) मार्गापैकी २५० किमी पेक्षा जास्त मार्गावर नॉन-सिग्नलिंग कवच चाचण्या यशस्वीरित्या घेण्यात आल्या आहेत, ज्यात पुणे-कोल्हापूर आणि दौंड-मनमाड (डीडी–एमएमआर) विभागांचा समावेश आहे. या चाचण्या संपूर्ण विभागात कवच प्रणालीच्या मोठ्या प्रमाणावरील अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.

कवच टप्पा-२ अंतर्गत, पुणे विभागातील तीन स्थानकांवर – पाढेगाव, बेलापूर आणि राहुरी – कवच प्रणालीची स्थापना पूर्ण झाली आहे. याव्यतिरिक्त, दौंड-येवला विभागात कवच स्थापनेचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. दूरसंचार पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात, नियोजित १२३ टॉवर्सपैकी ५३ कवच टॉवर्स उभारण्यात आले आहेत.मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने भारताची स्वदेशी स्वयंचलित ट्रेन संरक्षण (एटीपी) प्रणाली असलेल्या ‘कवच’च्या अंमलबजावणीत उल्लेखनीय टप्पे गाठले आहेत, ज्यामुळे रेल्वे सुरक्षा वाढणार असून अपघात पूर्णपणे टाळता येणार आहे.

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

कवचची प्रमुख सुरक्षा वैशिष्ट्ये
-कवच प्रणाली प्रगत तांत्रिक हस्तक्षेपांद्वारे रेल्वेची सुरक्षा लक्षणीयरीत्या वाढवण्यासाठी डिझाइन केली आहे
-सिग्नल ओलांडण्याच्या ( एसपीएडी) घटना कमी करण्यासाठी ही एक अतिरिक्त मदत आहे.
-टक्कर टाळण्यासाठी स्वयंचलित ब्रेकिंग आहे
-निर्धारित वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्यास आपोआप ब्रेक लावून अतिवेगापासून संरक्षण देते
-लोकोमोटिव्हच्या केबिनमध्ये सिग्नलची स्थिती आणि हालचालीचा दर्शवणे,जे विशेषतः धुक्याच्या हवामानात आणि वेगवान संचालनादरम्यान उपयुक्त आहे.
-लेव्हल क्रॉसिंग गेटजवळ पोहोचताना आपोआप हॉर्न वाजणे.
-कवच नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टम (एनएमएस) द्वारे रेल्वेच्या हालचालींचे केंद्रीकृत रिअल-टाइम निरीक्षण करता येतो.

Mumbai Local Update : लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! ‘या’ मार्गावरील लोकल तीन महिने राहणार बंद, काय आहे कारण?

कवच बसवल्यामुळे अपघातापासून बचाव करता येतो.एखाद्या वेळी रेल्वे पटरीवर आपत्कालीन परिस्थिती असेल तर क्षणात लक्षात येते.तसेच गाडी अतिवेगाने धावत असेल तर त्याचा वेग कवचच्या माध्यमातून नियंञणात येतो.रेल्वेमध्ये मागून जे अपघात होतात यामुळे ते टाळता येतात.
हेमंत कुमार बेहरा,
जनसंपर्क अधिकारी,मध्ये रेल्वे विभाग पुणे

रुळावर येतेय भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वेच्या आर्थिक कामगिरीत – सातल्याने सुधारणा होत आहे. २०२२-२३ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये एकूण वाहतूक उत्पन्न ५.१ टक्क्यांनी वाढले. यात प्रवासी आणि मालवाहतुकीच्या महसुलाचा समावेश आहे. महसूल वाढत असल्याने रेल्वेची आर्थिक स्थिती रुळावर येत आहे. केंद्र सरकारने गेल्या तीन आर्थिक वर्षातील भारतीय रेल्वेच्या प्रमुख आर्थिक कामगिरीचे तपशील जाहीर केले, ज्यामध्ये ऑपरेटिंग रेशो, एकूण वाहतूक प्राप्ती आणि निव्वळ महसूल वातील ट्रेंड अधोरेखित केले आहेत. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडेच राज्यसभेत उपस्थित केलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

Web Title: Railways conducts test of protective armor covering 250 km in pune division safety news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Indian Railway
  • pune news
  • safety tips

संबंधित बातम्या

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! तिकीट बुकिंग रखडलं तरी पैसे सुरक्षित; IRCTC ने लाँच केलं खास फीचर
1

रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! तिकीट बुकिंग रखडलं तरी पैसे सुरक्षित; IRCTC ने लाँच केलं खास फीचर

राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले; गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग
2

राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले; गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…
3

ZP Election 2026: अटीतटीच्या आखाड्यात विक्रम खुटवड ठरले सिंघम; दुरंगी ऐवजी पंचरंगी…

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
4

Sharad Pawar Health: “… कोणीही पुण्यात येऊ नये”; रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.