सिंधुदुर्ग, कोल्हापूर, लातूरसह राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी;
पुणे : सध्या वातावरणात कमालीचा बदल होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. यामुळे देशातील काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, लातूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यातील अनेक भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यात धाराशिव, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये तर प्रचंड कमी पाऊस पडला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीत हवामान विभागाकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने राहण्याची शक्यता आहे. तसेच या चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज; पुणे, सांगली, कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 23 ते 26 सप्टेंबर या काळात पावसाची शक्यता आहे. या काळात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तसेच वाऱ्याचा वेग हा 40 ते 50 किंवा काही ठिकाणी 60 किमी प्रतितास वेगाने राहण्याची शक्यता आहे.
जळगाव, कोल्हापूरला पावसाचा यलो अलर्ट
सिंधुदुर्ग, जळगाव, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वर्धा, वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी प्रतितास राहण्याची शक्यता आहे.
काय आहे पावसाचा अंदाज?
कोकण आणि गोव्यात २२ ते २७ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात २१ ते २४ सप्टेंबरदरम्यान, तर मराठवाड्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता.
पुन्हा पाऊस…! मुंबई, पुणे, रत्नागिरीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता






