पुण्यात परतीच्या पावसाची पाठ (फोटो- ai gemini)
सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पुण्यात परतीच्या पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतात. मात्र, यंदा पावसाने जवळपास संपूर्ण महिना दडी मारली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार, १ ऑक्टोबर रोजी १.४ मिलिमीटर, तर ३० ऑक्टोबर रोजी ०.३ मिलिमीटर पाऊस झाला. या दोन दिवसांचा अपवाद वगळता महिनाभरात पावसाची नोंद झालेली नाही. परिणामी, शहर आणि परिसरात बहुतांश काळ कोरडे वातावरण राहिले.
अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…
गेल्या अकरा वर्षांतील आकडेवारी पाहता ऑक्टोबरमधील पावसाचे प्रमाण वर्षागणिक बदलत असल्याचे दिसते. २०२० मध्ये सर्वाधिक ३१३.३ मिलिमीटर, तर २०२२ मध्ये ३०३.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. २०१९ मध्येही २३५ मिलिमीटर पाऊस झाला होता. दुसरीकडे, २०२३ मध्ये १८.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. तो या कालावधीतील आतापर्यंतचा नीचांकी पाऊस होता. मात्र, यंदा अवघ्या १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने मागील नीचांकी नोंदीचाही विक्रम मोडला आहे.
याविषयी भारतीय हवामानशास्त्र विभाग, पुणेचे वैज्ञानिक डॉ. एस. डी. सानप म्हणाले, ‘‘ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस अपेक्षेप्रमाणे न झाल्याने राज्यातील बहुतांश भागांत कोरडे हवामान राहिले. पावसाच्या अनुपस्थितीमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमानही सरासरीपेक्षा अधिक नोंदविण्यात आले. विशेषतः कोकण किनारपट्टीवरील काही भागांत उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.’’
Maharashtra Rain Alert: भयंकर, भीषण चक्रीवादळ! पुण्यनगरीत पुढील दोन दिवस अक्षरश:…
शिवाजीनगर वेधशाळा | पाऊस मिलिमीटरमध्ये
| वर्ष | पाऊस |
|
| २०१५ | ७६.७ |
| २०१६ | ८०.४ |
| २०१७ | १८०.९ |
| २०१८ | ३६.१ |
| २०१९ | २३५.० |
| २०२० | ३१३.३ |
| २०२१ | १४०.२ |
| २०२२ | ३०३.५ |
| २०२३ | १८.६ |
| २०२४ | ६१.२ |
| २०२५ | ६७.३ |
| २०२६ | १.७ |
यंदाचा ऑक्टोबरमधील पाऊस गेल्या अकरा वर्षांतील सर्वांत कमी.
Ans: ऑक्टोबर महिन्यात अवघा १.७ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
Ans: २०२० मध्ये सर्वाधिक ३१३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.






