Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: माऊलींसाठी ‘वरुणराजा’ची विश्रांती! वारकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; उद्यापासून तापमानात…

रविवारनंतर पुणे शहरातील तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिहलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 10, 2026 | 07:49 PM
Pune News: माऊलींसाठी ‘वरुणराजा’ची विश्रांती! वारकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा; उद्यापासून तापमानात…
Follow Us
Follow Us:
  • पुण्यात पावसाची विश्रांती;
  • गुरुवारपासून पावसाने घेतली उसंत
  • शहरात झाली उकाड्यात वाढ
पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामादरम्यान दरवर्षी पावसाची हजेरी लागते. मात्र यंदा पालखी पुण्यात मुक्कामी असताना पावसाने विश्रांती घेतली आहे. गुरुवारपासून गायब झालेला पाऊस शुक्रवारीही (ता.१०) पडला नाही. दुपारच्या सुमारास आकाश ढगाळ झाल्याने पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पावसाने हजेरी न लावल्याने पालखी दर्शनासाठी आलेले नागरिक आणि मुक्कामी असलेले वारकरी सुखावले.

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात शुक्रवारी कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली. शहराचे कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. आकाशात ढगाळ वातावरण असतानाही उन्हाचा चटका जाणवत असल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागला.

हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी (ता.११) शहरातील किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास स्थिर राहण्याचा अंदाज असून किमान तापमान २४ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या ते अतिहलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रविवारनंतर पुणे शहरातील तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून काही ठिकाणी अतिहलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Maharashtra Rain Alert: घाटमाथ्यावर पावसाचे ‘रौद्ररूप’; तर पुणे शहरात…, हवामान विभागाचा अलर्ट काय?

मागील आठवड्यात पुण्यातसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पुणे शहरात पाणीकपात सुरू करण्यात आली आहे. आषाढी वारी निमित 12 जुलैपर्यंत पाणीकपात मागे घेण्यात आली आहे. मात्र खडकवासला धरण साखळी क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने पाणीसाठा कमालीचा वाढला आहे. खडकवासला धरण भरल्याने त्यातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग देखील करण्यात आला होता.

घाटमाथा आणि राज्यात मागील आठवड्यात 4 ते 5 दिवस अत्यंत मुसळधार पावसाचा जोर दिसून आला. आता काहीशा प्रमाणात पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Pune News: आषाढी वारीत वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम; 100 विश्रांती कक्षांची सुविधा

वारकऱ्यांसाठी आधार हाऊसिंग फायनान्सचा अनोखा उपक्रम

दरवर्षी, लाखो वारकरी कडक ऊन आणि मुसळधार पावसाची पर्वा न करता विठ्ठलाच्या दर्शनासाठी अत्यंत कठीण प्रवास करतात, ज्‍यामधून त्‍यांचा दृढ विश्वास, स्थिरता आणि भक्तीचे दर्शन होते. या यात्रेतील शारीरिक श्रमाची जाणीव ठेवून आधार हाऊसिंग फायनान्सने वारकऱ्यांसाठी १०० विश्रांती कक्ष उपलब्ध करून दिले आहेत, जे यात्रेदरम्यान भाविकांना विश्रांतीची सुविधा देतात, ज्‍यामुळे ते आपली आध्यात्मिक यात्रा पुढे सुरू ठेवण्यापूर्वी काही वेळ आरामात विश्रांती घेऊ शकतील.

 

Web Title: Rain has taken a break in pune city and the humidity has increased dyaneshwar and tukaram maharaj palkhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • Dnyaneshwar Maharaj Palkhi
  • Pune Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
1

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
2

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
3

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…
4

Weather Update : दिल्ली, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.