Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raj Thackeray: “आरोपीला तडफडून मारलं पाहिजे!” नसरापूर घटनेवर राज ठाकरेंचे तळतळाट; समाजाच्या मानसिकतेवर ओढले ताशेरे

राज ठाकरे यांनी सरकार आणि समाज या दोघांच्याही सद्यस्थितीबाबत बोचरे प्रश्न उपस्थित केले आहेत. जलदगती न्यायालयांची केवळ आश्वासने देण्याची ही वेळ राहिलेली नाही, तर आता थेट आणि निर्णायक कृती करण्याची वेळ आली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 05, 2026 | 04:01 PM
नसरापूर घटनेवर राज ठाकरेंचे तळतळाट (Photo Credit- X)

नसरापूर घटनेवर राज ठाकरेंचे तळतळाट (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • “आरोपीला तडफडून मारलं पाहिजे!”
  • नसरापूर घटनेवर राज ठाकरेंचे तळतळाट
  • समाजाच्या मानसिकतेवर ओढले ताशेरे
Raj Thackeray on Nasarapur Crime Case: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात वसलेल्या नसरापूर येथे, एका निष्पाप साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या क्रूर कृत्याविरुद्ध कणखर भूमिका घेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकार आणि समाज या दोघांच्याही सद्यस्थितीबाबत बोचरे प्रश्न उपस्थित केले आहेत. जलदगती न्यायालयांची (Fast-track courts) केवळ आश्वासने देण्याची ही वेळ राहिलेली नाही, तर आता थेट आणि निर्णायक कृती करण्याची वेळ आली आहे, असे राज ठाकरे यांनी ठामपणे मांडले.

‘X’ (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करताना राज ठाकरे यांनी लिहिले की, पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल याचा विचार न करता हालहाल करत संपवावं.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून, त्या नराधमाने पुढे तिला ठार मारलं आणि तिचा मृतदेह लपवायचा प्रयत्न केला. या घटनेने शब्दशः मनाचा थरकाप उडाला आणि भयानक चीड आली. या आरोपीला सरकारने कायदा काय सांगतो किंवा अजून कोण काय म्हणेल… — Raj Thackeray (@RajThackeray) May 5, 2026


सरकार अशा घटनांमध्ये जेंव्हा फास्टटट्रॅक पद्धतीने कारवाई करू म्हणतं तेंव्हा सरकारने फास्टट्रॅकची व्याख्या पण सांगावी. कारण अशा घटना घडल्यानंतरच सरकारला जाग येते. महाराष्ट्रात मुली, स्त्रिया पळवून नेण्याचं, त्यांचं शोषण करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. आणि असं नाहीये ते एखाद्या वर्षीच वाढत आहे, तर ते वर्षागणिक वाढत आहे, याचा अर्थ कायद्याचा धाक अजिबात उरलेला नाही. त्यात या घटनेनंतर नसरापूर परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज केल्या गेल्याच्या बातम्या पण आल्या. ही तत्परता स्त्रियांचं, मुलींचं शोषण करणाऱ्यांच्या विरोधात सरकार का दाखवत नाही ?

या आरोपीला शिक्षा व्हायला पाहिजे आणि ती होईलच पण अशा घटना वारंवार का घडत आहेत ? ज्या महाराष्ट्राने देशाच्या स्त्री शिक्षणाचा, स्त्री सक्षमीकरणाचा पाया घातला त्या महाराष्ट्रात अशा घटना वारंवार का घडत आहेत याचा थोडा सर्वांगीण विचार व्हायला हवा की नको? अशी घटना घडली की जनतेच्या मनातला रोष उमटतो, सरकार मग कुठलंही असो त्यांचा कोडगेपणा दिसून येतो. दोनचार दिवसांत हे सगळं विसरलं जातं, पण यावर काहीतरी मूलभूत विचार आणि कृती करावी लागेल यावर आपण कधी बोलणार आहोत का ? या सगळ्याकडे बघताना मला जे प्रकर्षाने जाणवतं ते म्हणजे, महाराष्ट्राचं ‘लक्ष’ आणि ‘लक्ष्य’ विचलित झालं आहे… आणि कोणाचाच कोणाला धाक उरलेला नाही.

Raj Thackeray: “मराठी बोलणार नाही, ही हिंमत येते कुठून?”; राज ठाकरेंचा परप्रांतीय रिक्षाचालकांसह सरकारवर प्रहार

‘सत्ता’ मिळवणे, ती गाजवणे याचा एक भस्मासुर जो वरपासून खालपर्यंत धुमाकूळ घालायला लागला आहे त्याने महाराष्ट्र पूर्ण विस्कटायला लागला आहे. प्रत्येकाला या ना त्या मार्गाने सत्ता मिळवायची आहे आणि गाजवायची आहे. राजकारण्यांना, काही उद्योगपतींना सत्ता हवी आहे. हल्ली लेखकांना पण साहित्य संमेलनाच्या मार्फत सत्ता गाजवायचा मोह होतो. अगदी एशियाटिक सारख्या संस्थेत सुद्धा सत्तेची लढाई पेटते, आणि एकूणच सत्तेच्यासाठी वाट्टेल ते याचं असं काही उदात्तीकरण होत आहे की हाच पुरुषार्थ वाटतो. जे वरती घडतं त्याचं प्रतिबिंब खाली उमटत असतं. अगदी दुबळा माणूस सुद्धा या सगळ्यात सैरभैर होऊन आपल्यापेक्षा दुबळ्यांच शोषण करतो. याकडे पूर्वी मोठ्यांचं लक्ष असायचं, कोणीतरी कोणाचे तरी कान उपटायचे. राजकारण्यांना पत्रकारांचा धाक होता, समाजात प्रत्येकाकडे कोणाचं तरी कोणाकडे लक्ष असायचं तेच हललं आहे.

पूर्वी आपल्याकडे कोणीतरी बघतंय, उद्या काही केलं तर आपली, आपल्या घरच्यांची समाजात छीथू होईल ही भीती असायची तीच आता नष्ट झाली आहे . हे गंभीर आहे. समाजात चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती असतात. त्यातल्या वाईट प्रवृत्तींवर समाजाची, कायद्याची जी दहशत, नियंत्रण असायला हवं तेच नाहीस झालेल दिसतंय. हाताबाहेर गेलेली लालसा +सत्ता गाजवण्याची हाव + ओटीटी वरचा कन्टेन्ट + पैशाच्या आणि जमिनीच्या मागे फरफटत जाणे आणि मोबाईल मधे सतत गुंतून राहणे याने सगळी घडी विस्कटली आहे.

या आणि अशा घटनांनी महाराष्ट्र अधिक जखमी होत आहे याचं भान माध्यमं, राजकारणी आणि समाजांनी ठेवलं पाहिजे . मी नेहमी माझ्या भाषणांत सांगतो की १९९५ नंतर महाराष्ट्र आरपार बदलला. १९९२ पासून जगाचे दरवाजे आपल्यासाठी उघडले गेले . उदारीकरणाचे वारे देशभर घुमू लागले , परंतु हे वारे आपण निट समजूनच घेतले नाहीत .उदारीकरणाने प्रचंड फायदे झाले पण जिथे आम्हाला लोकशाहीच समजली नाही तीथे उदारीकरण काय समजणार ? उदारीकरणाने सगळी जुनी मूल्यव्यवस्था उध्वस्त केली आणि नवी व्यवस्था इतकी व्यक्तिकेंद्रित आणि लालसाकेंद्रित केली की जर आपण आजच यावर सर्वांगाने विचार केला नाही तर मात्र आपला वाली कोणीच नाही हे नक्की.

मी माझा पक्ष याच समाजाचा घटक आहोत. ज्या ज्या गोष्टी मी सुचवल्यात त्याची अंमलबजावणी करण्यासाठी मी आणि माझा पक्ष सर्वतोपरी पुढे असू हे नक्की. अशा घटना परत कधीच घडू नयेत आणि महाराष्ट्राचं विचलित झालेलं ‘लक्ष’ आणि भरकटलेलं ‘लक्ष्य’ पुन्हा ताळ्यावर आणण्यासाठी जे काही करावं लागेल ते सरकारने तातडीने करावं!

MNS राज ठाकरेंचा महिला आरक्षण अन् मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा की विरोध? स्पष्ट केली भूमिका

Web Title: Raj thackeray angry reaction nasrapur case government and society criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • MNS Raj Thackeray
  • raj thackeray

संबंधित बातम्या

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली
1

Pune Crime : पुण्यात लुटमार सत्र सुरुच; कात्रज भागात धारदार हत्याराचा धाक दाखवून रोकड पळविली

Crime News: मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश! २३ कोटींची मालमत्ता जप्त तर ९ जणांना DRI कडून अटक
2

Crime News: मुंबई विमानतळावर सोन्याच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा पर्दाफाश! २३ कोटींची मालमत्ता जप्त तर ९ जणांना DRI कडून अटक

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!
3

सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाचा मोठा धडाका; डेअरीवर छापा मारून ७ लाखांची भेसळयुक्त बर्फी जप्त, १,८०७ किलो मुद्देमाल हस्तगत!

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…
4

Nilesh Ghaywal Gang : नीलेश घायवळ टोळीतील फरार गुंडाला अखेर ठोकल्या बेड्या; पोलिसांना माहिती मिळाली अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.