Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव द्या; राष्ट्रवादीच्या रोहन सुरवसे पाटलांची मागणी

केशवनगर-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 17, 2026 | 04:50 PM
केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव द्या; राष्ट्रवादीच्या रोहन सुरवसे पाटलांची मागणी

केशवनगर-खराडी उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव द्या; राष्ट्रवादीच्या रोहन सुरवसे पाटलांची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : केशवनगर-खराडी परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या केशवनगर-खराडी उड्डाणपुलाचे रविवार, १६ ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. केशवनगर-खराडी पूल, गोदरेज इन्फिनिटी जवळ, केशवनगर, मुंढवा येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर हा उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. या उड्डाणपुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांना निवेदन दिले आहे.

पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजितदादा पवार यांनी पायाभूत सुविधा आणि वाहतूक प्रकल्पांना प्राधान्य दिले आहे. त्यांच्या विकासाभिमुख कार्याची आठवण कायम राहावी, या उद्देशाने उड्डाणपुलाला त्यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आल्याचे सुरवसे पाटलांनी सांगितले आहे. या उड्डाणपुलाची लांबी सुमारे ४११ मीटर असून रुंदी २४ मीटर आहे. पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू राहणार आहे. अजितदादांच्या पुणे शहराच्या विकासातील योगदानाचा सन्मान म्हणून उड्डाणपुलाचे ‘दिवंगत अजितदादा पवार उड्डाणपूल’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

उड्डाणपुलाबाबत माहिती खालीलप्रमाणे आहे.

केशवनगर-खराडी उड्डाणपुलाची लांबी सुमारे ४११.४० मीटर असून रुंदी २४ मीटर आहे. पुलावर एकूण सात गाळे असून प्रत्येक गाळ्याची लांबी ३५.२ मीटर आहे. खराडी बाजूकडील अ‍ॅप्रोच रस्त्याची लांबी ४० मीटर, तर केशवनगर बाजूकडील अ‍ॅप्रोच रस्त्याची लांबी १२५ मीटर आहे. पुलावरून दुतर्फा वाहतूक सुरू करण्यात आली आहे. उड्डाणपुलाच्या प्रकल्पाची निविदा रक्कम २३.४७ कोटी रुपये असून आतापर्यंत २३ कोटी रुपये खर्च झाला आहे. या पुलामुळे केशवनगरकडून खराडीकडे जाणाऱ्या वाहनांना करावा लागणारा सुमारे सहा किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास टळणार आहे. त्यामुळे बायपास रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांचा सुमारे अर्धा तास वेळ वाचणार आहे. प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच वायू व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासही या प्रकल्पाचा हातभार लागणार आहे. त्यामुळे केशवनगर, खराडी आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुरळीत आणि वेळेची बचत करणारी वाहतूक व्यवस्था उपलब्ध झाली आहे.

Web Title: Rohan survase patil has demanded that the keshavnagar kharadi flyover be named after ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 04:50 PM

Topics:  

  • ajit pawar
  • NCP News
  • pune news

संबंधित बातम्या

राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांसाठी Runaway/ Escape Ramp उभारा; रविंद्र साळेगावकर यांची गडकरींकडे मागणी 
1

राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांसाठी Runaway/ Escape Ramp उभारा; रविंद्र साळेगावकर यांची गडकरींकडे मागणी 

Pune Sports: चौथ्या फेरीअखेर धुरळा! विहान, अद्विक, अर्णवचा दणदणीत विजय; तर…
2

Pune Sports: चौथ्या फेरीअखेर धुरळा! विहान, अद्विक, अर्णवचा दणदणीत विजय; तर…

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित
3

पुणे विभागात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 16 आस्थापनांचे परवाने निलंबित

वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश
4

वाहतूक पोलिसांचा आता पालिकेला ‘अलर्ट’; कारणे शोधून उपाययोजना करण्याचे पोलिस आयुक्तांचे निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.