Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आयटी पार्कची वाहतूक कोंडी फुटणार ! पुणे मेट्रो मार्गिका-3 च्या ‘माण ते बालेवाडी’ टप्प्याला सुरक्षा मंजुरी

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने यापूर्वी या मार्गाची सखोल पाहणी करून विविध तांत्रिक मुद्द्यांचा आढावा घेतला होता. 'पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड'ने सर्व त्रुटींची पूर्तता करत अहवाल सादर केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2026 | 12:14 PM
आयटी पार्कची वाहतूक कोंडी फुटणार! पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या 'माण ते बालेवाडी' टप्प्याला सुरक्षा मंजुरी

आयटी पार्कची वाहतूक कोंडी फुटणार! पुणे मेट्रो मार्गिका-३ च्या 'माण ते बालेवाडी' टप्प्याला सुरक्षा मंजुरी

Follow Us
Follow Us:

पिंपरी : हिंजवडी आयटी पार्कला शहराच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या ‘पुणे मेट्रो मार्गिका-३’ (हिंजवडी ते शिवाजीनगर) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील पहिल्या टप्प्यासाठी महत्त्वाचा टप्पा गाठला गेला आहे. या मार्गावरील ‘माण स्थानक ते आर. के. लक्ष्मण म्युझियम (बालेवाडी)’ या टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (सीएमआरएस) प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी तात्पुरते प्राधिकरण प्रदान केले आहे. त्यामुळे या मार्गावर प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर रवि लांडगे यांचा दिल्ली दौरा; केंद्र सरकारकडे केला महत्त्वाच्या प्रकल्पांचा पाठपुरावा

सुमारे १३ किलोमीटर लांबीच्या या दुहेरी मार्गावर एकूण १२ स्थानके समाविष्ट आहेत. ही मेट्रो प्रणाली ७५० व्होल्ट डीसी थर्ड रेल ट्रॅक्शन आणि सीबीटीसी सिग्नलिंगवर आधारित आहे. सुरक्षा मंजुरी मिळाल्यामुळे आता या मार्गावर ‘एटीपी’ मोडअंतर्गत ताशी ८० किलोमीटरच्या कमाल वेगाने मेट्रो धावू शकणार आहे.

कडक तपासणी आणि वैधानिक मान्यता

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाने यापूर्वी या मार्गाची सखोल पाहणी करून विविध तांत्रिक मुद्द्यांचा आढावा घेतला होता. ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ने सर्व त्रुटींची पूर्तता करत अहवाल सादर केला.

प्रवासी सेवेच्या मंजुरीपूर्वी या मार्गावर पुढील महत्त्वाची प्रमाणपत्रे व चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आल्या.

– सर्व १२ स्थानकांसाठी अग्निशमन दलाची ना-हरकत प्रमाणपत्रे
– मुख्य विद्युत निरीक्षकांचे ना-हरकत प्रमाणपत्र
– दूरसंचार विभागाचा परवाना व आयएसए प्रमाणपत्र
– स्थापत्य, ट्रॅक, सिग्नलिंग आणि रोलिंग स्टॉक प्रणालींची काटेकोर पडताळणी

पुणेकरांच्या सेवेत आधुनिक मेट्रोसाठी आम्ही कटिबद्ध

“ही वैधानिक सुरक्षा मंजुरी प्रकल्पासाठी अत्यंत ऐतिहासिक टप्पा आहे. सुरक्षितता आणि गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करत पुणेकरांच्या सेवेत आधुनिक मेट्रो दाखल करण्यासाठी आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.”

– अनिल कुमार सैनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड

आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास होईल मदत

“या मंजुरीमुळे आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल. नागरिकांना वेगवान आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्यासाठी पीएमआरडीए प्रशासन उर्वरित प्रक्रिया वेगाने पूर्ण करेल.”

– डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Web Title: Safety clearance for the maan to balewadi section of pune metro line 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Maha Metro
  • Pune Metro
  • pune news

संबंधित बातम्या

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
1

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
2

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे
3

पुण्यात Tennis चा थरार! आरुष देशपांडे अन् ‘या’ खेळाडूची चमकदार कामगिरी, पटकावली विजेतेपदे

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई
4

FDA Action : स्वयंपाकघरात जिवंत झुरळे, उंदराची विष्ठा अन्…; ‘एफडीए’ची द न्यू पूना क्लबवर मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.