Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाला दुसऱ्या दिवशीही अश्रू अनावर; इम्तियाज मोमीन घटनास्थळी ढसा ढसा रडले

अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवार यांचे सावलीप्रमाणे नेहमी बरोबर असणारे त्यांचे सुरक्षा रक्षक इम्तियाज मोमीन घटनास्थळी बराच वेळ रडत थांबले होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 29, 2026 | 06:14 PM
अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाला दुसऱ्या दिवशीही अश्रू अनावर; इम्तियाज मोमीन घटनास्थळी ढसा ढसा रडले

अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाला दुसऱ्या दिवशीही अश्रू अनावर; इम्तियाज मोमीन घटनास्थळी ढसा ढसा रडले

Follow Us
Close
Follow Us:
  • अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाला दुसऱ्या दिवशीही अश्रू अनावर
  • इम्तियाज मोमीन घटनास्थळी ढसा ढसा रडले
  • ताफ्यातील प्रत्येक जण हळहळला
बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान कोसळून झालेल्या अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवार यांचे सावलीप्रमाणे नेहमी बरोबर असणारे त्यांचे सुरक्षा रक्षक इम्तियाज मोमीन घटनास्थळी बराच वेळ रडत थांबले होते. अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करतेवेळी त्यांनी जय पवार यांची गळाभेट घेतल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळातच बारामती विमानतळावर पोहोचणार होते. त्यामुळे अजित पवारांच्या विमानाची वाट बारामती शहरातील विविध पदाधिकाऱ्यांसह शासकीय अधिकारी व त्यांचे सुरक्षा रक्षक देखील पाहत थांबले होते. विमानतळापासून धावपट्टी संपते, त्या ठिकाणाच्या अगदी जवळून स्फोटाचा आवाज आला, आणि त्यानंतर विमानतळावरील सर्व यंत्रणेची पळापळ सुरू झाली, यामध्ये अजित दादांबरोबर नेहमी सावलीप्रमाणे बरोबर असणारे त्यांचे सुरक्षारक्षक इम्तियाज मोमीन हे देखील होते.

मोमीन घटनास्थळी पोहोचल्यानंतर, अजित पवार या अपघातात गेल्याचे कळाल्यानंतर , मोमीन अचानक खाली बसले. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनाही धक्का बसला. मोमीन यांच्यासह सर्वजण रडू लागले. दुपारी उशिरापर्यंत मोमीन, जळालेल्या विमानाच्या अवशेषाकडे बघून रडत होते. यावेळी माध्यमांनी त्यांना प्रतिक्रियेसाठी विचारणा देखील केली, मात्र ते प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हते, मोमीन यांच्याबरोबर त्यांचे दुसरे अंगरक्षक सहकारी देखील होते, ते देखील भावनाविवश झाले होते.

हे सुद्धा वाचा : प्रशासनावर मजबूत पकड अन्…; अजित पवारांच्या निधनानंतर निलम गोऱ्हेंची प्रतिक्रीया

ताफ्यातील प्रत्येक जण हळहळला

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रत्येक सभेच्या ठिकाणी बाजूला उभे असणारे मोमीन यांना अनेक जण ओळखतात. अजितदादा गेल्याच्या धक्क्यातून ते अजून देखील सावरले नसल्याचे आज दुसऱ्या दिवशी स्पष्ट झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील प्रत्येक जण हळहळत होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले व सध्या बारामती एमआयडीसीच्या प्रमुख अधिकारी पदाची जबाबदारी असलेले हनुमंत पाटील हे देखील रडत होते.

Web Title: Security guards were crying even the second day after the death of deputy chief minister ajit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 29, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • ajit pawar plane crash
  • baramati

संबंधित बातम्या

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?
1

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद विषय समित्यांच्या सभापतींची निवड; कुणाकुणाला मिळाली संधी?

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?
2

“राष्ट्रवादीच्या दैवताना डावलून स्वतःच देव बनण्याचा…”, नाव न घेता अमोल मिटकरींचा कोणाला इशारा?

Baramati Crime: देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण! भररस्त्यात मारहाण करून कारखाली चिरडलं; बारामतीतील घटना
3

Baramati Crime: देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण! भररस्त्यात मारहाण करून कारखाली चिरडलं; बारामतीतील घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.