Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुनेत्रा पवार होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा; राजकीय हालचालींना वेग

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार सांभाळतील, असे पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यातील संवादात सांगितले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 20, 2026 | 08:27 AM
सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होणार

सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होणार

Follow Us
Follow Us:

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार) पदाधिकारी व कार्यकर्त्यांची २६ फेब्रुवारी रोजी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाचे नेतृत्व सुनेत्रा पवार सांभाळतील, असे पक्षाचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी भंडाऱ्यातील संवादात सांगितले.

पटेल यांनी चांदपूर देवस्थानाचे दर्शन घेतल्यानंतर भंडारा विश्रामगृह येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत केंद्रीय तपासाची मागणी केली असल्याचे सांगितले. अपघाताच्या दिवशी बारामतीत आलेल्या केंद्रीय मंत्र्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीसाठी विनंती करण्यात आली होती. अजित पवार यांच्या अपघातामागे माझा हात असल्याचे आरोप काही लोक करत आहेत, परंतु ते पूर्णपणे चुकीचा आहेत, असे खासदार पटेल यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, शेवटचे फोनवर बोलणे धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसविषयी झाले होते, भ्रष्टाचाराशी काही संबंध नव्हता.

तसेच २६ फेब्रुवारीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या निवडीवर अधिकृत घोषणा होणार आहे. पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की, पक्षाला खंबीर नेतृत्व मिळावे, आणि सुनेत्रा पवार ह्या जबाबदारीस पात्र आहेत. बैठकीत संघटनात्मक मुद्द्यांवरही चर्चा होईल.

हेदेखील वाचा : शरद पवार पुन्हा जाणार राज्यसभेत? काँग्रेसच्या मोठ्या नेत्याने केले चित्र स्पष्ट, ‘या विषयावर तेव्हाच बोलू जेव्हा…’

अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकारच्या उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) जबाबदारी स्वीकारतील. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदाची आणि दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना, अजित पवार यांचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सर्व काही स्पष्ट केले आहे.

राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार

सुनेत्रा या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकमेव उमेदवार आहेत आणि या विषयावर एकमत होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या उपमुख्यमंत्री असल्याने आणि त्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्यामुळे त्या विधिमंडळ पक्षाचे नेतृत्व करतील. पुढील दोन आठवड्यात या विषयावर निर्णय अपेक्षित आहे. प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतही भाष्य केले.

Web Title: Sunetra pawar will be the president of ncp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 08:27 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान
1

‘5 हजार कोटींचा दावा करा, कोर्टात काय करायचं ते आम्ही पाहू’; शिवराज मोरेंना नवनाथ बन यांचं थेट आव्हान

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
2

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Maharashtra Live Breaking News in Marathi:  काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: काँग्रेससह विरोधी पक्षातील खासदारांचे आज पुन्हा आंदोलन

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!
4

MLC Election 2026 : पुणे ते संभाजीनगर… पाचही जागांवर राजकीय आखाडा तापला; पाहा कोण कुठून लढणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.