मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली, छातीत संसर्ग अन्...; रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल
शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर पोस्ट करत महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या पोस्टनुसार, शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला आहे. त्यासाठी त्यांना पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स घ्यावा लागणार आहे.
दरम्यान, शरद पवार यांचे इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी शुभेच्छा आणि पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांचेही त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले.
रुबी हॉल क्लिनिकचे मुख्य हृदयरोगतज्ज्ञ, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. पुरवेझ के. ग्रांट यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. या निवेदनानुसार, शरद पवार यांना छातीत श्वास घेताना वेदना जाणवत असल्याने सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय निरीक्षणासाठी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती लवकरच स्थिर होण्याची अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना सध्या वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील रुबी हॉल क्लिनिकमध्ये जाऊन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांची प्रकृती सध्या नियंत्रणात असून, त्यांच्यावर सुरू असलेले उपचार योग्य दिशेने सुरू असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत सध्या दिलासादायक माहिती समोर आली आहे.
Baba has developed chest congestion and will need a 5-day course of antibiotics. Fortunately, all other vital parameters are normal. Thank you all for your good wishes and constant support. A heartfelt thank you to all the doctors from the bottom of my heart. 🙏 — Supriya Sule (@supriya_sule) February 9, 2026
शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्याच्या दिशेने येत आहेत. मात्र, रुग्णालयात गर्दी होऊ नये आणि उपचारांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्त्वाची विनंती केली आहे.
शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून, कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊ नये, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रुग्णालयात गर्दी करणे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. सध्या शरद पवार यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबीयांकडून वेळोवेळी माहिती दिली जात आहे.
Ans: शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Ans: खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या छातीत संसर्ग झाला आहे. त्यांच्यावर पाच दिवसांचा अँटीबायोटिक्सचा कोर्स सुरू आहे.
Ans: शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती मिळाल्यानंतर कार्यकर्ते पुण्याकडे येत आहेत. मात्र, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांनी रुग्णालयात येऊ नये, अशी विनंती केली आहे.






