Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय घडामोडींना वेग; शरद पवारांचा पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार?

आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही उमेदवार अजित पवार गटाला मिळालेल्या ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 23, 2026 | 11:45 AM
राजकीय घडामोडींना वेग; शरद पवारांचा पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार?

राजकीय घडामोडींना वेग; शरद पवारांचा पक्ष घड्याळ चिन्हावर निवडणूक लढणार?

Follow Us
Follow Us:
  • राजकीय घडामोडींना वेग
  • आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी
  • शरद पवारांचा पक्ष घड्याळ चिन्हावर लढणार?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील (एनसीपी) दोन गट, एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील आणि दुसरा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील. पक्षाचे नाव व चिन्ह यावरून सर्वोच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढत असतानाच, प्रत्यक्ष राजकारणात मात्र वेगळीच रणनीती पुढे येत असल्याचे चित्र आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही उमेदवार अजित पवार गटाला मिळालेल्या ‘घड्याळ’ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.

 

५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये मतदान होणार असून, पुणे जिल्हा त्यात समाविष्ट आहे. काही जिल्हा परिषदांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांनी आघाडी केल्याने, मतदारांमध्ये गोंधळ होऊ नये आणि पारंपरिक मतपेढी टिकवून ठेवता यावी, या उद्देशाने ही तडजोड करण्यात येत असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे.

एनसीपी (एसपी) मधील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, “ज्या मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीची पकड पूर्वापार मजबूत आहे, तेथे घड्याळ हे चिन्ह घराघरात ओळखीचे आहे. दोन वेगवेगळी चिन्हे ईव्हीएमवर दिसल्यास मतदार संभ्रमात पडू शकतात. त्यामुळे आघाडीतील काही जागांवर घड्याळ चिन्हावर उमेदवार देण्याचा निर्णय दोन्ही गटांच्या नेतृत्वाने घेतला आहे.”

दरम्यान, मे २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत झालेल्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांमध्ये एनसीपी (ळर पवार पक्ष) ने ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येत आघाडी केली आणि आता हीच एकत्रित भूमिका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतही दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा : भरणे-पाटील मैत्री कार्यकर्त्यांना कितपत रुचणार? इंदापुरातील अनपेक्षित समीकरणांमुळे राजकारणाला नवे वळण

मतदारांमधील संभ्रम दूर होणार

राजकीय विश्लेषकांच्या मते, दोन्ही राष्ट्रवादी गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वाढल्यास पक्ष नाव व चिन्हाचा वाद दुय्यम ठरू शकतो. मात्र हाच मुद्दा शिवसेनाच्या दोन्ही गटांसाठी अद्याप महत्त्वाचा राहणार आहे, कारण तेथे समेटाची कोणतीही चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. महानगरपालिका निवडणुकांदरम्यान ईव्हीएमवर वेगवेगळी चिन्हे दिसल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा अनुभवही यापूर्वी आला आहे. त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठीच जिल्हा परिषद निवडणुकांत ‘घड्याळ’ या ओळखीच्या चिन्हाचा वापर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Web Title: Sharad pawars party is likely to contest the zilla parishad elections on the clock symbol

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 23, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Election News
  • MP Sharad pawar
  • ZP Election 2026

संबंधित बातम्या

Satara Politics: राजकारण हाय राव! संघर्ष तर होणारच; साताऱ्यात 7 बिनविरोध तर 14 ठिकाणी…
1

Satara Politics: राजकारण हाय राव! संघर्ष तर होणारच; साताऱ्यात 7 बिनविरोध तर 14 ठिकाणी…

Brazil Election : मोबाईल चोरीने राजकारण तापले ; मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निवडणुकीत केंद्रस्थानी
2

Brazil Election : मोबाईल चोरीने राजकारण तापले ; मतदारांच्या सुरक्षेचा प्रश्न निवडणुकीत केंद्रस्थानी

गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा
3

गोळीबार, गुंडगिरी अन् बेरोजगारीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारवर साधला जोरदार निशाणा

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण
4

शिंदेसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपसमोर आव्हान! नंदनवनवरील बैठकीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.