
sharad ratna
Sharad Ratna Awards 2026 Details : शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पुणे येथे जिल्हा कार्यकारणी बैठक उत्साहात पार पडली. यावेळी प्रतिष्ठानच्या आगामी उपक्रमांसह ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘शरद रत्न पुरस्कार’ सोहळ्याच्या पूर्वतयारीची रूपरेषा निश्चित करण्यात आली.
कलाकारांच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी आणि संघर्षावर मात करून त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजाराम बुवा शेलार यांनी केले.
मनोगत व्यक्त करताना राजाराम बुवा शेलार म्हणाले,”प्रत्येकाच्या वाट्याला संकटे येतात; मात्र संकटांवर मात करून धडपडणाऱ्या कलाकारांना मोठे करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.” कलाकारांना अधिकाधिक संधी आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच वारकरी मंडळींचाही सांस्कृतिक उपक्रम व दिंडी सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभाग वाढविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि वारकरी परंपरेला प्रोत्साहन देत नवोदित तसेच उपेक्षित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बैठकीचे प्रास्ताविक पुणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून खजिनदार सुरेश पाटील, अमरावतीच्या सचिव मायाताई वाकोडे, अध्यक्षा तृप्तीताई मेश्रम, विश्वस्त व राज्य कार्यकारिणी सदस्य रूपालीताई शिंदे, सांगली जिल्हाध्यक्ष प्रणाली पाटील, तसेच महादेव जंगम गुरुजी, युवराज दिसले, सचिन तावरे, सातारा जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, डॉ. मदन कोठुळे, रोहन पायगुडे, श्रीकांत मेमाने, मोहन दातीर, जयराज मोरे, महेश चव्हाण, अण्णा वाघमारे, विनायक गायकवाड,समीर शेलार, दत्ता शेलार, डॉ राजेंद्र भवाळकर, ह.भ.प विद्या ताई ढमढेरे,रुपाली ताई शिंदे, प्रणवी पाटील, जयराम मोरे, शुभम लाड यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी व कलाकार उपस्थित होते.
Career Guide : ग्रॅजुएशननंतर लगेच नोकरी कशी मिळवायची? जाणून घ्या एका क्लिकवर…
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघराज हट्टी यांनी केले, तर पुणे सचिव सचिन शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानले. अमरावती, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि पुणे जिल्ह्यांतील पदाधिकारी, कलाकार व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीने बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.