फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Deemed vs private university: बारावी किंवा ग्रॅज्युएशननंतर पुढील शिक्षणासाठी कॉलेज शोधत असताना ‘डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी’ (Deemed to be University) आणि ‘प्राइवेट युनिव्हर्सिटी’ (Private University) हे दोन शब्द नक्की समोर येतात. पाहण्यात आणि ऐकण्यात दोन्ही संस्था खाजगी (प्राइवेट) संस्थांसारख्याच वाटतात. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक सहसा या दोन्ही गोष्टी एकच समजण्याची चूक करतात. परंतु, वास्तवात सरकारी कागदपत्रे, नियम आणि कामकाजाच्या पद्धतीत या दोन्हीमध्ये जमीन-आसमानचा फरक असतो.
जर तुम्हीही बारावी किंवा ग्रॅज्युएशनच्या अभ्यासनांतर युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत असाल, तर डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी आणि प्राइवेट युनिव्हर्सिटीमधील फरक समजून घेणे आवश्यक आहे. तुम्हाला मिळणारी पदवी नेमक्या कशा प्रकारच्या संस्थेकडून मिळत आहे, हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. युनिव्हर्सिटीची मान्यता, तिचा अभ्यासक्रम ठरवण्याचा अधिकार आणि फीचे खाजगी हे सर्व ती संस्था डीम्ड आहे की प्राइवेट, यावर अवलंबून असते. म्हणून आज आपण या दोन्हीमधला नेमका फरक समजून घेणार आहोत.
डीम्ड टू बी आणि प्राइवेट युनिव्हर्सिटी नावावरून एकसारख्या वाटल्या तरी त्यांच्यात मोठा फरक आहे. कुठेही प्रवेश घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या घटकांवर लक्ष देऊन तुम्ही युनिव्हर्सिटीचा दर्जा समजून घेऊ शकता:
स्थापनेची प्रक्रिया: प्राइवेट युनिव्हर्सिटीची स्थापना राज्य विधानसभासभेच्या कायद्यांतर्गत होते. म्हणजेच राज्य सरकार बिल पास करून याला युनिव्हर्सिटीचा दर्जा देते. दुसरीकडे, ‘डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी’ ही कोणतीही नवीन झालेली युनिव्हर्सिटी नसते. ही आधीपासून सुरू असलेली अशी कॉलेज किंवा संस्था असते, जी शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असते. केंद्र सरकार आणि युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन (UGC) त्यांच्या उत्कृष्ट ट्रॅक रेकॉर्डला पाहून त्यांना ‘युनिव्हर्सिटीसारखा’ दर्जा देतात.
नावाचा वापर: प्राइवेट युनिव्हर्सिटी आपल्या नावाच्या पुढे थेट ‘University’ हा शब्द लिहू शकतात (उदा. XYZ University). परंतु डीम्ड युनिव्हर्सिटीसाठी नियम कडक आहेत. यूजीसीच्या (UGC) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, डीम्ड युनिव्हर्सिटी थेट आपल्या नावामध्ये ‘युनिव्हर्सिटी’ शब्दाचा वापर करू शकत नाही. त्यांना आपल्या नावामागे अधिकृतपणे ‘Deemed-to-be University’ असे लिहावेच लागते.
IIT Bombay : टेक प्रोफेशनल्ससाठी खूशखबर! IIT बॉम्बेकडून ‘हा’ नवीन डिप्लोमा कोर्स सुरू..
डीम्ड युनिव्हर्सिटीला आपले कोर्सेस, सिलॅबस, परीक्षा पॅटर्न आणि ग्रेडिंग सिस्टम ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. या कोणत्याही बाह्य युनिव्हर्सिटीच्या हस्तक्षेपाशिवाय नवीन कोर्स सुरू करू शकतात आणि अभ्यासाची पद्धत केव्हाही अपटेड करू शकतात. प्राइवेट युनिव्हर्सिटीकडेही हे स्वातंत्र्य असते, परंतु त्यांना राज्य सरकार आणि यूजीसीच्या ठरवून दिलेल्या चौकटीत राहूनच काम करावे लागते.
डीम्ड युनिव्हर्सिटीमधील फी स्ट्रक्चर आणि प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे स्वायत्त (Autonomous) असते. त्या स्वतःच्या आधारावर गुणवत्ता किंवा प्रवेश परीक्षा आयोजित करून प्रवेश देतात. प्राइवेट युनिव्हर्सिटी स्वतःची फी ठरवू शकतात. परंतु काही राज्यांमध्ये सरकारची फी रेग्युलेटरी कमिटी जागा आणि फीवर लक्ष ठेवून असते.
प्राइवेट युनिव्हर्सिटीचे अधिकार क्षेत्र प्रामुख्याने त्याच राज्यापुरते मर्यादित असते, ज्या राज्याच्या कायद्यानुसार ती स्थापन झाली आहे; ती राज्याबाहेर सहजपणे आपल्या शाखा उघडू शकत नाही. याउलट, जर एखाद्या डीम्ड युनिव्हर्सिटीची कामगिरी अत्यंत चांगली असेल, तर ती यूजीसी आणि शिक्षण मंत्रालयाची परवानगी घेऊन देशात कुठेही किंवा परदेशातही आपले ऑफ-कॅम्पस सेंटर सुरू करू शकते.






