Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास

सलग दोन टर्म खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी किती विकासकामे केली, याचा जनतेला हिशोब द्यावा, असे आव्हान म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना दिले दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2026 | 04:10 PM
शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; 'या' प्रकल्पाबाबतही विचारला सवास

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; 'या' प्रकल्पाबाबतही विचारला सवास

Follow Us
Follow Us:

शिरूर : आगामी शिरूर लोकसभा निवडणूक आपण निश्चितपणे लढणार आहे. मागील काही वर्षांत शिरूर लोकसभा मतदारसंघात ६०० कोटी रुपयांहून अधिक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्या तुलनेत सलग दोन टर्म खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींनी किती विकासकामे केली, याचा जनतेला हिशोब द्यावा, असे आव्हान म्हाडाचे अध्यक्ष तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना दिले दिले.

 

शिरूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना आढळराव म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत चाकण, आळंदी, जुन्नर, राजगुरूनगर, शिरूर आणि मंचर येथील नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करून मार्गी लावण्यात आली. विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्यात आले असून, भविष्यातही विकासाची ही गती कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे–शिरूर रस्त्याचे काम तातडीने सुरू व्हावे, तसेच नाशिक फाटा–राजगुरूनगर महामार्गाच्या कामाची कार्यादेश (वर्क ऑर्डर) लवकरात लवकर निघावी, अशी मागणी त्यांनी केली. चाकण–कुरळी–भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक होत असल्याने या मार्गाचे काम अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुणे–नाशिक रेल्वे मार्ग जुन्नर खेड या परिसरातून व्हावा यासाठी आपण सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता, असे त्यांनी सांगितले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाचर्णे, पंचायत समितीचे उपसभापती रामभाऊ सासवडे, नगरसेविका पूजा पोटावळे, नगरसेवक सागर नरवडे, उमेश शेळके, संतोष थेऊरकर, दिनेश मांडगे, निलेश पवार तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर थोरात, सुरेश गाडेकर, तुषार जांभळे आदी उपस्थित होते.

इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाचे काय झाल?

यावेळी त्यांनी विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही टीकास्त्र सोडले. “लोकसभा निवडणुकीत विमानतळ, चाकण वाहतूक कोंडी यांसारख्या मुद्द्यांवर मते मागितली; मात्र निवडून आल्यानंतर हे विषय बाजूलाच पडले. इंद्रायणी मेडिसिटी प्रकल्पाचे पुढे काय झाले,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

भाषण करण्यापेक्षा विकास महत्वाचा

“निवडणुकीच्या काळात भावनिक प्रचार करायचे, संसदेतील भाषणे सोशल मीडियावर प्रसारित करायची, एवढ्यावर जनतेचे प्रश्न सुटत नाहीत. भाषण करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामे होणे अधिक महत्त्वाचे आहे,” अशी टीकाही आढळराव पाटील यांनी केली.

हे सुद्धा वाचा : महापालिका किती काळ चालवणार ‘पीएमपी’? दहा तास चालली नुसतीच चर्चा; नगरसेवकांच्या टीकेनंतर…

प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कटिबद्ध

आगामी लोकसभा निवडणूक आपण लढणार असल्याचा पुनरुच्चार करत, मतदारसंघातील गावागावांत आपला सातत्याने संपर्क असून नागरिकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शहराची हद्दवाढ ही काळाची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. हद्दवाढ झाल्यास विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळेल, असे ते म्हणाले.

Web Title: Shivajirao adhalrao patil has challenged mp amol kolhe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • Dr. Amol Kolhe
  • maharashtra
  • Shirur News

संबंधित बातम्या

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा
1

MSRTC NCMC Card: एसटीच्या NCMC कार्डसाठी महत्त्वाचे बदल; आधार OTPसह हरवलेल्या कार्डचीही सुविधा

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती
2

तीन एकर डाळिंब बागेतून लाखोंचे उत्पन्न; माळेगाव येथील जाधव बंधूंनी शेतीतून साधली आर्थिक प्रगती

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र
3

‘आपले सरकार’ केंद्रातून स्वावलंबनाची नवी वाट; पालकमंत्री सरनाईकांच्या हस्ते तीन अनाथ बालकांना मंजुरी प्रमाणपत्र

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई
4

बेशिस्त वाहनचालकांना चाकण पोलिसांचा दणका; दीड महिन्यात तब्बल 9777 वाहनांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.