Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण औद्योगिक वसाहतीत PMPML ची बस जळून खाक; तब्बल 50 प्रवासी…

निगडीहून महाळुंगे एमआयडीसीकडे जाणारी पीएमपीएलची इलेक्ट्रिक बस महिंद्रा कंपनीसमोर अचानक पेट घेत जळून खाक झाली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 13, 2026 | 03:21 PM
चाकण औद्योगिक वसाहतीत PMPML ची बस जळून खाक; तब्बल 50 प्रवासी...

चाकण औद्योगिक वसाहतीत PMPML ची बस जळून खाक; तब्बल 50 प्रवासी...

Follow Us
Follow Us:
  • चाकण औद्योगिक वसाहतीत बस जळून खाक
  • तब्बल 50 प्रवाशांचे प्राण वाचले
  • मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त
चाकण/अतिश मेटे : पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीत आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. निगडीहून महाळुंगे एमआयडीसीकडे जाणारी पीएमपीएलची इलेक्ट्रिक बस महिंद्रा कंपनीसमोर अचानक पेट घेत जळून खाक झाली आहे. बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते; मात्र चालक व वाहकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढण्यात आल्याने मोठी जीवितहानी टळली.

 

प्राथमिक माहितीनुसार, शॉर्टसर्किटमुळे बसने अचानक पेट घेतला. बस महाळुंगे एमआयडीसी परिसरातील कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली विशेष सेवा होती. घटनेच्या वेळी बस चाकण औद्योगिक वसाहतीतील महिंद्रा कंपनीसमोरून जात असताना अचानक धूर निघू लागला. काही क्षणांतच बसच्या मागील भागातून ज्वाळा उसळू लागल्या.

चालकाने तत्काळ बस रस्त्याच्या कडेला थांबवून प्रवाशांना खाली उतरवण्यास सुरुवात केली. प्रवाशांनीही शांतता राखत बाहेर पडल्याने अनर्थ टळला. काही प्रवाशांना किरकोळ धूर लागल्याची तक्रार होती; मात्र कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. काही वेळात आग नियंत्रणात आली; मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती.

दरम्यान, ही बस इलेक्ट्रिक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, बॅटरी यंत्रणेत बिघाड किंवा शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अधिकृत कारण मात्र तपासानंतर स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीत अडथळा निर्माण झाला होता. पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. औद्योगिक वसाहतीत कामगारांची मोठी वर्दळ असल्याने ही घटना अधिक गंभीर ठरू शकली असती, मात्र वेळीच घेतलेल्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : पुणेकरांनो, जरा जपूनच ! पुढील दोन दिवसांत उकाड्यात वाढ होणार; कमाल तापमानही वाढणार

टायर फुटला, शालेय सहलीची बस पलटी

अहिल्यानगर–कल्याण महामार्गावरील खामुंडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत गुरुवारी (दि. १२) सकाळी आठच्या सुमारास एसटी बसचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १३ विद्यार्थी आणि ५ शिक्षक जखमी झाले आहेत. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पिंपरी शहाले (ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी शिवनेरी किल्ल्याच्या दर्शनासाठी निघाले होते. राज्य परिवहन महामंडळाच्या बस (क्रमांक: एम एच १४ एल एक्स ६७४७) खामुंडी गावाजवळ पोहोचली असताना अचानक बसचा पुढचा टायर फुटला आणि मोठा आवाज झाला. टायर फुटल्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.

Web Title: Shocking incident of pmpml bus being burnt to ashes in chakan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 03:12 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • PMPML Bus

संबंधित बातम्या

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
1

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र
2

Bhaskar Jadhav : रत्नागिरीतील सर्व तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये समावेश करा, भास्कर जाधवांचे मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी
3

हिंजवडी मेट्रोच्या उद्घाटनाची प्रतीक्षा लांबणीवर, आयटी कर्मचारी नाराज; ‘हा’ टप्पा तातडीने सुरू करण्याची मागणी

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल
4

Maharashtra Drought : शब्द गोल गोल फिरवू नका… दुष्काळावरून रोहिणी खडसेंचा सीएमवर हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.