सौजन्य - नवराष्ट्र टीम
औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची ये-जा वाढली आहे. मात्र त्यानुसार रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्ग किंवा ट्रॅफिक नियोजन करण्यात प्रशासनाकडून ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. परिणामी सकाळ व संध्याकाळच्या वेळी मुख्य मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात. एमआयडीसीतील कंपन्यात कामावर जाण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी वर्ग हे कामावर जाणाऱ्या नागरिकांना दररोज घरातून लवकर निघावे लागत असून, रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवासाचा वेळ दुप्पट होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढताना दिसत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा प्रशासनाकडे निवेदने व पत्रव्यवहार करूनही केवळ आश्वासनांवर हा महत्वपूर्ण प्रश्न अडकून राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कागदोपत्री निर्णय होत असले तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
औद्योगिक विकासावर परिणाम
वाढत्या वाहतुकीच्या वाढत्या समस्येमुळे औद्योगिक विकासावरही परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. भविष्यात नवीन उद्योग येण्यास अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विद्यमान उद्योग स्थलांतरित झाल्यास स्थानिक रोजगार, हॉटेल व्यवसाय, फेरीवाले व छोट्या दुकानदारांवर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने वाहतूक नियोजन, रस्त्यांचे रुंदीकरण व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे.
हे सुद्धा वाचा : संजय राऊतांमध्ये हिंमत असेल तर…; भाजप नेत्याने दिले आव्हान
नागरिकांच्या प्रमुख मागण्या






