Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ

घाऊक बाजारात साखरेचा दर ४८ ते ४९ रुपये किलो असताना किरकोळ बाजारात ती अद्याप ५३ ते ५५ रुपये किलो दराने विकली जात आहे. सणासुदीच्या काळात मिठाई तसेच घरगुती पदार्थांसाठी साखरेचा वापर वाढतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 09, 2026 | 12:15 PM
सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ

सणांपूर्वीच स्वयंपाकघराचे कोलमडले बजेट; साखर, कांदा आणि खाद्यतेलाच्या दरांत मोठी वाढ

Follow Us
Follow Us:

पुणे : महागाईने सर्वसामान्यांची चिंता वाढवली आहे. घरच्या स्वयंपाकघरात दररोज वापरल्या जाणाऱ्या साखर, कांदा आणि खाद्यतेलाचे दर चढेच आहेत. त्यामुळे यंदा सणांमधील मिठाई आणि फराळाचा खर्च नागरिकांच्या खिशाला चांगलाच भार देणार आहे. विशेषतः साखरेच्या बाबतीत घाऊक बाजारात दरात काहीशी नरमाई आली असली तरी त्याचा लाभ किरकोळ बाजारातील ग्राहकांपर्यंत पोहोचताना दिसत नाही.

घाऊक बाजारात साखरेचा दर ४८ ते ४९ रुपये किलो असताना किरकोळ बाजारात ती अद्याप ५३ ते ५५ रुपये किलो दराने विकली जात आहे. सणासुदीच्या काळात मिठाई तसेच घरगुती पदार्थांसाठी साखरेचा वापर वाढतो. त्यामुळे वाढलेल्या दरांचा थेट परिणाम घरगुती अर्थसंकल्पावर होत आहे. दुधासह रोजच्या गरजेच्या वस्तूही महाग महागाईचा दबाव केवळ साखर, कांदा आणि खाद्यतेलापुरता मर्यादित नाही. दुधासह रोजच्या गरजेच्या अनेक वस्तूंचे दरही चढेच आहेत. सणासुदीच्या काळात कुटुंबांचा खर्च नेहमीच्या दिवसांच्या तुलनेत वाढतो.

याचा परिणाम लवकरच किरकोळ बाजारातही दिसेल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. किरकोळ बाजाराकडे प्रशासनाचे पुरेसे लक्ष नसल्याने ग्राहकांना कोणताही दिलासा मिळत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, कांद्यासह भाज्यांचे वाढलेले दरही कुटुंबांच्या एकूण खर्चात भर घालत आहेत.

MSRTC News : एसटी महामंडळ संकटात; 4500 कोटींहून अधिक वैधानिक देणी थकीत, 200 कोटींच्या कर्ज परतफेडीचाही मागितला हिशोब

दरम्यान, मिठाई, फराळ, पूजा साहित्य आणि घरगुती गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसोबतच खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या दरांनी नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. एकूणच, साखर ५३ ते ५५ रुपये, कांदा सुमारे ५० रुपये आणि सोयाबीन तेल सुमारे १७२ रुपये किलो दराने विकले जात असल्याने यंदा सण साजरा करणे महागणार आहे.

कांदाही 50 रुपये किलो; स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले

कांद्याच्या वाढलेल्या दरामुळेही नागरिक त्रस्त आहेत. बाजारात कांदा सुमारे ५० रुपये किलो दराने विकला जात आहे. दैनंदिन जेवणात नियमित वापरल्या जाणाऱ्या कांद्याचे दर वाढल्याने त्याचा थेट परिणाम स्वयंपाकघराच्या बजेटवर होत आहे. सणासुदीच्या काळात नेहमीच्या दिवसांच्या तुलनेत घरांमध्ये जेवण आणि फराळाची तयारी अधिक केली जाते. त्यामुळे कांद्यासह भाज्यांचे चढे दर कुटुंबांचा खर्च आणखी वाढवत आहेत.

सोयाबीन तेल 172 रुपयांखाली नाही

साखर आणि कांद्याप्रमाणेच खाद्यतेलाचे दरही नागरिकांना झटका देत आहेत. सोयाबीन तेल सुमारे १७२ रुपये किलो, शेंगदाणा तेल १९० रुपये, राइस बॅन तेल १७३ रुपये, तर मोहरीचे तेल २०० रुपये किलो दराने विकले जात आहे. सध्या या दरांमध्ये घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. सणासुदीच्या काळात फराळ, नमकीन तसेच तळलेल्या पदार्थांची मागणी वाढत असल्याने खाद्यतेलाचा वापरही वाढतो. त्यामुळे चढ्या दरांचा परिणाम सणासुदीच्या खरेदीवर होणार आहे.

Web Title: Significant rise in prices of sugar onions and edible oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Affordable Price
  • Inflation News
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी
1

Pune Dry Day in Ganesh Utsav 2026: गणेशोत्सवात पुणे प्रशासनचा मोठा निर्णय; १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान ‘या’ भागांत मद्यविक्रीवर बंदी

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग
2

Pune Ring Road Project: ४३ किलोमीटर, १६ गावे, ५१.७३ हेक्टर; पुणे HCMTR अन् इनर रिंग रोडच्या भूसंपादनाला वेग

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा
3

Maharashtra Breaking News Today 2026: उत्तर भारतातील पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे, युपी, बंगालसह दोन राज्यांना पुराचा इशारा

PMRDA ला आता टाळे ठोकण्याची वेळ; वाहतूककोंडी, पायाभूत सुविधांवरून महानगर नियोजन समितीची टीका
4

PMRDA ला आता टाळे ठोकण्याची वेळ; वाहतूककोंडी, पायाभूत सुविधांवरून महानगर नियोजन समितीची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.