Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Police: गणेश विसर्जन मिरवणुकीत ६ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; सीसीटीव्ही कॅमेरे आणि…

विसर्जन मिरवणूकीत तुडूंब गर्दी होते. गर्दीत दागिने, मोबाईल तसेच पाकिट मारणाऱ्या चोरट्यांचा देखील सुळसूळाट असतो. हे चोरटे यादिवशी मोठ्या प्रमाणात चोऱ्या करतात. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. तसेच नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 15, 2024 | 07:25 PM
Pune Police: गणेश विसर्जन मिरवणुकीत ६ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; सीसीटीव्ही कॅमेरे आणि...

Pune Police: गणेश विसर्जन मिरवणुकीत ६ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त; सीसीटीव्ही कॅमेरे आणि...

Follow Us
Follow Us:

पुणे: पुणे शहरातील गणेशोत्सवाला दरवर्षी लाखो भाविक भेट देत असतात. मानाचे पाच गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, भाऊ रंगारी गणपती आणि गणपती मंडळे व त्यांचे सजीव देखावे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक पुण्यनगरीत येत असतात. पुण्यातील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला विशेष महत्व आहे. सांस्कृतिक, पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशाची विसर्जन मिरवणूक काढली जाते. दरम्यान १७ तारखेला विसर्जन मिरवणूक होणार आहे. यासाठी आता पुणे पोलीस देखील सज्ज झाले आहेत. विसर्जन मिरवणुकीत पुणे पोलिसांचा तगडा बंदोबस्त बघायला मिळणार आहे.

पुण्यातील वैभवशाली गणेशोत्सवाची सांगता मंगळवारी (१७ सप्टेंबर) दिमाखदार विसर्जन मिरवणुकीने होणार आहे. यानिमित्ताने पुणे पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन सोहळ्यासाठी ६ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची देखील नजर राहणार आहे. लक्ष्मी रस्ता, कुमठकेर रस्ता, केळकर रस्ता, टिळक रस्ता या मार्गावरुन मिरवणूक जाणार आहे. मुख्य विसर्जन मार्गासह उपनगरात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार तसेच सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली या बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. सकाळी ७ पासून बंदोबस्त सुरू होणार असून, तो मिरवणुकीची सांगता होईपर्यंत तैनात असणार आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ), गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तास राहणार आहेत. शहर व उपनगरात बंदोबस्त असणार असून, मुख्य मिरवणूकीसाठी अतिरीक्त बंदोबस्त ठेवला आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचण्यासाठी त्वरीत मार्ग उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. नागरिकांना वैद्यकीय मदत उपलब्ध करुन देण्यासाठी रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

हेही वाचा: पुणेकरांनो लक्ष द्या! गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रमुख १७ रस्ते वाहतुकीस बंद

छेडछाड व चोरट्यांसाठी साध्या वेशातील पोलीस

विसर्जन मिरवणूकीत तुडूंब गर्दी होते. गर्दीत दागिने, मोबाईल तसेच पाकिट मारणाऱ्या चोरट्यांचा देखील सुळसूळाट असतो. हे चोरटे यादिवशी मोठ्या प्रमाणात चोऱ्या करतात. यापार्श्वभूमीवर पोलिसांनी साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. तसेच नागरिकांसाठी मदत केंद्र राहणार आहे. चौकाचौकात निरीक्षण मनोरे उभे करण्यात येणार असून, विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे.

विसर्जनाच्या दिवशी मंगळवारी (१७ सप्टेंबर) रात्री बारापर्यंत ध्नवीवर्धक वापरण्यास परवानगी दिली आहे. ध्वनीप्रदुषणाबाबत सर्वोच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने दिलेल्या नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत. आदेशाचे पालन न करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे.
– जी. श्रीधर, पोलीस उपायुक्त विशेष शाखा

असा आहे बंदोबस्त

अप्पर पोलीस आयुक्त– ४
पोलीस उपायुक्त– १०
सहाय्यक पोलीस आयुक्त– २५
पोलीस निरीक्षक– १३६
पोलीस उपनिरीक्षक– ६५३
पोलीस अंमलदार– ५ हजार ७००
एसआरपीएफ कंपनी– १
होमगार्ड– ४००

Web Title: Six thousand police personnel deployed in ganpati immersion in pune city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 07:16 PM

Topics:  

  • Ganesh Festival
  • Ganpati festival 2024
  • pune news

संबंधित बातम्या

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद
1

Pune News: बारामती, पुरंदरमध्ये ‘इलेक्शन मोड’; मतदार यादी निरीक्षकांकडून BLO अन् मतदारांशी थेट संवाद

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
2

Pune PMC Mula Mutha Riverfront: मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी खासगी जागेचे भूसंपादन; महापालिकेचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल
3

पुण्यात वाहनांची संख्या वाढतीच; महिनाभरातच MH-61 च्या सीरीज फुल्ल

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख
4

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.